नाईकवाडी घराणे

Discover-Maharashtra-Post | महाराष्ट्रातील कलचुरी राजघराणे

महाराष्ट्रातील नाईकवाडी घराणे –

महाराष्ट्र आणि मराठे यांचा संबंध प्राचीन.या महाराष्ट्राने अनेक मराठा घराणे उदयास येताना आणि स्वपराक्रमाने अजरामर होताना पाहिले.त्यातीलच हे एक अपरिचीत लढाऊ नाईकवाडी घराणे.
वास्तविक नाईकवाडी हे उपनाम नसून पदवी असल्याचा उल्लेख आपल्याला आढळून येतो.लेफ्टनंट साइक्स या इंग्रज अधिकाऱ्याच्या ‘दक्षिण प्रांतासंबंधित हिशोबी माहिती’ या ग्रंथात नाईकवाडी म्हणजे नाईकांच्या ताब्यातील गावांचा समुदाय.पूर्वी 84 गावांची देशमुखी असे.आणि त्यांच्या हाताखाली नाईक काम करत असत.मुख्य सुभेदार सरदेशमुख असे.नाईकाच्या हाताखाली पाटील आणि चौगुले काम करत असत.या व्यवस्थेच्या प्रमुखपदी राजा असे.

पुढे चालून याच नाईक लोकांनी लढाऊ पेशा स्वीकारला.आणि पराक्रमाच्या जोरावर किलेदार आणि हवलदार पदावर पोहोचले. सरदार घाटगे यांच्या जुन्या बखरीत नाईकवाडी नाव पुष्कळ वेळेस आले आहे.इ.स.1626 मध्ये सातारा किल्ल्याचा अधिकारी ‘मंगाजी नाईकवाडी’ होता.जगदेवराव जाधव यांच्या हाताखाली पुष्कळ नाईकवाडी सैन्य होते.तसेच,सैन्यातील अनेक तुकड्यांवर नाईकवाडी लोक असल्याचा उल्लेख आहे.

वास्तविक,नाईक ही एक पदवी होती.सैन्यातील एका अधिकारपदाची बिरुदावली म्हणून ‘नाईक’ या पदवीचा उल्लेख होई.पुढे चालून देशमुख,देशपांडे,पाटील यांच्याप्रमानेच नाईक हेसुद्धा एक उपनाम होऊन गेले.
आणि याच पराक्रमी नाईकवाडी घराण्याची पदवी पुरंदरचे किल्लेदार ‘निळो नीलकंठ’ यांनीसुद्धा मिरवल्याचे उल्लेख इतिहासात आहेत.

संकलन : केतन पुरी

माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here