मराठा साम्राज्य विस्तार १७०७ ते १७१९ भाग ४

मराठा साम्राज्य विस्तार १७०0७ ते १७१९ भाग १ २ ३ ४

मराठा साम्राज्य विस्तार १७०७ ते १७१९ भाग ४ –

ड】माळवा मोहिमेनंतर खंडेराव दाभाडे,सुलतानजी निंबाळकर व दावलजी सोमवंशी याना खानदेश व गुजराथ प्रांतात शाहु महाराजानी पाठवले आणी खंडेराव दाभाडे यानी या दोन प्रांताचा दळणवळणाचा रस्ताच ताब्यात घेतला.तेव्हा हुसेन अलीने झुल्फिकारबेग या सरदारास खंडेराव दाभाडे विरोधात पाठवले.परंतु खंडेरावानी मोठ्या युक्तीने मोगलांचा पाठलाग करुन डोंगरी प्रदेशात झुल्फिकारबेगसह त्याची फौजच कापुन काढली. यासमयी त्यानी गुजराथवरील मोगलांचा अमंल काढुन शाहु महाराजांचा अमंल प्रस्थापीत केला. ही मोहिम जुन १७१५ सालची आहे.(मराठा साम्राज्य विस्तार १७०७ ते १७१९ भाग ४)

ढ 】 पुण्यावरील मोगलांचा अमंल दुर केला =

एप्रील १७१६ साली शाहु महाराजानी मराठा सरदार खंडेराव दाभाडे व सरलष्कर सुलतानजी निंबाळकर यास मोगलातर्फे पुण्याचा ठाणेदार रंभाजी निंबाळकर याच्यावर पाठवले. या सरदारानी रंभाजी निंबाळकराचा पराभव करुन त्याचा पर्यायाने मोगलाचा पुण्यावरील अमंल कायमचा दुर केला. यात रंभाजी निंबळाकर यांचा पुत्र जानोजी मारला गेला.

अशाप्रकारे पुण्यावर छत्रपती शाहु महाराज यानी खंडेराव दाभाडे व सुलतानजी निंबाळकर मार्फत ताबा मिळवला.

ण】अशाप्रकारे छत्रपती शाहु महाराज यानी आपल्या सरदारामार्फत मोगलचा दक्षिण सुभेदार हुसेन अली याची कोंडी केली आणी खानदेश, पुणे, गुजराथ, हैद्राबाद व कर्नाटक हे मोगलप्रांत आपल्या ताब्यात घेतले. या कोंडीमुळेच हा हुसेन अली शाहु महाराजांशी करार करण्यास तयार झाला. हा करार शाहु महाराजानी दक्षिणेतच करवुन घेतला व त्यावर बादशहाचे फर्मानासाठी दिल्लीत पाठवले.

परंतु छत्रपती शाहु महाराज यानी बादशहाच्या फर्मानाची देखिल वाट न पाहता आपल्या सरदाराना करार अमंलबजावणीचे आदेश दिले. यावरुन छत्रपती शाहु महाराज यांची धाडसी व्रुत्ती व मुत्सद्देगिरीपणा दिसुन येतो.

परंतु छत्रपती शाहु महाराज यानी बादशहाच्या फर्मानाची देखिल वाट न पाहता आपल्या सरदाराना करार अमंलबजावणीचे आदेश दिले. यावरुन छत्रपती शाहु महाराज यांची धाडसी व्रुत्ती व मुत्सद्देगिरीपणा दिसुन येतो.

तिकडे मातुश्री कैदेत आसताना देखिल शाहु महाराज बादशहाच्या फर्मानाची वाट न पाहता कराराची अमंलबजावणी करताना दिसतात. म्हणजे ते बादशहासास काय व किती किंमत देत होते हेच सिद्ध होते.

त】

तसेच मराठा स्वराज्याचा विस्तार देखिल मोगल प्रांतातच करुन घेऊन मोगलासोबत करार करुनही मोगलासच शह देऊनच मराठा स्वराज्याचा विस्तार मराठा सरदारामार्फत करवुन घेत होते.म्हणजे बघा ज्याच्याशी करार करायचा त्याच्याच विरोधात जाऊन त्याच्याच प्रांतात मराठा स्वराज्याचा विस्तार करणे, म्हणजे शाहु महाराज यानी या कराराचा गनिमीकावा करुन राजकारणच केले. यावरुन त्यांची राजकारणी व धुर्तपणा दिसुन येतो. वरती मोगलांच्या प्रांतात चौथ व सरदेशमुखी वसुली कुलबाबे (वंशपरंपरागत अधिकार) अशीच करत.

लेखन माहिती  :सुरेश  जाधव.
इतिहास माहितीकार

मराठा साम्राज्य विस्तार १७०७ ते १७१९ भाग १

मराठा साम्राज्य विस्तार १७०७ ते १७१९ भाग २

मराठा साम्राज्य विस्तार १७०७ ते १७१९ भाग ३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here