महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,20,069

शिवाजी महाराज जुलियस सिजर, अलेक्सण्डर ह्या प्राचीन काळातील वीरांपेक्षा चपळ

By Discover Maharashtra Views: 3596 3 Min Read

शिवाजी महाराज जुलियस सिजर, अलेक्सण्डर ह्या प्राचीन काळातील वीरांपेक्षा चपळ

LIVRO DÃS MONÇÊOS

गोव्याच्या व्हॉईसरॉय ने पोर्तुगीज राजास पाठवलेल्या पत्रात शिवाजी महाराजांनी आग्र्याहून अदभूतरम्य पलायन केल्याचा वृत्तांत सादर केला आहे . ह्या पत्रात त्याने शिवाजी महाराज जुलियस सिजर , अलेक्सण्डर ह्या प्राचीन काळातील वीरांपेक्षा चपळ असा सत्ताधीश ह्याची नोंदणी केली ती अशी –

[ As ashieias , o valor , o activadade , e a prudencia militar deste homē que se pode igoalar Cõ a doz Cesares e Alexandres , e fim sentoor he homē que estã em parte a nao tem logar cer o em, mehiia e Farguerra a Jõdã Asia ]

Translation –
शिवाजी महाराज आग्रा कैदेतून मोठ्या शिताफीने बाहेर पडला. तो सलग प्रत्येक नियोजन पूर्वक क्षणाला आपल्या देशाकडे कूच करू लागला.शिवाजी राजे स्वताच्या मुलुखात पोहोचल्याचे कळताच आदिलशाही सत्तेने त्या विरुद्ध हालचाली करण्या हेतू ४०,००० घोडेस्वार व मोठे पायदळ गोळा केले व तो घाटाखाली उतरला . आदिलशाही आमच्या हद्दीपासून अवघ्या ६ मैलाच्या अंतरावर होता व त्याने जाळपोळीचे आणि लुटमारीचे सत्र सुरु करताच शिवाजी राजियांनी त्याच्या सेनापतीकडे
एक मोठा नजराणा पाठवला , त्या नाजरण्यास पाहून सेनापती खुश झाला व आपल्या सैन्यास आवरते घातले . शिवाजी राजा ह्याच संधी ची वाट पाहत होता .

तो एका विजेप्रमाणे कोकणात शिरला व त्याने आदिलशाही सेनापतीला जे द्रव्य भेट म्हणून पाठवले होते त्या द्रव्याचे तिप्पट द्रव्य शिवाजी ने त्याच्याकडून वसूल केले . त्याने कोकणातील अनेक देसायांना आपल्या अंगी अंकित केले आणि आता शिवाजी फोंडा महालात आमच्या हद्दीपासून अगदी जवळ येऊन पोहोचला होता . चातुर्य , चपळता , लष्करी बुद्धी , पराक्रम ह्याची तोड जुलिअस सिजर आणि अलेक्सण्डर पेक्षा बलाढ्य अशी नोंद करावी लागेल. शिवाजी जिथे नाही अशी एक हि जागा आता उरली नाही , आणि तो आता संबंद आशिया मधे यवनी सत्ते विरुद्ध युद्ध करीत आहे .

मोगल बादशहा कडे लक्षावधी सैन्य असून पण ह्या सैन्याला न जुमानता शिवाजी ने सुरत शहर लुटले . मोगल सैन्याप्रमानेच आदिलशाही सैन्य शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या बाजूस होते , परंतु शिवाजी ह्या दोन्ही बलाढ्य शत्रूंमधून अगदी सुरक्षितपणे आपल्या मुलुखात परतला . जमिनीप्रमाणे त्याचा समुद्रावरही शिवाजीचाच दरारा आहे . आणि आम्हाला त्याच्या आरमाराची आणि नौसेनादलची भीती वाटते , कारण समुद्रावरही त्याचे किल्ले आहे . त्याच्या जवळ असलेल्या नौका जरी सगळ्याच मोठ्या नसल्या तरी त्याच्या कडे लहान नौका हे फार चपळाईने समुद्रावर हल्ले चढवतात .

संकलन – अमित राणे

Ref : पोर्तुगीज दप्तर , आशिया विभाग

माहिती साभार – मराठा रियासत (स्वराज्याचे शिलेदार)

Leave a comment