महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,82,665

यावलचा किल्ला आणि बावळी

By Discover Maharashtra Views: 1486 3 Min Read

खानदेशातील इतिहासाची साधने | यावलचा किल्ला आणि बावळी –

शिरपूर- रावेर -बऱ्हाणपूर महामार्गावरील महत्त्वाच्या  या गावात पूर्वी ब्यावल साखळी असेही म्हणत. ग्वाल्हेरच्या शिंदे यांच्या ताब्यात असताना परगण्याचे मुख्य ठिकाण होते. सन १७८८ मध्ये शिंद्यांनी राव धार निंबाळकर यांना यावरचा अधिपती नेमले. निंबाळकर घराण्याची ही सत्ता कित्येक वर्षे राहिली. यावल परगण्यात लागून असलेले रावेर, थाळनेर आणि उंबर हे भाग यावेळी होळकरांच्या ताब्यात होते.  निंबाळकरांनी होळकरांना तीन लाख पन्नास हजार रुपये देऊन हे भाग यावल परगण्यात समाविष्ट केले. (यावलचा किल्ला )निंबाळकर यांचा मुलगा सुरज निंबाळकर याने कर्नाटकी शिबंदी ठेवली होती. कर्नाटकी शिबंदीचा उपयोग त्याने शेजारच्या जमीनदारांच्या प्रदेशात केला होता. सन अठराशे एकवीस मध्ये त्याने या शिबंदीचा ताबा ब्रिटिशांकडे हस्तांतरित केला.

काही काळ  यावल परगणा कठीण परिस्थितीतून गेला. त्यावेळी सुरज निंबाळकरांनी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी  भिल्ल आणि पेंढारांची मदत केली. १८३७ ते १८४३  मध्ये यावल शिंद्यांकडे होते. १८४३ मध्ये ब्रिटिशांनी हा परगणा ताब्यात घेतला. यावल पूर्वी हात कागद आणि निळ निर्मितीसाठी प्रसिद्ध होते. यावलच्या  चहुबाजूंनी तटबंदी आणि चार दिशांना चार प्रमुख दरवाजे होते. दक्षिणेकडील दरवाजाचा अजूनही शाबूत आहे. उत्तरेकडील दरवाज्याचे बुरुज अस्तित्वात आहेत. गावाच्या पश्चिम बाजूला पडक्या अवस्थेत असलेला गडाची उंच तटबंदी आणि बुरुज अस्तित्वात आहे. हा किल्ला गोवा दादा निंबाळकर यांचा मुलगा आप्पाजी राव यांनी परत बांधला असे उल्लेख आहेत. ब्रिटिश काळात त्याचा उपयोग महलकरी  कार्यालय म्हणून करत असत. गडावर दोन इमारती होत्या.

एक जुनी कचरी आणि दुसरी दोन मजली इमारत निंबाळकरांचे निवासस्थान होते. यावल चौदाव्या शतकापासून  फारुकी घराणे थाळनेर वरून बऱ्हाणपूर येथील आशिरगडावर जाण्यासाठी  आपले परिवार ठेवल्याचे उल्लेख सापडतात. तसेच मुघलकालीन मशीद बांधली आणि आजही साकळीला उरूस होतात. “खानदेश अंडर मुगल्स १६०१-१७२४” लेखक डॉ. महंमद इलियास कुद्द्युसी(२००२) इस्लामिक वंडर्स ब्युरो या पुस्तकात खानेखानाह किंवा रहिम या सेनापतीने विहिरी बांधल्याचे उल्लेख आहेत.  तसेच फारूकी आपला परिवार येथे ठेवत असल्याने उल्लेख आहे. त्यामुळे फारूकी काळाचा तसेच मुगल काळाचा, मराठा काळाचा इतिहास परत लिहिण्याची गरज आहे आणि किल्ले, वास्तु विहिरी ही तत्कालीन इतिहासाची महत्वाची साधने आहेत.

यावल बसस्थानकाजवळ सुमारे पंधरा मीटर लांब, सात मीटर रुंद व सात ते आठ मीटर खोल अशी निंबाळकर कालीन किंवा कुठल्याही काळातील आहे हे संशोधनाअंतीच कळेल, दोन मजली पायविहीर आहे. विहिरीच्या पूर्व बाजूला मारुतीचे देऊळ आहे,   विहिरीतून एक भुयार होते अशी आख्यायिका आहे पण सध्या तरी ही विहीर नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. गाळ भरून घाणीचे भरली आहे. गावातील प्रयत्न केला तर ही वास्तू आणि किल्ला तसेच नदीकाठी स्वच्छता करून पर्यटक आणि अभ्यासकांना उपलब्ध करून देता येईल.

विटा चुन्याचे बांधकाम केलेली, मुगल स्थापत्यासारखी कमान असलेली ही बावडी स्वच्छ केली तरच समजू शकेल की ती कुणी बांधली. एखादा शिलालेख आणि पुरावा सापडू शकेल. अहिल्यापुर येथील पाच मजली विहीरीसारखीच रचना वाटते आहे. होळकर शिंदे काळात बांधली असावी.

@ सरला

सर्व फोटो  टीम खानदेश एक्सप्लोरर, फारूक शाह नौमानी, यावल

Leave a comment