महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

अहिल्याबाईंचे कर्तृत्व

By Discover Maharashtra Views: 3968 2 Min Read

अहिल्याबाईंचे कर्तृत्व…

अठराव्या शतकात अहिल्याबाईंच्या कर्तृत्वाचे वर्णन करणे गरजेचे आहे कारण एखाद्या राणीला सत्ता चालवण्यासाठी विशेष बुद्धिमत्ता , शारीरिक क्षमता , नियतीची चांगली साथ आणि तत्कालीन राजकीय स्थितीची अनुकूलता आवश्यक असते. अहिल्याबाईंच्या बाबतीत त्यांच्यावर ओढलेली परिस्थिती काहीशी कारणीभूत ठरली .इ.स १७५४ च्या लढाईत त्यांच्या पतीचा मृत्यू झाला आणि एक छोटा मुलगा पदरात असताना त्यांना वैधव्य आले. अहिल्याबाईंनी त्यांचं संपूर्ण लक्ष मुलकी कारभारावर आणि मुख्यत्वे माळव्यातील होळकरांचा प्रदेश सुखी आणि समृद्ध कसा होईल ह्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे.

तुकोजी होळकरांनी बरीच वर्षे दक्षिणेत त्यांचे मुख्य वास्तव्य असताना , या भागातील होळकरांच्या प्रदेशाचा कारभार सांभाळण्याचे आणि उत्तरेतील भागाचाही कारभार सांभाळण्याचे दिसून येते.मराठ्यांमध्ये स्त्रियांना पडद्या-आड ठेवण्याची परंपरा नाही त्यामुळे अहिल्याबाई रोज समक्ष जनतेला भेटून त्यांच्या समस्या समजून घेत. ह्यावर ( जॉन माल्कमने –

Major-general Sir John Malcolm GCB, KLS , Scottish soldier, diplomat, East India Company administrator, statesman, and historian) ह्याने अहिल्याबाईंच्या राजनीती बाबत पुढील प्रमाणे वर्णन केले –
First principle of Ahilyabaai Holkar towards government appears to have been moderate assessment and an almost sacred respect for the native rights and village officers and proprietors of land.She heard every complaint in personal and although she continually referred causes to courts of enquiry and arbitration and to her ministers for settlement , she was always accessible and so strong was her sense of duty , on all points connected with the distribution of justice, that she is represented as not only patient, but unwearied, in the most significant causes, when appeals were made to her decision.

अहिल्याबाईंच्या संपूर्ण तीस वर्षांच्या कारकिर्दीच्या काळात उत्तरेत आणि दक्षिणेत सतत लढाया चालू असूनही माळव्यातील होळकरांच्या राज्यावर कोणीही हल्ला केला नाही , यावरून त्यांच्या कडक कारभाराची कल्पना करा.शेत-जमिनीवर भिल्ल आणि गोंड अशा डोंगरीभागातील जमातीकरवी होणारे हल्ले थांबवण्यात अहिल्याबाई होळकरांना अधिक यश मिळाले. इंदूरचे शहर प्रगतीचे मानावे ते अहिल्याबाईंच्या निष्ठेमुळे.

संकलन – अमित राणे

 

Leave a comment