महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,74,853

सरदार बोबडे गढी

By Discover Maharashtra Views: 3154 2 Min Read

सरदार बोबडे गढी, बिबी…

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील बिबी गावात सरदार बोबडे यांची गढी आहे. सरदार बोबडे गढीची तटबंदी मजबूत अवस्थेत आहे आणि प्रवेशद्वार मोडकळीस आले आहे. बाकी त्याची भव्य जागा शिल्लक आहे सगळी पडझड झालेली आहे.

बोबडे हे ऐतिहासिक घराणे आहे, स्वराज्याच्या अगदी सुरुवाती पासून ते शिवरायांसोबत होते. सरदार अमृतरावा बोबडे ह्यांचा उल्लेख अफजलखान भेटीवेळेसच्या अंगरक्षांमध्ये येतो. तसेच सरदार संताजी बोबडे यांनी सुरतेच्या लुटीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. जी काही संपत्ती आणली होती ती लोहगडाला सुरक्षित आणून पुढे राजगडावर पोचवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. पण सरदार संताजी बोबडे हे पुरंदर परिसरातील होते असा उल्लेख येतो.

बोबडे हे आडनाव कसे पडले या बद्दल एक आख्यायिका आहे ती अशी की जावली फलटणजवळील येथे सिद्धनाथाला नवसपूर्तीसाठी जीभ कापून दिली म्हणून त्यास बोबडे हे आडनाव पडले. गावातील मंदीराच्या आवारात मोठया प्रमाणात विरगळ व धेनुगळ दिसुन येतात. गढीचे पश्चिमाभिमुख प्रवेशद्वार त्याची लाकडी कमान व दरवाजासह आजही सुस्थितीत असुन दरवाजावरील भाग मात्र पुर्णपणे ढासळला आहे. चौकोनी आकाराच्या या गढीचा आतील परीसर अर्धा एकर असुन गोलाकार बुरुज आहेत. तटबंदीच्या आतील भागात मोठया प्रमाणात देवड्या येतात. तटबंदीवर जाण्यासाठी तीन ठिकाणी जिने आहेत. गढीची दक्षिण बाजुची तटबंदी मोठया प्रमाणात ढासळली आहे. गढीच्या आतील आवाराचे मोठया प्रमाणात सपाटीकरण केल्याने कोणतेही वास्तु अवशेष शिल्लक नाहीत. गढीच्या एका कोपऱ्यात गढीचे वंशज बोबडे पाटील यांचे नव्याने बांधलेले घर आहे. वतने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढीकोट उध्वस्त होत आहेत. स्थानिकांची उदासीनता देखील या गढीकोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे.

टीम- पुढची मोहीम

Leave a comment