वळक लेणी, मावळ

वळक लेणी, मावळ

वळक लेणी, मावळ, इंद्रायणी खोर –

लेणी जास्त करून व्यापारी मार्गावर खोदली गेली. इंद्रायणीच्या खो-यातील भाजे, र्काले, बेडसे लेणे परिचीत आहेत ,पण या खो-यात आनेक ठिकानी लहान लहान लेणी खोदली गेली. या लेणी गावक-यांन शिवाय कूणालाच माहीत नसतात किवा प्रसिध्दी पासून दूर असतात. अशीच एक लेणी वळक गावात जी कामशेत पासून ५ कि.मी अंतरावर व वळक गावातून ८०० मी.उंचीवर आहे.

वळक गावाच्या पश्चीमेला ही डोंगर रांग आहे. हे एक विहार असून  याची लांबी १० मी.रुंदी ४ मी  तर उंची ३ मी.आहे. येथे असलेल्या नैर्सगीक गुहेलाच कमीतकमी काम करुन विहार बनवल आहे.

कोरताना दगडावर छिनी चे मार्क स्पष्ट दिसतात. दक्षिणेकडे एक बाक कोरला आहे. या लेणीत एक लहान खोली कोरली असून त्याला दरवाजा होता असे तेथील रचने वरून समजते. त्या खोलोत दरवाजा लावल्या नंतर उजेड येण्या साठी एक झरोका कोरला आहे. या गुहेत माती भरली आहे.

बाजूलाच एक छोट गोलाकार लेण खोदल्या सारख दिसत. नक्की काय प्रयोजन आहे हे समजत नाही ,कदाचित पाणी साठवण्या साठी आसेल. वाट वळक गावातून जाते, गुहेच्या तोंडा समोर जात नाही तो.पर्य़त ती दिसून येत नाही.

गावातील माहीतगार सोबत घ्यावा किवा लोकेशन माहीती करून चढाई करावी. वाट थोडीफार जंगलातून जाते पण सुरक्षित आहे. वेध इतिहासाचा, अपरिचितांच्या शोधात, अनवट वाटे वरची लेणी.वेध इतिहासाचा, अपरिचितांच्या शोधात, अनवट वाटे वरची लेणी.

संतोष चंदने,चिंचवड,पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here