महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

छ. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर मोगलांना हरवणारी मराठा स्त्री रणरागिणी

By Discover Maharashtra Views: 3773 3 Min Read

 छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर मोगलांना हरवणारी मराठा स्त्री रणरागिणी

                                                                  
महाराणी ताराबाई ( १६७५ – १७६१ )  ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या होत्या. छत्रपती ताराराणी भोसले यांचा जन्म १६७५ साली तळबीड येथे झाला. सरसेनापती हंबीरराव मोहिते हे महाराणी सोयराबाई यांचे सक्के भाऊ होते. त्यामुळे ते छत्रपती राजाराम महाराजांचे ते मामा होत. छत्रपती राजाराम महाराजांच्या त्या मामाची मुलगी होत्या. ताराबाईचे लग्न हे छत्रपती राजाराम महाराजांशी १६८३ – १६८४ च्या दरम्यान झाले.

         २५ मार्च १६८९ रोजी मोगलांनी श्री दुर्ग रायगडास वेढा घातला होता. तेव्हा त्या छत्रपती राजाराम महाराजांसह रायगडावरून निसटून गेल्या.छत्रपती राजाराम महाराज पुढे जिंजीला गेल्या नंतर ताराबाई, राजसबाई आणि अंबिकाबाई ह्या किल्ले विशालगड येथे राहिल्या.  त्यांनी लष्करी आणि मुलकी शिक्षण हे रामचंद्र पंत यांच्या मार्गदर्शनाखाली घेऊन त्या सन १६९४ साली त्या जिंजीला पोहोचल्या. पुढे ९ जून १६९४ साली त्यांना एक पुत्र झाला त्याचे नाव शिवाजी असे ठेवले.

छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर संपूर्ण राज्य कारभाराची सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली. राज्याची सूत्रे हाती घेतल्यावर कठीण प्रसंग आणि अडचणींना सामोरे जात धैर्यान उभ्या राहिल्या. त्यावेळी चोहीबाजूंनी मोगली फौजा ह्या राज्यावर हल्ले करत होते.  मोगली फौजांचा आक्रमकपणे सामना केला.मराठेशाहीतील मुत्स्दयांना काळाचे गांभीर्य समजावून सांगून सगळ्यांच्या एकजुटीची मोट बांधली. ह्या सर्व कर्तबगार सरदारांच्या आणि स्वामिनिष्ठ सहकार्यांच्या बळावर महाराणी ताराबाई यांनी शत्रूला थोपवून धरले. त्यामुळे सैन्याची जमवाजमव करून खडे सैन्य उभारले. या सर्व बाबींमुळे सैन्यात प्रचंड आत्मविश्वास वाढला. तुल्यबळ सैन्य उभारून लष्कराची पुनर्बांधणी केली. धावता घोडा फेकणारे तलवारबाजी आणि भालाफेक करून दुश्मन सैन्याला नामोहरण करणारे तरुण सैन्यात भारती केले. मोगलांना कर्दनकाळ वाटावा असे हिम्मतवान आणि तलवार उगारून मैदान गाजवणारे मोगलांचा कर्दनकाळ वाटावेत असे सरदार उभे केले.

बादशाहच्या दिल्लीच्या राज सत्तेवर स्वतःचा जबरदस्त धाक निर्माण तर केलाच तहहयात कायम ठेवला. स्वराज्यातील मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी ताराबाई यांनी मोगली मु;खावर स्वाऱ्या करण्याचे आदेश दिले. केलेली आक्रमणे यशस्वी करून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करून आर्थिक बाल वाढविले. मोगलांना त्यांनी खडे चारले तो काळ सन १७०५ चा होता. मराठी फौजा ह्या माळवा प्रांतात शिरून त्यांनी माळवा काबीज केला. आणि त्या काबीज केलेल्या प्रांतामधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट आणि भक्कम केली.

ताराबाई यांनी करवीर राज्याची कोल्हापूरच्या गादीची स्थापना केली. ताराबाई ह्या मराठ्यांच्या इतिहासातील धाडसी आणि कर्तबगार राजस्त्री होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर त्यांनी राज्याची धुरा कणखरपणे सांभाळली. नामवंत धाडसी संताजी आणि धनाजी ह्या मातब्बर सरदाराना बरोबर घेऊन त्यांनी मोगलांना सालो कि पालो करून सोडनारी रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या कर्तुत्वान स्त्रियांमधील एक मनाचे पान.

Leave a comment