तळजाई माता मंदिर, पुणे | Taljai Mata Temple, Pune

तळजाई माता मंदिर, पुणे | Taljai Mata Temple, Pune

तळजाई माता मंदिर, पुणे | Taljai Mata Temple, Pune –

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ज्या दोन टेकडया प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे पर्वती आणि तळजाई. तळजाई आणि पर्वती या दोनही टेकड्या एकाच डोंगराचा भाग असून मूळ डोंगराचा एक निमुळता भाग उत्तरेस जेथे संपतो तो भाग म्हणजे पर्वती. तळजाई टेकडी समुद्रसपाटीपासून सुमारे ६७० मीटर उंचावर आहे. या टेकडीवर जाण्यासाठी बरेच रस्ते आहेत, तरी मुख्य रस्ता अरण्येश्वर भागातील शिंदे हायस्कुल जवळून आहे. चौकातून उजवीकडे वळल्यावर एक प्रशस्त रस्ता दिसतो. त्या रस्त्याने गेल्यावर टेकडीच्या माथ्यावर जाता येते. उजव्या बाजूस नुकतेच निर्माण झालेले कै. सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम आहे. पुढे रस्त्याने सरळ गेल्यास तळजाई माता मंदिर उजव्या बाजूला दिसते.(तळजाई माता मंदिर, पुणे | Taljai Mata Temple, Pune)

तळजाई देवी हे जागृत देवस्थान असून, या मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की, या परिसरात रावबहादुर ठुबे यांचे वास्तव्य होते. ते देवीचे भक्त होते. आज ज्या ठिकाणी मंदिर आहे, त्याच्या पाठीमागे एक पाण्याचे तळे आहे. हे तळे कधीही पूर्णपणे आटत नसे. रावबहादुर ठुबे यांना देवीचा दृष्टान्त झाला की, मी तळ्यात आहे, मला वर काढ, दृष्टान्ताप्रमाणे श्री. ठुबे यांना तळ्यात लक्ष्मी, पद्मावती आणि अन्नपूर्णा अशा देवीच्या तांदळा स्वरूपाच्या मूर्ती मिळाल्या, त्यांनी देवीची प्राणप्रतिष्ठा केली. रावबहादुर ठुबे यांच्यानंतर काही काळ हा परिसर ओसाड झाला. कालांतराने अप्पा थोरात यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि पूजा अर्चा सुरू केली. तळजाईचा देवी मंदिराला गाभारा आणि सभामंडप बांधण्यात आला. प्रवेश दाराशीच राक्षसांच्या मूर्तीची पडवी, डाव्या हाताला छोटे मारुतीचे मंदिर, देवाच्या पाठीमागे तळजाई, संतोषी माता यांची घुमटाकार मंदिरे बांधण्यात आली. तळ्याकडे जाण्याचा पायऱ्यांचा मार्ग तयार केला.

तळजाई देवी मंदिरामागे दाट जंगल असून ते संरक्षित वन या प्रकारात असल्याने सुरक्षित आहे. तळजाई टेकडीवर सध्या जिथे क्रीडांगण आहे ,तिथेच टेकडीच्या एका टोकास रावबहादूर ठुबे यांचा ब्रिटिशकालीन बांधणीचा बंगला होता. काही ब्रिटिश अधिकारी या बंगल्यात भाड्याने राहत असल्याचा उल्लेख सुद्धा मिळतो. आज या वाड्याची पुरती दुर्दशा आहे.

संदर्भ: पुणे शहरातील मंदिरे – डॉ. शां. ग. महाजन
पत्ता : https://maps.app.goo.gl/EQgYU5G4opSEqX7p6

आठवणी इतिहासाच्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here