महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,76,255

श्रीमंत फत्तेसिंह महाराज | अक्कलकोट संस्थांचे पहिले नरेश

By Discover Maharashtra Views: 3936 2 Min Read

श्रीमंत फत्तेसिंह महाराज | अक्कलकोट संस्थांचे पहिले नरेश

छत्रपती शाहूंचे मानसपुत्र असलेल्या श्रीमंत फत्तेसिंह महाराज भोसले यांचा जन्म सन १६९८ साली झाला. यांचे मूळ आडनाव लोखंडे, औरंगाबाद परिसरस्थित शाहूंच्या सैन्यावर सयाजी लोखंडे यांनी हल्ला केला. याच्या प्रतिकारात सयाजी लोखंडे मारले गेले. तेव्हा सयाजी लोखंडेच्या पत्नीने आपले तान्हं पोरं शाहूंच्या पायी घातले. शाहूंच्या महाराष्ट्रामधील आगमनादरम्यान झालेल्या पहिल्या लढाईच्या काळातील हा प्रसंग. पहिलीचं फतेह म्हणून या पुत्राचे नाव फत्तेसिंह ठेवले असेही उल्लेख फत्तेसिंह यांच्या नावाविषयी आढळतात. १७१२ साली शाहूंनी त्यांना सातारा येथे आणले व स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांचे पालनपोषण केले.

साताऱ्यातील वाड्यात यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली होती. शाहूंच्या पत्नी विरुबाई यांचे फत्तेसिंहांवर जिवापाड प्रेम. अगदी पोटच्या पोराप्रमाणे, आणि तेवढ्याचं लाडात आणि उच्च व्यवस्थेत त्यांनी फत्तेसिहांना वाढविले. विरुबाईंच्या मृत्यूपश्चात त्यांचे उत्तरकार्य देखील फतेसिहांनी पार पाडले. यामुळेचं विरुबाई यांच्या नावे असणारी अक्कलकोट प्रांताची जहागीर फत्तेसिंह यांच्यानावे बहाल करण्यात आली.

कर्तबगार, कार्यधुरंदर आणि शाहूंचे मानसपुत्र असल्यामुळे फत्तेहसिहांना दरबारात विशेष मान होता. शिवरायांची राजधानी आणि मराठ्यांचे तख्त असलेला ‘रायगड‘ आणि जिजाऊ राहत होत्या. ते पाचाड १६८९ पासून म्हणजे ४४ वर्षे पारतंत्र्यात होते, तेव्हा फत्तेसिंह भोसले आणि प्रतिनिधी यांनी रायगडला वेढे दिले, मराठ्यांनी सिद्दीचा एक मुलगा आणि एक सेखजी नावाचा सरदार आपल्या बाजूने आणला होता. त्यांना पुढे करून रायगड फंदफितुरीने घेण्याचे प्रयत्न होते. प्रयत्नास यश येऊन ६ जून म्हणजे शिवरायांच्या राज्याभिषेकदिनीच रायगड वर भगवा फडकला. या कामगिरीबद्दल फत्तेसिंह भोसले यांच्या पराक्रमाचा छत्रपती शाहूंनी एका पत्रात विशेष उल्लेख केला.

१७२५ साली झालेल्या दक्षिणेतील स्वारीची संपूर्ण जवाबदारी शाहूंनी फत्तेसिंह यांच्यावर सोपविली होती., याच काळात ते तंजावरच्या छत्रपतींना भेटल्याच्यासुद्धा नोंदी आढळतात. १७३७ साली जेव्हा दक्षिणेत विशेष करून कर्नाटकवर जी स्वारी झाली यात मराठ्यांना घवघवीत यश मिळाले याच नेतृत्व फत्तेसिंह भोसले हेच करत होते, अनेक मोहिमांमध्ये, अनेक विषयांमध्ये अग्रणी असणारे फत्तेसिंह १५ डिसेंबर १७४९ नंतर म्हणजे छत्रपती शाहूयांच्या मृत्यूनंतर अक्कलकोट, आपल्या जाहगिरीत राहावयास गेले. अक्कलकोटच्या भुईकोट किल्ल्यामध्ये त्यांचे वास्तव्य होते. अशा या शाहूंच्या पराक्रमी पुत्राचे २० जानेवारी १७६० रोजी निधन झाले

अक्कलकोट रस्त्याच्या अगदी शेजारीचं दिसणारी तटबंदी म्हणजे अक्कलकोटचा भुईकोट किल्ला होय

फोटो व संकलन – गणेश दिवाणजी सर- अक्कलकोट

Credit – संतोष झिपरे.

Leave a comment