स्त्री हे मराठे च्या देवाघरीतील दैवत आहे

By Discover Maharashtra Views: 3743 2 Min Read

स्त्री हे मराठे च्या देवाघरीतील दैवत आहे

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, राणीसाहेब (आक्का) महाराणी येसूबाई साहेब, महाराणी ताराबाई साहेब माँसाहेब, सरसेनापती उमाबाई दाभाडे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सरसेनापती संताजी घोरपडे याचा पत्नी द्धारकबाई घोरपडे, बायाजीबाई शिंदे (कण्हेरखेड) विरबाई राजे भोसले (अक्कलकोट) आदी स्त्रीने पुरूषांच्या बरोबरीना राज्यकारभार केले व तलवार चालविणे छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य व भगवा झेंडा खांद्यावर घेऊन मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झाले.स्त्री हे मराठे च्या देवाघरीतील दैवत आहे.

मराठ्यांच्या इतिहासात सरलष्कर शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई साहेब, महाराणी येसूबाईसाहेब याचा कालखंडात सतत लढाई, व महाराष्ट्रावरील परकीय आक्रमण यामुळे प्रचंड धामधुमीत मराठ्यांचा इतिहासातील स्त्री शक्ती च्या पराक्रमाची दखल तत्कालीन इतिहासात नोंदी ठेवणे शक्य झाले नाही
पण छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या राज्याभिषेक नंतर मराठ्यांचा साम्राज्य सगळ्या हिंदुस्थानभर पसरले शंभूपुत्र
छत्रपती थोरले शाहू कालखंडात महाराष्ट्र व कनार्टक, सह हिंदुस्थानचा विविध भागात दिलेल्या वतन, सरंजाम, मोकासा, यामुळे अनेक मराठे घराणे उदयशी आले

त्या त्या घराण्यातील सरदार व वीरपुरूष सोबतच स्त्री पण आपल्या घरातील जबाबदारी सोबत राज्य कारभारात लक्ष केंद्रित करून आपल्या नेतृत्वाखाली राज्यकारभार सांभाळले पण त्याचा निधनानंतर पुढील पिढीना समाधी व स्मारक व सतीशिळा याचा रूपात या स्त्रियांना न्याय दिला पण आज इतिहासाची महत्त्व हे आपल्या पूर्वजांनी केलेल्या विशेषतः न्याय, पराक्रमी, नेतृत्व यास योग्य पराक्रम सन्मान दिले जात नाही हे सत्य आहे कारण अनेक लोकांना याबद्दल कोण विचारले तर राग येते
त्यात पण स्त्रीची समाधी असेल तर तत्कालीन कालखंडात स्त्रीच्या वर असलेल्या परंपरा व बंधन याचा उल्लेख देऊन पुरुषप्रधान संस्कृती चा उदोउदो करून इतिहासातील पुरूष किती पराक्रमी व श्रेष्ठ होते याचा खात्री पटवून देतात

१५० कि मी जाऊन सकाळपासून दुपारपर्यंत शोधकार्य करताना काही सापडले नाही म्हणून निराश होऊन घराकडे परतत असताना पून्हा मनातील कल्पना शक्तींचा दरवाजा ठोठावला जातात पून्हा शोधकार्य सुरू केले तेव्हा हे स्त्री समाधी आढळले

सदर समाधी हे मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा सरंजामदार असलेल्या घराण्यातील स्त्रीचा समाधी आहे
जो न्यायचे साद घालून संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा म्हणून तर सांगत नसेल कशावरून.

Credit – संतोष झिपरे .
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य .

Leave a comment