महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,75,381

शिवराई भाग ४

By Discover Maharashtra Views: 3713 2 Min Read

शिवराई भाग ४…

स्वराज्याचे चलन’ या सदरात मागील तिन दिवस आपण पाहिलेल्या शिवाजी महाराजांच्या ‘शिवराई’ नाण्यांवरील लेख हा सारखाच म्हणजे पुढिल बाजुनी तीन ओळीत- ‘श्री/राजा /शिव’ आणि मागील बाजुनी- ‘छत्र/पति’ असा होता. शिवराई हि महाराष्ट्रभर चालायची. तसेच महाराष्ट्रात शिवराई नाणे हे विविध ठिकाणी सापडते याचाच अर्थ की ती नाणी महाराष्ट्रात विविध ठिकाणी टांकसाळीत केली जात असावीत. आपल्याला माहितीए जसे ठिकाण बदलते तसे शब्दाचा उच्चार बदलतो, बोलण्याची पद्धत बदलते.

शिवकाळात टांकसाळी विविध ठिकाणी असल्याने नाण्यावरील लिखाण बदलले असावे. मागील 3 दिवस सादर केलेल्या नाण्यावर ‘शिव’ अंकीत होते तर आज सादर केलेल्या नाण्यावर ‘शिव’ ऐवजी ‘सिव’ मजकुर अंकीत केलेला आहे. सादर केलेले शिवराई नाणे तांब्याचे असुन वजन 7.5 ग्राम आहे. या नाण्यावर पुढील बाजुनी ‘श्री/राजा/सिव’ आणि मागील बाजुनी- ‘छत्र/पति’ असा मजकुर आहे. आपण मागे पाहिलेल्या एक पैसा शिवराई नाण्यांचे वजन साधारण 11 ते 12 ग्राम होते, पण त्याच वजनात मला तरी अजुन ‘सिव’ मजकुर असलेले नाणे पहायला मिळालेले नाहि.

माझ्या वैयक्तिक संग्रहात जी ‘सिव’ मजकुर असलेली नाणी आहेत त्यांचे वजन 5 ग्राम पासुन 10.5 ग्राम पर्यंत आहे. तसेच ‘सिव’ हा पुर्ण मजकुर असलेली नाणी दुर्मिळ असुन काही कमी प्रमाणात आढळतात. या ‘सिव’ मजकुर असलेल्या नाण्यांचे अक्षरवळण देखिल वेगवेगळे आढळलेले आहे. पुढे कधी ती ही नाणी सादर करेन.

आता उद्या भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….

आपलाच
आशुतोष पाटील

Leave a comment