महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

खानदेशातील सूफी साधू – फकीर

By Discover Maharashtra Views: 1274 5 Min Read

खानदेशातील सूफी साधू – फकीर :

खानदेशातील फारुकी घराण्याची स्थापना मलिक राजाने केली. फेरिस्ताच्या वृत्तांतानुसार मलिक राजाचे पूर्वज हे दिल्ली दरबारात अल्लाउद्दीन खिलजी आणि मुहंमद तुघलगाच्या कारकिर्दीत मान्यता प्राप्त सरदार होते. चौदाव्या शतकाच्या मध्यावर दौलताबाद येथे अनेक सूफी संत राहात होते. त्यात इमाम उसालेकिन, शेख गुल अरिफीन, मिनार-उन-तारिका, मदर उल हकीकत, ङिायासूद, दुनियाबाद्दीन, मौलाना उर आमिल उर ख्यानी, शाह ङौनुद्दिन ही नावे महत्त्वाची होत. तत्कालीन शाकस या संतांच्या दर्शनार्थ येत असत. मलिक राजा हा सूफी संप्रदायात दीक्षित होता. पुढे मलिक राजाचा मुलगा नासिरखानही सूफी संप्रदायाचा अनुयायी बनला. त्यानंतरचे राजेही या संप्रदायाचे अनुयायी बनल्याचे आढळते.(खानदेशातील सूफी साधू)

चौदाव्या शतकात दौलताबाद येथे गूढवादाशी संबंधित अनेक ग्रंथांची रचना झाली. शेख अबू तालीम मक्वी, इमाम गझाली, शेख फखरुद्दिन अत्तर, शेख शियाबुद्दिन सुहरावर्दी यासारख्या संतांच्या अनेक रचना दक्खिनीतून उपलब्ध आहेत. यासोबतच तुहफान, नासाइह, शमाईतुल अत्कीया, मिराजल आइक्रीन, शिकारनामा यासारखे ग्रंथ लिहिले गेलेत.  या काळातल्या संत साहित्याचा पोत हा अशा प्रकारे नवीन आकलनशक्तिने युक्त होता. खानदेशच्या भूमीवरील हे सुफी तत्त्वज्ञानाचे हे समन्वयात्मक तारु अशाप्रकारे भावसमृद्ध आहे. विविध मानवी विकसनाच्या तप्त जाणिवांनी तृप्प असे आहे.

मलिक राजाने शेख ङोनुद्दिन या आपल्या गुरुकडून प्राप्त झालेली पवित्र मानवस्त्रे आपल्या मृत्युपूर्वी नासिरखानास दिल्यामुळे तो मलिक राजाचा वारसदार बनला होता. नासिरखानने आसिर ताब्यात घेतले. याचा साहजिकच ङौनुद्दिनला आनंद झाला. आपल्या लाडक्या शिष्याचे अभिनंदन करण्याच्या इराद्याने तो खानदेशच्या दिशेने यायला निघाला.

तापी नदीच्या पश्चिम किना:यावर त्याने मुक्काम ठोकला. नासिरखानने आपल्या गुरूला आसिरला यायची विनंती केली पण गुरुने ती विनंती नाकारली. याचे कारण असे की त्याला तापी ओलांडून यायला र्निबध होता. नासिरखानने आपली सर्व मालमत्ता सद्गुरुंच्या चरणी वाहण्याची तयारी दर्शवली. शिष्याच्या या मागणीलाही जैनुद्दिनने स्पष्टपणे नकार दिला. या संदर्भात त्याने एक आदेश असा दिला की, तापीच्या पूर्व किना:यावर एक शहर वसवून त्याला शेख बु:हानुद्दिन यांच्या सन्मानार्थ ब:हाणपुर असे नाव द्यावे. गुरुचा आदेश शिरोधार्य मानून नासिरखानने 1400 साली दोन शहरांची स्थापना केली. संत ङौनुद्दिनच्या सन्मानार्थ तापीच्या पूर्व किना:यावर ङौनाबाद आणि तापीच्या पश्चिम किना:यावर ब:हाणपूर वसवले. ब:हाणपुरला अशा प्रकारे फारुकी राजांच्या राजधानीचा मान मिळाला.

राजा अलिखान हा कला आणि संस्कृतीचा मोठा उपासक होता. आपल्या आयुष्यातील 1576 ते 1597 हा काळ त्याने हानिफा पंथाच्या तत्त्वज्ञानाच्या आचरण व प्रचारार्थ घालवला. खानदेशचा राजा आदिलखान फारुकी दुसरा याच्यावर गुजरातमधील संत शहाबाज यांचा विशेष प्रभाव होता. खानदेशच्या अनेक संतांवर त्यांचा प्रत्यक्ष प्रत्यक्ष प्रभाव दिसून येतो. अनेक राजांनीही त्याचे शिष्यत्व स्वीकारले होते. फारुकी सुलतान हे इस्लामी पंथाचे उपासक होते. त्यापैकी अनेक सूफी संप्रदायाचे उपासक बनले. अनेकांनी राज्य प्राप्तीसाठी सुफी संतांचा आशिर्वादही प्राप्त करून घेतला. सूफी संतांच्या पाठिंब्यामुळे राज्यास बळकटी आणि व्यापक जनसमर्थन लाभत होते. सूफी संतांच्या अशाप्रकारे फारुकी राजसत्तेला संपूर्ण पाठिंबा मिळाला होता. प्रसंग राजकीय संकटांचे असोत वा समरांगणातल्या झुंजी असोत  सुफी संतांनी दिलेले सल्ले त्यांना उपयोगी ठरले. जनहानी टळली. राज्ये बलशाली बनलीत. अशा पद्धतीने सूफी संतांच्या सहकार्याने आणि सल्ल्याने राज्यव्यवस्था आणि राजशकट हाकलण्यासाठी राजांना मदत होत असे. संतांच्या प्रत्यक्ष आणि कधी -कधी अप्रत्यक्ष प्रभावाने अशा प्रकारे खानदेशची जनता आणि रयत एका अभिनव पद्धतीने जीवन जगू शकत होती.

महंमद तुघलगाने अनेक सूफी संतांना देवगिरीला आणले. ते तिथेच स्थायीक झाले. शेख निजामुद्दिन चिश्ती या संताचा जन्म खानदेशात झाला. त्यांचे वडिलच त्यांचे गुरू होते. 1748 साली त्यांनी देह ठेवला. संत निझामुद्दिन उर्फ शाह भिकारी ब:हाणपुरला अधून-मधून भेटीसाठी येत जात असत. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची भगिनी वारस म्हणून पुढे आली. शाह भिकारी यांचे निधन ब:हाणपुर येथे 1527 साली झाले.

सय्यद मुहम्मद कादिरी हे खानदेशातील सूफी परंपरेतले प्रभावशाली असे व्यक्तीमत्त्व होते. बगदाद येथे त्यांचा जन्म झाला. खानदेशात असिरगडावरील एका टेकडीवर त्यांचे वास्तव्य असायचे. 1542 साली या सत्पुरुषाचे निधन ब:हाणपुर येथे झाले. मिरन आबा अत्तारी नावाचे एक नामांकित सूफी संत खानदेशात होऊन गेलेत. त्यांचा जन्म गुजरातेत भडोच येथे झाला. त्यांचे गुरू हजरत शाह गैस गवली औरी हे होत. या संताचे निधन 1590 साली झाले. मुहम्मदशाह फारुकीच्या कबरीशेजारीच त्यांची कबर आहे. शत्तार शाखेचे दुसरे मान्यताप्राप्त नाव आहे संत शाह ताकीनाकी मुहम्मद बु:हानुद्दिन इब्राहिम. शहा अंजन औलिया हे खानदेशातील चमत्कारी संत सय्यद आमलुद्दिनमुळे सूफी संत परंपरेत दाखल झाले. यामुळे पंथाला अनेक संतांची साथ मिळाली. त्यांच्या विचाराचाही खानदेशात फार मोठय़ा प्रमाणात प्रचार-प्रसार आढळतो.

मध्ययुगीन काळातील खानदेशातील ब:हाणपूर हे सूफी तत्वज्ञानाच्या अध्ययनाचे मुख्य केंद्र होते. या संत परंपरेचा आणि ज्ञान साधनेचा खानदेशच्या व्यापक अशा सहिष्णु धार्मिक स्वभावाच्या जडण-घडणीवर मोठा प्रभाव दिसून येतो. असिरगड आणि ब:हाणपुर ही चिश्ती संप्रदायाच्या शाखेची खानदेशातील दोन प्रमुख अध्ययनकेंद्र होती. विषमता, गुलामगिरी, जातिवाद आणि माणुसकीला काळिमा फासणा:या गोष्टींना सूफींनी सातत्याने विरोध केला. एका नव्या मानवधर्माच्या उभारणीसाठी हातभार लावला.

वीकेण्ड स्पेशलमध्ये खान्देशातील संताची मांदियाळी या सदरात प्रा.डॉ.विश्वास पाटील यांनी केलेले खानदेशातील सूफी साधू लिखाण लोकमत मधील.

Khandesh Facebook Page

Leave a comment