मराठ्यांची शत्रूंबरोबर युद्ध करण्याची पद्धत

वतन की स्वराज्य

मराठ्यांची शत्रूंबरोबर युद्ध करण्याची पद्धत

मराठ्यांनी आपल्या युद्धनीतीला एक विशिष्ट स्वरूप दिलेले होते . जिथे जिथे मराठे हल्ले करण्यासाठी जात असत त्या ठिकाणचा वसूल जमा करण्याच्या कामी लागत असत .(कसय की शेवटी शत्रू च्या मनात दहशत निर्माण करणे गरजेचे).अतीशय शांतपणे त्या ठिकाणी मग आपल्या बायका पोरांसोबत महिने किंवा वर्ष देखील काढत असत.

मराठा फौजा आपआपसात बादशाही परगणे वाटून घेतलेले असायचे आणि बादशाही पद्धतीचेच अनुकरण करून आपले स्वतःचे सुभेदार , कमाविसदार ( वसुली गोळा करणारे अधिकारी ) आणि राहदार ( रस्त्याचे रक्षण करणारे अधिकारी ) ह्यांच्या नेमणुका केल्या होत्या. सुभेदार हा सैनिकांच्या पलटणीचा अधिकारी असत. जेव्हा एखादा मोठा तांडा येत असल्याचे सुभेदाराच्या कानावर येई तेव्हा तो जवळजवळ अमुक अमुक घोडेस्वारांना बरोबर घेऊन त्या तांड्याला गाठत असे आणि तो तांडा लुटून फस्त करीत .

मराठ्यांनी सगळीकडे शत्रू कडून चौथाईची वसुली करण्यासाठी आपले कमाविसदार नेमलेले होते .जेव्हा एखादा सामर्थ्यवान जमीनदार अथवा बादशाही फौजदार कमावीसदाराला प्रतिकार करी आणि वसुली करण्यास प्रतिबंधी करी त्यावेळी मराठ्यांचा शुभेदार त्या कमाविसदारच्या मदतीला येऊन , त्या ठिकाणाला वेढा घालून तेथील शत्रूंची छावणी व वस्ती उध्वस्त करणे योग्य वाटून घेऊन तिथली जागा स्वराज्यात आणून समाधान मानीत .

[ मराठ्यांच्या नेमलेल्या राहदाराचे काम पुढीलप्रमाणे ] –

जेव्हा एखादा परकीय व्यापाऱ्याला मराठ्यांकडून कोणत्याही प्रकारचा त्रास न होता प्रवास करायचा असेल तर तेव्हा राहदार त्या व्यापारी कडून प्रत्येक गाडी किंवा बैल यांच्या पोटी काही पैसे घेत असत आणि मग त्यासाठी रस्ता मोकळा ठेवला जाई . ( बादशाही फौजदार जी जकात वसुली करत इतर राज्याच्या लोकांकडून त्यापेक्षा मराठे शत्रू कडून तिप्पट – चौपट ही रक्कम गोळा करत .
प्रत्येक सुभ्यामध्ये मराठ्यांनी एक अथवा दोन किल्ले बांधले असत , आणि ह्याच किल्ल्यामधे ते वेळ प्रसंगी आसरा घेऊन आजूबाजूच्या प्रदेशांवर हल्ला करण्यासाठी वाटचाल करत .

#धाडसी_मराठे

माहिती साभार:- मराठा रियासत (स्वराज्याचे शिलेदार)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here