महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

मासाहेब जिजाऊंनी जीर्णोद्धार केलेले ऐतिहासिक मारूती मंदिर, निरगुडे

By Discover Maharashtra Views: 1263 2 Min Read

मासाहेब जिजाऊंनी जीर्णोद्धार केलेले ऐतिहासिक मारूती मंदिर, निरगुडे –

जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीच्या पश्चिमेला अगदी हाकेच्या अंतरावर मिना नदीच्या उत्तर तीरावर वसलेले हे छोटेसेच सह्याद्रीच्या निसर्ग रम्य डोंगर रांगेतील निसर्ग संपन्न निरगुडे गाव होय. याच गावात एक ऐतिहासिक वारसा लाभलेले सुंदर असे आखिव रेखिव दगडी शिल्पात व सांगितले जातेय की माता जिजाऊंनी जीर्णोद्धार केलेले ऐतिहासिक मारूती मंदिर पहायला मिळते. नुकताच या मंदिरास क दर्जा प्राप्त झाला आहे. या मंदिराच्या आवारातील उत्तर भिंतीत एक गजलक्ष्मी शिल्प पहायला मिळते. विशेष म्हणजे या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वर एक मोठा शिलालेख कोरलेला पहायला मिळतो.(मारूती मंदिर निरगुडे)

या मंदिराच्या शिलालेखाच्या ओळी खालील प्रमाणे आढळून येतात.

श्री मारूती तथ परतन नामी देश माना शमी माना गामी रंग वचछावर सरा कव ८ अपूर तक्षी मर विभाशय
वारू यमाशुंव पर्वत स्थानिक टक भाल व कैटीक पूरम तस्मी केवलय मेवल खनम मनुष्य स्त्रिय तपछद
प्राचीनाजीत श्री रघु येथे जानता इंद्र प्रसादा द य यजात: स व सुग सुखाद व महादेव: कुल दिपक
इ इन्द्रश्री हनुसप्तदा श्री भजन प्राप्ती त्रेय: श्री यजाय नाभाडी सुजातीतन वसू ना मारूती लय.

हे मंदिर पश्चिमाभिमुख असून मंदिराच्या दरवाजा समोर एक नंदी पहायला मिळतो. मारुती मंदिरासमोर नंदी पहायला मिळणे हे एक नवलच वाटते. मंदिराच्या आत अतिशय सुंदर अशा लाकडावर नक्षीकाम केलेले गर्भगृह पाहून तर पुर्वजांच्या हस्तकलेचे कौतुक केल्याशिवाय रहावतच नाही. तसेच गर्भगृहात मारूती, श्री गणेश व शिवलिंग पहायला मिळते. गर्भगृहात गणपती मुर्ती असल्याचे फार अलिकडे समजले जेव्हा गणेश मूर्ती असलेल्या शिल्पाचा संपूर्ण सेंदुर थर गळुन पडला.

विशेष म्हणजे बैलपोळा सण म्हटले की निरगुडे गावातील श्री क्षेत्र मारूती मंदिर, निरगुडे (जुन्नर) ची हमखास आठवण येते. कारण या दिवशी मंदिराच्या पश्चिम भिंतीत असलेल्या छोट्याशा खिडकीतून कितीही मोठ्या बैल प्राण्यांचा प्रवेश होतो हे एक आश्चर्यच आहे. याबरोबरच वटवृक्षात नैसर्गिक हुबेहूब गणेश भगवान विराजमान झालेले असुन १०० वर्षे जुन्या बांधकाम शाळा व विविध प्रकारचे वाडे येथे पहायला मिळतात.

कधी जुन्नर ला आलात तर या मंदिरास भेट द्यायला नक्कीच विसरू नका.

छायाचित्र: रमेश खरमाळे, माजी सैनिक .नं. ८३९०००८३७०

Leave a comment