महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,76,277

शिवराई भाग १४

By Discover Maharashtra Views: 3542 1 Min Read

शिवराई भाग १४…

श्री १२३१ अंकित शिवराई काल आपण पहिली. १२३१ सन असलेली एक दुर्मिळ शिवराई आज आपण पाहू आणि ती म्हणजे ‘श्री/ सन १२३१/ राजा’ असा ओळीत मजकूर असलेली शिवराई. या प्रकारच्या शिवराई वर पूर्ण मजकूर येणे फार कठीण असते बहुदा ते नाण्याबाहेरच गेलेले असते. मागील बाजूवर छत्र / पती असाच मजकूर असला तरी पुढील बाजूवरील मजकूर मात्र नेहमीप्रमाणे नाही. आपल्याला माहितीये कि शिवराई नाण्यावर ‘राजा’ या शब्दात येणार ‘रा’ हा मोडी लिपीत असतो तर इतर सर्व अक्षरे हि देवनागरी असतात (देवनागरी ‘रा’ असलेल्या शिवराई देखील आहेत पुढे दाखवेन).

सादर नाण्यावर ‘रा’ व्यतिरिक्त आणखी एक अक्षर मोडी लिपीत आले आहे आणि ते म्हणजे ‘सन’ या शब्दातले ‘स’ हे अक्षर पण ‘न’ मात्र देवनागरिच आहे. मागील बाजूवर ‘छत्र’ ऐवजी ‘छेत्र’ आपल्याला पाहायला मिळते. १० ग्रॅम्स च्या जवळ नाण्याचे वजन असून धातू तांबे आहे.

आता उद्या भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….

Leave a comment