महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,75,220

शिवराई भाग २६

By Discover Maharashtra Views: 3555 1 Min Read

शिवराई भाग २६…

मित्रांनो,
आजचे फुल ‘छ’ आणि ‘त्र’ च्या मध्ये. ‘छ’ आणि ‘त्र’ च्या मधील फुलाचे ३ विविध प्रकार माझ्या संग्रही आहेत ते आपण आजपासून ३ दिवस पाहुयात. आजचा प्रकार पहिला. यात असलेले फुल ३ पाकळ्यांचे असून त्याला खाली दांडीही दिसते. नाण्यावर हे फुल ठळक पण बारीक आहे. बाकी काही चिन्ह नाण्यावर नाही, काही बिंदू पुढील बाजूवर दिसतात पण ते ठळक नाहीत. नाण्याच्या मागील बाजूवरील ‘छ’ चे अक्षरवळन देखील काहीसे वेगळे आहे. बाकी नाण्यावरील मजकुर हा सामान्य दुदांडी नाण्याप्रमाणेच असुन नाण्याचे वजन १० ग्राम आहे.

पुढच्या शिवराई वर ‘फुल’ कोणत्या ठिकाणी असेल ? अंदाज करा आणि कळवा….

आता भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….

Leave a comment