महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,34,523

पानिपत : गैरसमज

By Discover Maharashtra Views: 1628 5 Min Read

पानिपत : गैरसमज –

१४ जानेवारी १७६१ या दिवशी मराठा सैन्य व अहमदशहा अब्दाली यांच्यात युद्ध झाले . लाख बांगडी फुटली , दोन मोती गळाले , २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही . पानिपातावरील मराठा वीरांना नतमस्तक होणारे काही व्हाट्सएप्प मँसेज निदर्शनास आले . सदर मँसेजमध्ये काही पानिपत गैरसमज आढळून आले ते पुढीलप्रमाणे.

( १ ) मराठ्यांचा युद्धात पराभव झाल्यामुळे याच कारणाने आमच्या आयाबहिणी संक्रांति सारख्या मोठ्या सणाला काळी वस्त्रे परिधान करतात .

( २ ) १४ जानेवारी १७६१ रोजी मकरसंक्रांत हा सण होता .

( १ ) मराठ्यांचा युद्धात पराभव झाल्यामुळे याच कारणाने आमच्या आयाबहिणी संक्रांति सारख्या मोठ्या सणाला काळी वस्त्रे परिधान करतात .

संक्रांतीच्या दिवशी काळया वस्त्रांना महत्त्व दिले जाते. कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात. म्हणून काळया साडया, काळी झबली, अशी वस्त्रे संक्रांतीच्या सुमारास कापड बाजारात दिसू लागतात. नवविवाहित मुलींसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. लग्नानंतरच्या प्रथम येणा-या संक्रांतीला नवविवाहित मुलींसाठी खास काळया रंगाच्या वस्त्रांची खरेदी केली जाते. त्यांना हलव्याचे दागिने घालतात व सुवासिनींना हळदीकुंकवासाठी बोलावतात. त्यांना तिळगुळाच्या वडया किंवा तीळ आणि साखरेपासून बनवलेला हलवा देतात. एखादी उपयुक्त वस्तू सुवासिनींना भेट म्हणून दिली जाते. त्याला ‘आवा लुटणे’ असे म्हणतात. भारतीय संस्कृतीत काळा रंग अशुभ मानला जातो, मात्र काळे कपडे परिधान करून साजरा केला जाणारा संक्रांत हा सण एकमेव आहे. या दिवशी सुवासिनी काळ्या रंगाची साडी तर पुरूष काळ्या रंगाचा कुर्ता पायजामा परिधान करीत असतात. सकाळच्या पहरी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे संक्रांतीचा सण साजरा केला जातो. संक्रांतीपासून सूर्य मकरराशीत प्रवेश करतो. या दिवसापासून उत्तरायणाला प्रारंभ होतो. उत्तरायणात सूर्यदेवतेची उपासना करण्याचा प्रघात आहे.

संदर्भ :- https://zeenews.india.com/…/makran-sankranti…/458274

मकरसंक्रांतीच्या वेळेस काळे कपडे घालणे हा एक मार्केटिंगचा भाग असावा . आजकाल नवरात्रीत ९ रंगाच्या वेगवेगळ्या साड्या परिधान करणे या सारख्या स्पर्धा आयोजित होत आहेत तसाच हा देखील एक प्रयत्न असावा. परंतु एक निश्चित काळे कपडे परिधान करण्याचा पानिपत युद्धाशी काहीही संबंध नाही .

( २ ) १४ जानेवारी १७६१ रोजी मकरसंक्रांत हा सण होता

मकरसंक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो . हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे पृथ्वीची सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा सूर्याच्या आणि ताऱ्यांच्या स्थीतीवर अवलंबून असते . पृथ्वीचा आस कलल्यामुळे हिंदू पंचांगात दरवर्षी अयनवृताच्या वर्षाच्या २०.४ मिनिटे पुढ जात . त्यामुळे मकरसंक्रांती दर वर्षी या दोन पद्धतीने वेगळ्या दिवशी येईल . इ.स. २८५ मध्ये दोन्ही कँलेंडरमध्ये एकाच दिवशी म्हणजे २१ डिसेंबरला संक्रांत होती . नंतर हिंदू संक्रांत दार वर्षी २०.४ मिनीटांनी पुढे सरकली , त्यामुळे १७६० आणि १७६१ मध्ये संक्रांत १० जानेवारीला होती. अडीचशे वर्षानंतर २०११ मध्ये संक्रांत १५ जानेवारील होती.

संदर्भ :- सॉलीस्टस अॅट पानिपत मराठी : उदय कुलकर्णी

१० जानेवारी १७६० रोजी उत्तरेत यमुनातीरी बुराडी घाटावर दत्ताजी शिंदे यांना वीरमरण आले त्यादिवशी मकरसंक्रांत होती.

मकरसंक्रांतीच्या बदलत गेलेल्या तारखा ( साभार विकीपिडीया )

इंग्लिश महिन्यानुसार हा दिवस बहुधा १४ जानेवारी रोजी येतो. परंतु दर काही वर्षांनी ही इंग्रजी तारीख एकएक दिवस पुढे जाते. उदा०

इसवी सन १६०० : ९ जानेवारी (पौष कृष्ण अष्टमी शके १५२१)

इसवी सन १७०० : १० जानेवारी (प़ौष कृष्ण षष्ठी शके १६२१)

इसवी सन १८०० : ११ जानेवारी (पौष पौर्णिमा शके १७२१)

इसवी सन १८५० : १२ जानेवारी (पौष कृष्ण चतुर्दशी शके १७७१)

सन १९०० ते २१०० या वर्षांतील मकरसंक्रांतीच्या तारखा अश्या होत्या किंवा असणार आहेत :-

१३ जानेवारी : सन १९००,१९०२, १९०५, १९०९, १९१३, १९१७, १९२१, १९२५ आणि १९२९.

१५ जानेवारी : सन १९७२, १९७६, १९८०, १९८४, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४, २००८, २०११-१२, २०१५-१६, २०१९-२०, २०२३-२४, २०२७-२८, २०३१-३२, २०३५-३६, २०३९-४०, २०४३-४४, २०४७-४८, २०५०-५१-५२, २०५४-५५-५६, २०५८-५९-६०, २०६२-६३-६४, २०६६-६७-६८, २०७०-७१-७२, २०७४-७५-७६, २०७८-७९-८०, २०८२-८३-८४ आणि २०८६ ते २१००.

१४ जानेवारी : सन १९०० ते सन २१०० या २०१ वर्षांच्या कालावधीतील ज्यांचा उल्लेख वर आला नाही अशी सर्व वर्षे.

१६ जानेवारी २१५० (पौष कृष्ण तृतीया शके २०७१)

१७ जानेवारी २२०० (पौष शुक्ल प्रतिपदा शके २१२१)

१८ जानेवारी २२५० (पौष शुक्ल चतुर्दशी शके २१७१)

१९ जानेवारी २३०० (पौष कृष्ण त्रयोदशी शके २२२१)

२० जानेवारी २४०० (पौष कृष्ण नवमी शके २३२१)

२१ जानेवारी २५०० (पौष कृष्ण पंचमी शके २४२१)

२२ जानेवारी २५५० (पौष शुक्ल तृतीया शके २४७१)

२३ जानेवारी २६०० (पौष कृष्ण द्वितीया शके २५२१)

श्री. नागेश सावंत

पानिपत : गैरसमज.

Leave a comment