महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

ताराबाई राणी सरकार

By Discover Maharashtra Views: 3520 2 Min Read

युद्धनीतीत युक्ती आखणाऱ्या ताराबाई राणी सरकार

१७०० मधे जेव्हा बादशहाने साताऱ्यावर हल्ले चढविले होते तेव्हा त्याने किल्ल्याच्या तटाखाली सुरुंगांचे दोन महाभयंकर स्फोट घडवून आणून सतरा गज लांबीची तटबंदी उध्वस्त केली त्यामुळे किल्ला फार काळ लढविणे मराठ्यांना अवघड झाले हे ताराबाई राणी सरकारांनी ओळखले होते. आणि तेव्हा ताराबाईंच्या धोरणांनुसार किल्लेदाराने वाटाघाटी करून किल्ला बादशहाच्या हवाली केला ती तारीख होती ( २१ एप्रिल , १७०० ). बादशाही फौजेने वेढा घातलेला किल्ला शक्य तितक्या अधिक काल लढवायचा आणि बादशहास जास्तीत जास्त काळ त्या किल्ल्याच्या पायथ्याशी गुंतवून ठेवायचे आणि शेवटी निरुपाय झाला तरच वाटाघाटी करून किल्ला त्याच्या ताब्यात द्यायचा.

बादशहा हा काय किल्ले डोक्यावर उचलून घेऊन जाणार नाही , ते जिथे आहेत तिथेच राहणार आहेत म्हणून ताराबाई राणी सरकारांच्या पुढच्या राजनीतीच्या दृष्ट्या कळाल्या पाहिजेत.म्हणून त्याची पाठ वळताच आपण गेलेले किल्ले परत मिळवू शकू अशी हिंमत ताराबाई राणी बाळगून होत्या.किल्ल्याच्या पायथ्याला वेढा घालून असलेल्या बादशाही फौजेवर मराठ्यांचे हल्ले चालू असणारच पण त्याशिवाय ताराबाईंनी धनाजी जाधव , हणमंतराव निंबाळकर , राणोजी घोरपडे , नेमाजी शिंदे इत्यादी मराठा सेनानींना मोगलांच्या मुलखात धुमाकूळ घालायला मोहिमेवर पाठविले. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी बादशहा जुल्फिकारखान , दाऊदखान , शहजादा बेदारबख्त इत्यादी सेनानींना एकामागून एक पाठवत होता.
मोगल मराठा सैन्यांच्या धावपळीच्या या युद्धाचा वृत्तान्त भीमसेन सक्सेना याने आपल्या ग्रंथात दिलेला आढळतो. तो म्हणतो की सन १६९९ – १७०० च्या मोहिमेच्या काळात एकट्या जुल्फिकारखानास दोन हजार कोसांच्या हालचाली कराव्या लागल्या. ह्या नोंदणी मधे मराठे मोगली सैन्याची महाराष्ट्रात कशी दमछाक करीत होते हे ध्यानी येते. ह्या प्रकारे ताराबाई राणी सरकारांनी मोगलांशी लढताना एकाच वेळी संरक्षणात्मक व आक्रमक भूमिका अंगी घेतली होती ही गोष्ट अतिशय वाचण्यासारखी आहे. महाराष्ट्राच्या डोंगर परिसरात आपल्या गडकोटांचे व मुलखाचे संरक्षण करीत असताना मराठा फौजा मोगल मुलखात नासाडी करण्यासाठी मजल मारत होत्या ताराबाई राणी सरकार ह्यांच्या युद्धनीती प्रमाणे.
Leave a comment