महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,19,833

कैलास पर्वत हलवताना दशानन

By Discover Maharashtra Views: 1493 2 Min Read

कैलास पर्वत हलवताना दशानन (रावणानुग्रह शिवमूर्ती) –

जटाटवी-गलज्जल-प्रवाह-पावित-स्थले गलेऽव-लम्ब्य-लम्बितां-भुजंग-तुंग-मालिकाम्ड,
मड्डमड्डमड्डम-न्निनादव-ड्डमर्वयं चकार-चण्ड्ताण्डवं-तनोतु-नः शिवः शिवम्.

शिव तांडव स्तोत्र निर्मितीचा प्रसंग दर्शवणारे वेरूळ च्या कैलास मंदिरातील हे शिल्प मुख्य कैलास मंदिराच्या दक्षिणेकडे आलिंदाच्या खाली आहे. लंकाधिपती रावण कुबेराचा पराभव करून कैलास पर्वतावर शिवाचे दर्शन घेण्यास आला आहे. शिवपार्वतीची क्रीडा चालू असल्याने द्वारपालांनी रावणाला अडवले आहे. गर्वोन्मत्त अशा चिडलेल्या रावणाने कैलास पर्वतच उचलण्याचा निश्चय केला आहे. एका गुहेसारख्या खोबणीमध्ये जाऊन दशानन रावण आपल्या सर्व शक्तीनिशी कैलास हलविण्याचा प्रयत्न करीत आहे. जणू या कैलास मंदिरालाच हलविण्याचे प्रयत्न तो करत आहे असे हे शिल्पं पाहिल्यावर आपल्याला वाटते.(कैलास पर्वत हलवताना दशानन)

कैलास उचलताना रावणाने एक पाय गुढग्यात मुडपून दुसरा पाय जमिनीवर घट्ट रोविला आहे. आपल्या वीस हातांनी सर्व शक्ती पणास लावून त्याने कैलास अर्धवट उचललेला आहे. त्याचे प्रयत्न, करकरा दांत खाणे, ताणलेले स्नायू शिल्पकाराने अप्रतिम दाखवले आहे. कैलासावर शिव अत्यंत शांतपणे बसलेला दाखविला असून भ्यालेली पार्वती शंकराला बिलगलेली आहे. पार्वतीच्या जवळ उभी असलेली सेविका भयभीत होऊन पळत सुटली आहे.

भयभीत पार्वतीला निर्विकार शंकर धीर देत असून एका पायाच्या अंगठ्याने कैलास दाबून धरत आहे. कैलासाखाली दाबला गेलेला रावण शिवतांडव स्तोत्रा मधून शिवाची स्तुती करत आहे. आकाशात अष्टदिक्पाल रावणाचे हे गर्वहरण पहावयास जमले आहेत. कैलासावरील या सर्व व्यक्तींच्या हालचाली व रावणाचा प्रयत्न जणू काही डोळ्यांपुढे प्रत्यक्ष घडणारीच गोष्ट आहे, असा क्षणभर आपल्याला भास होतो.

Rohan Gadekar

Leave a comment