महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,91,358

दूर्मिळ वामन दामोदर विष्णुमूर्ती

By Discover Maharashtra Views: 1290 2 Min Read

दूर्मिळ वामन दामोदर विष्णुमूर्ती –

पैठण (ता. पैठण जि. औरंगाबाद) येथील धूंडीनाथ महाराज मठात असलेल्या लक्ष्मी नृसिंह मूर्तीबाबत याच मालिकेत लिहिलं होतं. त्याच जागी या दोन विष्णुमूर्ती आहेत. सहसा विष्णुच्या “केशव” मूर्ती जास्त ठिकाणी आढळतात (पद्म, शंख, चक्र, गदा असा आयूधक्रम). पण या दोन मूर्ती वेगळ्या आढळ्याने मी चकित झालो. डावीकडची मूर्ती वामन या नावाने ओळखली झाते. आयुधांचा क्रम प्रदक्षिणा मार्गाने असा आहे- शंख, चक्र, गदा, पद्म. वामन दामोदर विष्णुमूर्ती या मूर्तीला ग्रीवीका, उदरबंध अलंकार वेगळे आहेत. बाकी हाता पायातील तोडे मेखला दूसर्‍या मूर्तीसारखेच आहेत. पाठशीळा पंचकोनी आहे.

उजवीकडची मूर्ती दामोदर नावाने ओळखली जाते. प्रदक्षिणा क्रमाने आयुधं अशी – पद्म, शंख, गदा, चक्र. या मूर्तीच्या गळ्यात ग्रीवीका नसून हार आहे. करंड मुकूटच आहे पण जास्त उंच आहे. मागची प्रभावळ मोठी आहे. खाली चामरधारिणी, सेवक आहेत. याची पाठशीळा अर्धवर्तूळाकार आहे.

या मठाचा जिर्णाद्धार होणे अभ्यासकांच्या, वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही गरजेचे आहे. आपण सगळे मिळून यासाठी प्रयत्न करू या.

पैठण, सातवाहकालीन राजधानीची अवस्था आता बघवत नाही, तसे तर तिथे बघण्यासाठी खूप काही आहे पण दुर्लक्षित केल्यामुळे त्याची अवस्था आता गंभीर प्रश्न आहे.

नागा घाट, जायकवाडी धरण, बर्ड मायग्रेशन, नवे व जुने नाथ महाराजांचे मंदिर, जुने वाडे, मान स्तंभ, संग्रहालय, ज्ञानेश्वर उद्यान अशी बरीच ठिकाणे आहेत बघण्यासारखी.. पण या सगळ्याला दुरुस्तीची गरज आहे. ASI, MTDC स्थानिक लोकांनी मिळून या गावाला पर्यटनाचा दर्जा मिळवून द्यावा.

Travel Baba Voyage thanks for taking this pic in very critical position as the doors are closed and u took it from a small hole.

-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद

Leave a Comment