किल्ले सांगोला

Sangola Fort | किल्ले सांगोला

किल्ले सांगोला –

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या तालुक्याच्या गावी एक भुईकोट किल्ला होता. सद्यस्थितीत एकच बुरूज पहायला मिळतो. सांगोला हे पंढरपूरपासून साधारण ३० कि.मी. अंतरावर आहे. सांगोला हे पंधराव्या शतकाच्या आसपास इंगोले सरदारांनी वसवले. बाबाजी लखमाजी इंगोले आणि त्यांची पाच मुले यांनी माणगंगा नदीपासून जवळच हे गाव वसवले आणि किल्ले सांगोला बांधला. हे सहा इंगोले होते यांनी गाव वसवले म्हणून गावाला सांगोले असं नाव पडले. इंगोलेंना आदिलशाहीकडून देशमुखी मिळाली होती. आदिलशहाने त्यांना ७२ गावे वतन म्हणून दिली होती.

अफजलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी वाई ते कोल्हापूरचा सगळा परिसर ताब्यात मिळवला. तेव्हा नेताजी पालकरांनी इ.स. १४ नोव्हेंबर १६५९ ला हा किल्ला ताब्यात घेतला. पुन्हा इ.स. १६६३ मध्ये आदिलशहाने हा किल्ला मिळवला. नंतर इ.स.१६६५ च्या डिसेंबरमध्ये मिर्झाराजे जयसिंग सोबत महाराजांनी  किल्ला जिंकून घेतला. इ.स. १६७९ ला किल्ला इंगोले सरदारांना भेट दिला. पुढे दिलेरखान पठाण या मोगल सरदाराच्या ताब्यात गेला परत हंबीरराव मोहितेंनी तो किल्ला जिंकला. इ.स. १६९० पासून किल्ला मोगली राजवटीखाली आला.

इ.स. १७५० मध्ये बाळाजी बाजीराव यांस ताराराणींचे सरदार यमाजीपंत शिवदेव यांकडून विरोध झाला. इ.स. १८०२ मध्ये होळकरांच्या पठाणांनी किल्ल्याची लूट केली.

टीम- पुढची मोहीम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here