सह्याद्री प्रतिष्ठान

सह्याद्री प्रतिष्ठान

सह्याद्री प्रतिष्ठान…

!! सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र कडून वर्षभर राबविण्यात येणारे उपक्रम आणि मोहिमा !!

१)  या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत ७५० हुन अधिक दुर्गसंवर्धन मोहिमा महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यांवरील राबविल्या आहेत. तसेच आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून १५०० हुन अधिक दुर्गदर्शन मोहिमा पूर्ण देशभरात राबविण्यात आल्या आहेत.
२) छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा, तसेच दुर्गसंवर्धन कार्याचा प्रसार होण्यासाठी दरवर्षी ३ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी शिवजन्मभूमी जन्मतीर्थ किल्ले शिवनेरी ते दुर्गदुर्गेश्वर शिवतीर्थ किल्ले रायगड अशा ५ दिवसांच्या भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करून त्यावर आधारित शिवरथ या माहितीपटाची निर्मिती करून संपूर्ण महाराष्ट्रभर या सोहळ्याचा प्रसार होण्यासाठी मोफत सी डी चे वितरण केले जाते.
३) हे हि नसे थोडके म्हणून प्रतिष्ठान तर्फे हिंदवी स्वराज्याच्या सुवर्णकालीन इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन व्हावे यासाठी सततचा पाठपुरावा पत्र, निवेदने यामार्फत महाराष्ट्र सरकारकडे केला जातो.
४) गड-किल्ल्यांच्या बाबतीत उदासीन पुरातत्व खाते तसेच झोपेचे सोंग घेणारे महाराष्ट्र सरकार यांना जागे करण्यासाठी शिवदुर्ग अस्मिता आंदोलनाच्या माध्यमातून निदर्शने, उपोषणे, जेलभरो, रास्तारोको अशा आंदोलनातून जनजागृती करण्याचे प्रयत्न केले जातात.
५) महाराष्ट्रातील ४०० किल्ल्यांचे संवर्धन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून सह्याद्री प्रतिष्ठान कायदेशीर लढा देत आहे. या जनहित याचिकेवर सरकारने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत महराष्ट्रातील ४६ गड-किल्ले, ऐतिहासिक मंदिरे, समाध्या, वास्तू यांच्यासाठी ४६ कोटी ९० लाख रुपये महाराष्ट्र शासन यांच्याकडून मंजूर केले आहेत.

६) सह्याद्री पुरस्कार, शिवदुर्ग अस्मिता पुरस्कार, शिवरथ पुरस्कार सोहळा, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भक्ती शक्ती उद्यान निगडी पुणे ते रौद्रशंभो जन्मभूमी किल्ले पुरंदर स्वाभिमान यात्रा, महाराष्ट्रातील ४०० किल्ल्यांचे ४५००० फोटोंचे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेलं प्रदर्शन, शिवप्रेमी व दुर्गप्रेमी यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्व समजून देण्यासाठी प्रसिद्ध इतिहासकारांची व्याख्याने व मार्गदर्शन असे अनेक उपक्रम सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र कडून राबविण्यात येत आहेत.
७) गड-किल्ल्यांची माहिती असलेली www.sahyadri pratishthan.com हि वेबसाईट तसेच, विविध पुस्तके प्रतिष्ठानकडून प्रकाशित करून ती दुर्गप्रेमींना मोफत वितरीत केली जातात. तसेच गडकिल्ल्यांच्या व स्वराज्यासाठी साठी लढलेल्या मावळ्यांची व सरदारांची माहिती, प्रतिष्ठान ची माहिती असलेले अँड्रॉईड ऍप्लिकेशन बनविण्यात आले आहे.
८) सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन प्रतिष्ठानकडून आरोग्य, शैक्षणिक, पर्यावरणविषयक कार्यक्रम असे अनेक उपक्रम वर्षभर राबविले जातात.
९) यापुढेही महाराष्ट्राच्या इतिहासात एक पाऊल पुढे टाकत एक नवीन इतिहास घडविण्याचा पराक्रम सह्याद्री प्रतिष्ठानने केला आहे, तो म्हणजे दुर्गसंवर्धन चळवळ या विषयवार १२ पोवाड्यांची निर्मिती आणि प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान याचे रेकॉर्डिंग करण्यात आले असून लवकरच त्याच्या सी डी अगदी माफक दारात दुर्गप्रेमींना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
१०) छत्रपती संभाजी महाराजांची जन्मनोंद शालेय पाठ्यपुस्तकात व्हावी म्हणून आंदोलन करण्यात आले होते. सन २०१४ च्या पाठ्यपुस्तकात जन्मतारखेची नोंद याचे लेखी पत्र प्रतिष्ठानला मिळाले.

महाराष्ट्रातील २०० किल्याचे संवर्धन व्हावे याकरिता २०० पत्रे !

११) सिंहगड किल्ल्यावरील कल्याण दरवाजा यासाठी यशस्वी आंदोलन मुख्यमंत्री विशेष निधीतून १ कोटी ७५ लाख मंजूर.
१२) दुर्गसंवर्धन चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचावी या हेतूने प्रतिष्ठानकडून दुर्गसंवर्धन या विषयावर व्याख्यानांचे आयोजन अगदी मोफत.
१३) समाजातील उपेक्षित गरीब लोकांसाठी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत हजारो कुटुंबाना अन्नधान्य, कपडे, दिवाळी साहित्य सप्रेम भेट देण्यात आले.
१४) शौर्या तुला वंदितो या कार्यक्रमांतर्गत १९६५, १९७१, १९९९ या लढाईतील पाकिस्तान विरुद्ध लढलेल्या समरसेनानींचा ऐतिहासिक कृतज्ञता सन्मान सोहळा मध्ये सन्मान करण्यात आला आहे. तसेच नक्षली चलवळीविरुद्ध लढलेल्या पोलीस बांधवांचाही सन्मान करण्यात आला आहे.
१५) इतिहासाच्या पाऊलखुणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून इतिहासाचे आणि गडकिल्ल्यांचे महत्व समाजातील प्रत्येक जनमाणसांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रतिष्ठान कटिबद्ध आहे.

१६) दुर्गसंवर्धन कार्यातील एक वेगळा उपक्रम म्हणून स्वराज्याचे प्रवेशद्वार या उपक्रमांतर्गत प्रतिष्ठान च्या वतीने लोकसहभागातून पवन मावळातील किल्ले तुंग येथे गडाच्या दरवाजाला सागवानी लाकडी कवाड बसविण्यात आले आहे. तसेच संस्थेचा किल्ले तोरणा येथील महादरवाजा येथेही प्रवेशद्वार बसविण्याचा मानस असून त्यासाठी लागणारा निधी हा लोकसहभागातून जमा करण्यात आलेला आहे.
१७) किल्ले कोरीगड येथील तोफांसाठी तोफगाडे बसविण्यात यावेत म्हणून राज्य पुरातत्व खाते यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्याठिकाणी तोफगाडे बसविण्यात आले.
१८) शिक्षणातून दुर्गसंस्कार या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शनासोबत गडककिल्ले आणि त्यांचे महत्व, गडांचे संवर्धन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले जाते.
१९) किल्ले जंजिरा या ठिकाणी कायमस्वरूपी राष्ट्रध्वज तिरंगा फडकत रहावा म्हणून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. तसेच त्या कार्यास पाठिंबा म्हणून संपूर्ण राज्यातील खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थाचे सदस्य, अध्यक्ष, ग्रामपंचायत तसेच प्रतिष्ठित व्यक्ती यांचेही पाठपुरावा पत्र जमा करण्यात आले आहेत. तसेच जोपर्यंत राष्ट्रध्वज उभा राहत नाही तोपर्यंत हा पाठपुरावा सुरू राहणार आहे.
२०) महाराष्ट्रातील जलदुर्ग किल्ल्यावर देशातील सर्वांत उंच भगवा ध्वज बसविण्यासाठी लोकसहभागातून आर्थिक निधी उभारून नियोजन सुरू आहे.

२१) पवन मावळातील किल्ले तिकोणा याठिकाणी महादरवाजाला लाकडी सागवानी कवाड बसविण्यात येणार आले असून दिनांक ८ जून २०१८ रोजी लोकार्पण सोहळा करण्यात आला. यासाठी लागणारा सर्व खर्च लोकसहभागातून करण्यात आलेला आहे.
२२) किल्ले सिंहगड येथील तोफेसाठी तोफगाडा तयार करून राज्य पुरातत्व विभाग यांना तो दान करून दिनांक १८ जून २०१८ रोजी त्याचा लोकार्पण सोहळा करण्यात आला आहे. यासाठीचा सर्व खर्च लोकसहभागातून करण्यात आलेला आहे.
२३) नटवर्य श्री. श्रीराम गोजमगुंडे यांच्या नावाने कलाक्षेत्रातील दिग्गज कलाकारांना रंगकर्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

!! ना नावासाठी ना स्वार्थासाठी !! जीव तळमळतो फक्त राजांच्या गड-किल्ल्यांसाठी !!
अधिक माहिती – ७३८७४९४५००

17 COMMENTS

  1. सर मी खूप इच्छुक आहे तुमच्या सोबत काम करायला पण कुटुंबाच्या जबाबदारी मुळे खूप तडजोड करून सुद्धा वेळ काढणे कठीण जाते,
    मी फुल नाही फुलाची पाखळी का होईना हातभार लावण्यास नशीबवान समजतो मला आपला खाते क्रमांक पाठवावा ही विनंती

  2. नमस्कार,
    !! जय भवानी जय शिवराय !!

    मी अमित चंद्रकांत सावंत राहणार ठाणे, एक शिवभक्त. सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून गडकिल्ले संवर्धनाच्या मोहिमेत मी ही काम करण्यास ईच्छूक आहे.. आपणास माझी नम्र विनंती आहे की ह्या मोहिमेत मला ही सहभागी करून घ्यावे.
    धन्यवाद.
    एक मावळा
    अमित चंद्रकांत सावंत

  3. mla sahyadri prtistan khup mnapasun vachayla aavdel mi he ek shivbhakt ahe. mla he sahyadri pratistan sati kahi karaychi iccha he

  4. सर जनजागृती करून तला गलातला माणूस जोडण्याचे काम करताय खूप छान , नासिक हून टीम असेल तर आम्ही जॉईन होऊ शकतो का , दुर्ग संवर्धन कामी आमचा हातभार लागेल
    विशाल पवार
    9730732336

  5. माझं नाव सुनील सुरेश निवळे राहणार भिवंडी जिल्हा ठाणे मला पण तुमच्या या कार्यामध्ये सहभागी व्हायचं आहे
    माझा व्हाट्सअप नंबर 8291533125

  6. 7263024334 ग्रुप ला सामील व्हायचं आहे. किल्ले सवर्धन होणे काळाजी गरज आहे

  7. प्रथमेश यशवंत जाडे 7498379424 दापोली-रत्नागिरी
    मला ह्या दुर्ग संवर्धन कार्यात सहभागी करून घ्यावे ही विंनती

  8. विनय पाटील -9372725336
    शिवप्रभुंचा इतिहास जगण्यासाठी आणि सह्याद्रीच्या कड्यानी मजबूत केलेल्या गडकोटांच्या संवर्धन कामासाठी आपान सहभागी करून घ्यावे ही विनंती.

  9. जय शिवराय
    add no 8793770331
    address . पुणे सिंहगड
    ग्रुप add me

  10. आपल्याला ही वाटते आपले राज्यांचे नाव गाजतय तसे त्यांचे किल्ले पण ऐतिहासिक पर्यटकांसाठी बघायला मिळाले पाहिजेत. महराष्ट्रातील सर्वात जुने किल्ले तसेच एकमेवकिल्यांची महाराज्यांच्या काळातील कलाकृती ARCHITECH आताच्या पिढीला माहीत झालं पाहिजे की त्यांचे किल्ले अजून आहेत. कील्यांवर पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय असे काही राहिले पाहिजेत.किल्ल्यांमध्ये स्वच्छता असावी.आणि कुठेही कुण्याही व्यक्तीने आपले नाव कोरू नयेत याकडे लक्ष द्यावं, नाही तर अस्त ना कुनिपण लिहीत ” Shyam ❤️ Nandini” असे. सह्याद्री प्रति्ठानने खूप किल्ले स्वच्छ केली आहेत आणि त्यांचं काम अस सतत चालत राहेल तर देशातील असे सर्व किल्ले स्वच्छ होतील आणि पुनः ते जिवितपणे देशाच्या नजरेत येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here