महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,22,671

छत्रपती राजाराम महाराज भाग 1 | समर भूमीचे सनद मालक

By Discover Maharashtra Views: 3937 4 Min Read

छत्रपती राजाराम महाराज – समर भूमीचे सनद मालक

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व राजश्री सरलष्कर शहाजीराजे यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज यांना मावळखोरे मधील किल्ले तोरणावर शपथ घेऊन हिंदुस्थानच्या रयतेच्या कल्याणासाठी सुरूवात केली व रायगडावर ३२ मन सोनेरी सिहांसन वर मागील कैईक पिढ्यांना कोण हिदुं राजे छत्रपति झालेले बघतले नाहीत पण हे भाग्य लाभले या महाराष्ट्राच्या भूमीला।।
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेब यास दख्खनच्या पठारावर अशी प्रकारे लढाई दिली की इराण पासुन आसाम व काश्मीर पासुन कन्याकुमारी पर्यत अंजिक्य असलेल्या औरंगजेब बादशहा हा छत्रपती संभाजी महाराज व येथील मावळ मातीतील पराक्रमी वीरांच्या समोर पराभूत झाला. ९वर्षे आलमगीर म्हणून कुमाशँ शिवाय महाराष्ट्रात राहिला.

दव दमण पासुन ते तंजावर पर्यंत औरंगजेब याच्या फौजा विखुरल्या याचा कारण होते छत्रपती राजाराम महाराज यांचे युध्द पातळीवरील गनिमी कावा होय कारण जर मुघलांचे सैन्य विखुरले तर औरंगजेबची ताकद कमी होईल व औरंगजेबाची प्रत्येक मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रंचड खर्च आले पाहिजे एवढी दक्षता घेतली ती छत्रपती राजाराम महाराजांनी म्हणून तर जिंजी किल्ल्याशी झुल्लुफकारखान चा वेढा ८वर्षे चालला होता . छत्रपती शिवपुत्र असेल ते तर कर्तबगार,वीर आणि पराक्रमी छत्रपती राजाराम महाराज यांच्या ठाई होतेच.

छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठा साम्राज्य संपले म्हणून आनंद घेणाऱ्या मोगलाना मराठ्यांनी सळो की पळो करून सोडले,आणि शिवराज्य राखले व दिल्ली जिंकण्याचे मनसूबे रचले,
ज्यांच्या काळात संताजी- विठ्ठजी या मराठा वीरांनी औरंगजेबाच्या शामीयानाचे सोन्याचे कळस कापुन आणले ,औरंगजेबास संताजी धनाजी यानी आपल्या पराक्रमाने ब्रम्हपुरी ,च्या छावणीत एकप्रकारेचे कैदी होऊन रहावे लागले सतत ५वर्षे .
हीच छत्रपती राजाराम महाराज यानी हिंदवी स्वराज्याचा सरंक्षण साठी शांत व संयम पण आखलेली युध्दनिती होय.

छत्रपती राजाराम महाराज यांच्या युध्दनिती

१)औरंगजेब आपल्या प्रचंड फौजा नाचवून मराठी मुलखात नासधूस करत आहे यासाठी मोगल फौज महाराष्ट्र बाहेर गेले पाहिजे म्हणून स्वतःच जिंजी येथे जाऊन मराठ्यांची राजधानी तिकडे स्थापना केली यामुळे मोगली सैन्याचे विभाजन झाले जवळपास २लाख फौज कनार्टक, तंजावर, आंध्र प्रदेश या भागात विभागले गेले व सदर फौजाच्या मोहीमेचा खर्च औरंगजेब यास कित्येक कोटी रुपयांचे आला यामुळे मोगली सैन्याचे सतत एकच ठिकाणवर मुक्कामी राहावे लागले
हुकमपन्हा रामचंद्र पंत अमात्य यांना महाराष्ट्रात पन्हाळा किल्यावर राहून रयतेचा सरंक्षणासाठी जबाबदारी दिली तसेच गडकिल्यावरील रसद ,दानापाणी व दारुगोळा याचा सुसज्ज करावेत, गेलेले किल्ले पुन्हा घेऊन औरंगजेब याचा प्रतिकार करावे ही कामगिरी रामचंद्रपंत यांना यशस्वीपणे केली. यामुळे मराठ्यांचा राजधानी दक्षिनेत गेल्यानंतर पण अमात्य याचें नेतृत्वाखाली औरंगजेब याच्या फौजा पराभूत होऊ लागल्या.

सरसेनापती संताजी घोरपडे सेनापतीपदी असेपर्यंत औरंगजेब स्वतं मराठ्यांचा किल्ला जिंकण्यासाठी छावणीतुन बाहेर पडला नाही हे सत्य आहे कारण संताजी घोरपडे यांनी बादशहा च्या छावणीचे कळस काढून आणले व छत्रपती राजाराम महाराजांच्या चरणीशी ठेवला. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान नंतर मराठ्यांचा साम्राज्य नष्ट होऊ शकत नाही याची प्रचिती आणून दिली ,ज्या शेख निजाम यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना पकडले त्याच्या शीर कोल्हापूर जवळच्या लढाईत कापुन काढले ते सरसेनापती संताजी घोरपडे म्हणजे छत्रपती राजाराम महाराज यांचा उजवा हात व धनाजी जाधव डावा हात म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही एकीकडे औरंगजेब याच्या फौजाशी मुकाबला करून दुसर्या कडे जिंजीच्या वेढातील छत्रपती राजाराम महाराजांना मदत करणे, वेढ्यातुन रसद व कुमक देणे अशी कामगिरी चोख करणारे संताजी घोरपडे तत्कालीन कालखंडात हिंदुस्थानच्या इतिहासात बलाढ्य सेनापती होते याचा संदर्भ मोगल दराबारतील बातमीपत्रे यातून येतो.छत्रपती राजाराम महाराज यांच्या नेतृत्वासमोर औरंगजेब व मोगली सैन्य लाचार होऊन सतत पराभूत झाले.

Credit – संतोष झिपरे .

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य .

1 Comment