मलकापूर शहर ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग १…

मलकापूर शहर ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग १...

मलकापूर शहर ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग १…

ऐतिहासिक मलकापूर नगरपालिका…

 

भारत हा प्राचीन काळापासून ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या एक महत्त्वाचा देश समजला जातो. या देशावर अनेक राजघराण्यांनी सत्ता स्थापन केल्या. तत्कालीन सत्ताधीशांनी सत्ता टिकवण्यासाठी लोकांच्या लोककल्याणार्थ अनेक संस्था स्थापन केल्या. या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय आणि न्यायालयीन कामे करण्यात आली. ऋग्वेदकाळात “गावसभा” अस्तित्वात होती. सुलतान आणि मोगल कालखंडात पंचायतीच्या माध्यमातून स्थानिक लोकांच्या समस्या सोडविल्या जात असत. शिवकाळात गावातील गरजा गावातच भागविल्या जात होत्या. त्यामुळे “स्वयंपूर्ण खेडी” अस्तित्वात आली. मध्ययुगात विशेषतः मुघल राजवटीमध्ये भारतात मोठ्या प्रमाणात शहरे उदयास आली. प्रारंभी पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रान्स या देशातील लोक भारतात व्यापारकर्ते म्हणून आले आणि इथले राज्यकर्ते बनले. ह्या सत्तांचा भारतावर कळत-नकळत परिणाम झाला. भारतातील पूर्वीचे एकत्र कुटुंब पद्धती लयास गेली आणि ग्रामीण सामुदायिक जीवन नष्ट होऊन स्वयंपूर्ण खेडी लोप पावली.

ब्रिटिश राजवटीत अंतर्गत राजकीय दृष्ट्या भारत देश प्रथमच एका मध्यवर्ती सत्तेखाली आला. कायदा व सुव्यवस्था, एकात्म प्रशासन आणि न्याय व्यवस्था निर्माण झाली. ब्रिटिश प्रशासन व्यवस्थेचा आजही केंद्रीय, प्रांतीय आणि स्थानिक प्रशासनावर प्रभाव दिसून येतो. सन १८५० पासून देशात मोठमोठ्या शहरात नगरपालिका महानगरपालिका स्थापन झाल्या. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील विशाळगड किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. इतिहासात विशाळगड जहागिरी(संस्थान) प्रसिद्ध होते आणि याच जहागिरीत मलकापूर नगरपालिकेचे बीजारोपण झाले. भारतात ब्रिटिश राजवटीपासून नवनव्या प्रशासन पद्धतीचा अवलंब होण्यास सुरुवात झाली. स्थानिक कारभाराचे क्षेत्र म्हणून त्यानांच नागरी स्थानिक स्वराज्य संस्था असे म्हणतात. यातूनच सन १८८४ मध्ये मलकापूर नगरपालिका स्थापन झाली.

गव्हर्नर जनरल लॉर्ड रिपन यांच्या कारकिर्दीत १८८२ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था विषयी कायदा पास झाल्याने नगरपालिकेसारख्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना महत्त्व प्राप्त झाले. आज मलकापूर नगरपालिकेने केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८च्या अभियानात देशात सहावा, तर राज्यात चौथा क्रमांक पटकाविला आहे. १३५ वर्षांचा विस्तृत इतिहास असलेली नगरपालिका आता नवीन इमारतीत कार्यरत असून ब्रिटिशकालीन नगरपालिकेची इमारत आज पण सुस्थितीत आहे.

क्रमशः

माहिती साभार  – Kunal Shitturkar

छायाचित्र सौजन्य – Roopesh Warange

मलकापूर शहर ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग १…

मलकापूर शहर ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग २…

मलकापूर शहर ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग ३…

 भाग ४…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here