महाराज…. !

अष्टप्रधान मंडळ | स्वराज्याचे छत्रपती आणि अष्टप्रधानमंडळ

महाराज…. !

महाराज खरं सांगतुया बगा आमची लायकीच न्हाय व आमची लायकीच न्हाय…तुमी अन आमच्या बापजाद्यांनी जितं त्या गडकोटांच्या रक्षणासाठी आपल्या रक्ताचं पाणी केलं, ते गडकोट राखलं, पण आमच्या पिढीला त्याचं काय बी देणं घेणं न्हाय बगा. अव महाराज आमी फकस्त तुमचा जयंतीच्या दिवशीच जयघोष करतो, आन आमचं निर्लज्ज राजकारणी तुमच्या जन्माच्या दिवसाचं भांडवल करून आमच्या आमच्यात च भांडणं लावून मजा बगत बसत्यात. पण तुम्ही अन मावळ्यांनी राखलेल्या गडकोटांसाठी कुणाकं बी येळ न्हाय बरका… आमची काही हुशार तर फकस्त काय त्ये फेसबुक का काय तिथं तुमचा फोटु टाकत्यात अन लाईक च्या भिका मागतात. महाराज अव लय वंगाळ मंडळी हायेत व ही… काही काही बेणी तर गडावर अशी नावं लिव्हत्यात जसा काय त्यो गड त्याच्या बा नं च बांधला हाय. महाराज तुम्ही अन आमच्या बापजाद्यांनी राखलेलं गडकोट लय वंगाळ अवस्थेत आहेत व.

महाराज पण खरं सांगतो काही मंडळी आहेत त्ये ह्या गडकोटांसाठी जीवाचं रान करत्यात. त्यांच्या कार्याला बळ द्या महाराज..

अव मंडळी नुसतं वाचून लाईक नकोत बरका तुमचं
ह्या गडकोटांच्या संवर्धन कार्यात तुमचा बी सहभाग पाहिजे.
वाट नका बगू कुणाची तुमी सहभागी व्हा जग आपोआप सोबत येईल.
अधिक माहिती आणि सहभागी होण्यासाठी
७३८७४९४५००

#सह्याद्रीचे_दुर्गसेवक
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here