महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

राजर्षी छत्रपति शाहू महाराज

By Discover Maharashtra Views: 3574 3 Min Read

राजर्षी छत्रपति शाहू महाराज ( Pillar Of Social Democracy )

महारांना वतनाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याची राजर्षी छत्रपति शाहू महाराज जांची उपाययोजना – सनदी नोकर म्हणून नेमणुका

१४ मे , १९२०

महार समाज आपल्या वतनाच्या गुलामगिरीत खितपत पडला होता आणि महार वतनाच्या जमिनीच्या लहान-लहान तुकड्यांचा मोह त्याला सोडवत नव्हता. यावर राजर्षी शाहू महाराजांनी उपयोजना काढली. ती म्हणजे कसबा करविरातील समस्त गावांच्या सगळ्या महारांच्या जमिनी एकत्र करायच्या. त्यांच्यापैकी मोजक्याच लोकांमधे त्या जमिनीचे प्रत्येक कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल अशा पद्धतीने फेरवाटप करायचे, या मोजक्या लोकांना सरकारी सेवेत दाखल करून बाकीच्या समस्त महारांना वतनाच्या जुलमी कामातून मुक्त करायचे. कसबा करवीरच्या सगळ्या महारांनी या योजनेस संमती दिल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी १६ निवडक महारांची सरकारी नोकर म्हणून नेमणूक केली. या नोकरांनी खुद्द हुजूर स्वारी, आईसाहेब, महाराज ,युवराज व जरूर पडल्यास श्रीमहालक्ष्मी करवीर निवासिनीकडेही नोकरी करायची होती. राज्यातील “महार वतन” खालसा करण्यापूर्वी महाराजांची ही प्रायोगिक उपाययोजना होती.

श्रीशंभू भवानी
श्री महादेव श्री तुळजाभवानी ।
चंद्रिलेखेव वर्धिष्णुर्जनानंदप्रदायिनी
शाहूछत्रपतेमुद्रा शिव सूनोर्वीराजते।।

स्वस्तिश्री राज्याभिषेक शके (२४७) रौद्रनाम संवत्सरे वैशाख बहूल १० दशमी रोज गुरुवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीमन्ममहाराज शाहू छत्रपती स्वामी यांनी सदू तुकाराम बनगे यांस आज्ञा केली – ऐसीजे :-

महार लोक गावचे उत्पत्तीपासून आजपर्यंत गावचे लोकांची व सरकारची इमाने इतबारे नोकरी करीत आले.
पण, आजपर्यंत त्यांना कोणीही उन्नतीचा मार्ग दाखविला नाही. नेहमी त्यांना हीन स्तिथीत व दास्यात ठेवून अमानुषपणाने वागविल्याचे दिसून आले. अशा स्तिथीत त्यांनी आपले इमान व राजनिष्ठा थोडीपण ढळू दिली नाही. ते मानवी प्राणी आहेत व मनुष्याला मनुष्याप्रमाणे वागविण्याचे तत्वास अनुसरून सदर लोकांना दास्यापासून मुक्त करणे व त्यांना शिक्षण देऊन सुसंस्कृत करून श्रेष्ठ पदास पोहोचविणे हे हल्लीचे सुधारणेच्या काळात आद्य कर्तव्य आहे, असे स्वामींनी ध्यानी आणून कसबा करवीर येथील महार लोकांस एकंदर उत्पन्न जमीन १२९ एकर आठ गुंठे १२९६८ आकार रुपये ४९७ चे आहे, त्यास हल्ली नंबर ९ चे कागदी ‘समस्त महार’ याचे नाव दाखल आहे.ते महार लोकांनी एकवाक्यतीने कबुली दिल्याने कमी करण्यात येऊन सरकारी कामास १६ इसम देण्याचे ठरविले असून , त्यांची नावे पुढील प्रमाणाने –

१) बाबुराव रामराव कांबळे
२) कृष्णराव परशुराम कांबळे
३) नागोजी तिपाजी कांबळे
४) रामू शंकर कोले
५) सदू तुकाराम बानगे
६) जोती नायकू वनगे
७) लिंबारी संतू लिगाडे
८) जोती सुभाना लिगाडे
९) बाळाजी चोळोजी काळे
१०) नामू राणोजी काळे
११) मसू मानाजी काळे
१२) मसू लक्ष्मण काळे
१३) आबा जकू सरनाईक
१४) सदू राणोजी सरनाईक
१५) भाऊ तुळसा कालेकर
१६) तुळसाप्पा संतराम सरनाईक

नेमून दिलेल्या १६ जणांची सरकारी नोकरी करायची आहे.रयतेच्या कामगिरीची अगर अधिकाऱ्याची दिवाणापासून तहत गावाच्या पाटील पर्यंत कोणाचीही नोकरी असली तरी त्यांनी ती हक्काने म्हणून करून घ्यावी.मग तो मनुष्य हिंदू , मुसलमान, ब्राह्मण ,महार ,मांग ,मराठा, जैन, लिंगायत असो.

संकलन – अमित राणे



माहिती साभार – मराठा रियासत (स्वराज्याचे शिलेदार)

Leave a comment