महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,68,642

वाघनखं वास्तव आणि अवास्तव

By Discover Maharashtra Views: 1286 4 Min Read

वाघनखं वास्तव आणि अवास्तव –

सध्या महाराष्ट्र सरकार हे शिवरायांची त्यांनी अफझलखान वधावेळी वापरलेली वाघनखे लंडन मधील “व्हीक्टोरिया अल्बर्ट म्युझियम” मधुन भारतात परत आणणार आहे. त्यामुळे भारतात व महाराष्ट्रात शिवभक्तामध्ये एक उत्साहाची लाट संचारली आहे. तशाच त्यावर उलट सुलट प्रतिक्रीया व टिकाटिप्पनी ही केल्याजात आहेत. मुळात ती वाघनखे ही खुद्द शिवछत्रपतींचीच आहे याचे काही समकालिन अस्सल पुरावे उपलब्ध नाहीत..त्यामुळे ती वाघनखे शिवछत्रपतींबाबत संबंधित आहेत यावर बर्याच जणांनी संशय व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने आपण वाघनखं वास्तव आणि अवास्तव ऐतिहासिक आढावा घेणार आहोत.

अफझलवधाची माहिती ज्या समकालिन साधनातून मिळते त्यातल्या बर्याच साधनात वाघनखांचा उल्लेख नाही. त्या साधनामधील नोंदीची आपण इथे माहिती घेऊ..
कविद्र परमानंदाने लिहलेल्या शिवभारतात शिवछत्रपतींनी अफझलखानाला तलवारीने मारले अशी नोंद केली आहे. तसा एक श्लोकच शिवभारतात आपल्याला पाहायला मिळतो.

आपृष्ठ विद्विषत्कुक्षि तुर्णं तेण प्रवेशिता।
आकृप्यान्त्राणि सर्वाणि सा कृपाणी विनिर्गता॥॥२१:४०॥
कुंप्यतः कार्तिकेयस्य शक्तिः क्रौंचाचल यथा।
व्यभादफजलं भित्वा शिवखड्गलता तथा।।४१॥

याचा अर्थ- त्याने शत्रुच्या(अफझलखानाच्या) पोटात पाठीपर्यंत खुपसलेली ती तलवार सर्व आतडी ओढून बाहेर ओढली. क्रुद्ध कार्तिकेयची शक्ती क्रौंच पर्वतास विदीर्ण करून जशी शोभली, तशी शिवरायांची तलवार अफझलखानास भेदून शोभू लागली.

याउलट सभासद बखरी मध्ये अशी नोंद मिळते की

“हे देखोनी राजीयानी डाव्या हाताचे वाखनख होते. तो हात पोटात चालवला. खानाने अंगात झगाच घातला होता. वाघनखाचा मारा करताच खानाची चरबी बाहेर आली. दुसरा हात. उजवे हातचा बिचवियाचा मारा चालविला ऐसे दोन वार करून मुंडी आसडून चौथरिखाली उडी घालोन निघोनी गेले.”

सभासदाने राजांनी अफझल्यावर दोन हातांनी म्हणजेच डाव्या हातातील वाखनखांनी आणि उजव्या हातातील बिचव्याने मारा केला. अशी नोंद केली आहे. आणि हे करताना त्याने दोनवेळा वाखनखांचा उल्लेख केला आहे.याव्यतिरिक्त केळूसकर गुरूजी ही वाघनख्यांचा उपयोग केला याला पृष्टी देतात..असो.

पण असे असले तरी त्या म्युझियम मध्ये असणारी वाघनखे ही शिवछत्रपतींचीच आहेत का? हा मुख्य प्रश्न आहे. आणि याचा आढावा घेतल्यावर लक्षात येईल.

त्या म्युझियम मध्ये वाघनखांसंबंधित अशी नोंद आहे की; “हे आयुध इतिहासकार ग्रेंड डफ याच्याकडे होते. ते इस्ट इंडिया कंपनीनीत सातारा येथील प्रशासकीय अधिकारी होते. या शस्त्रासोबत एक बाॅक्स असून त्यावर ही वाघनखे शिवाजी राजाची असून याच्याच सहाय्याने त्याने अदिलशहाच्या सरदाराला ठार केले.आणी ही वाघनखे मराठ्यांच्या पेशव्याने डफला दिले.” अशी नोंद आहे.

तसेच सांस्कृतिक कार्यमंत्र्यानी प्रकाशित केलेल्या पत्रकात; सातार्याच्या प्रतापसिंह यांच्या नावे कारभार करणार्या डफला ही वाघनखे महाराजांनी दिली व व डफच्या नातूने ती म्युझियमला दिली. असे लिहले आहे.

तर ही वाघनखे सातारा गादीचे थोरले प्रतापसिंह यांच्याकडून ग्रॅन्ड डफ कडे गेले असे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत सांगतात. त्यांच्या मते साताराच्या प्रतापसिंहानी एक वाघनख डफला दिले व एक वाघनख एलफिन्स्टनला दिले होते. आणि त्यानंतरही प्रतापसिंहाकडे एक वाघनख होते असा उल्लेख येतो. त्यामुळे सध्या म्युझियममध्ये जी वाघनखे आहेत ती शिवरायांच्या वाघनखांसारखी असतील पण त्यांनी वापरलेली नाहीत.

याउपर महत्वाचे म्हणजे इतिहास संशोधक भावे यांनी वाघनखांबाबत लिहिले आहे की;

म्युझियमला केलेल्या पत्राला त्यांनी उत्तर दिले होते की ते वाघनखं हे शिवाजी महाराजाचे नाही आणि ते मूळही नाही. असा स्पष्ट च निर्वाळा त्या संग्रहालयाने दिला असल्याने या चर्चेला पूर्णविरामच मिळतो.

संदर्भ
शिवभारत-कवी परमानंद
सभासद बखर- सभासद
भवानी तलवार- इंद्रजीत सावंत

Mahesh Nikam (विजयी महाराष्ट्र FB)

Leave a comment