महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,74,557

दुर्गसंवर्धन शिवकार्य

By Discover Maharashtra Views: 3710 1 Min Read

दुर्गसंवर्धन शिवकार्य

गडकिल्ले हे आपल्या सुवर्णमय इतिहासाच्या अतुलनीय पराक्रमाचे साक्षीदार आहेत. तेच आपल्याला इतिहासाच्या घटनांची आठवण करून देणारे एकमेव घटक आहेत. त्या गडकिल्यांच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक नागरिकाने कटिबद्ध व्हायला हवं आहे. ह्या दुर्गसंवर्धन चळवळीच्या कार्यात प्रत्येक सजग नागरिकाने सहभागी व्हायला हवे आहे. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत काही संस्था हे काम अगदी जीवापाड करत आहेत.

“सह्याद्री प्रतिष्ठान” चे दुर्गसेवक त्या दुर्गसंवर्धन चळवळीच्या कामासाठी अव्याहतपणे आणि अखंडपणे करत आहे. संस्थेने लोकसहभागाच्या माध्यमातून आजपर्यंत #तुंगप्रवेशद्वार, #तिकोणाप्रवेशद्वार, #सिंहगड_तोफगाडा ही कामे केलेली आहेत. ह्या कामानंतर आता असेच आपल्या सर्वांच्या लोकसहभागाच्या माध्यमातून जिथं महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधलं त्या तोरणा किल्याच्या प्रवेशद्वाराचे काम प्रगतीपथावर आहे.

गडकोट हा आपला अनमोल ठेवा आहे आणि तो जपला पाहिजे, संवर्धित केला पाहिजे यासाठी प्रयत्नशील राहणाऱ्या समाजातील प्रत्येक नागरिकांना आम्ही दुर्गसेवक आवाहन करत आहोत. किल्ले तोरणा च्या प्रवेशद्वारासाठी आपल्या अनमोल सहकार्याची आवश्यकता आहे. अधिक माहिती – ७३८७४९४५००

#बँकखातेतपशील
सह्याद्री प्रतिष्ठान
सिंडिकेट बँक
शाखा – चिंचवड पुणे – ४११०१९
खाते नंबर ५३२२२०१००७९९०६
आय एफ एस सी कोड : SYNB0005322

Leave a comment