खांदेरीचा रणसंग्राम भाग २२

By Discover Maharashtra Views: 3704 4 Min Read

खांदेरीचा रणसंग्राम भाग २२…

खांदेरीचा रणसंग्राम सुरू होऊन आता ४ महिने उलटले होते. तरीही इंग्रज व सिद्दी कोणालाच खांदेरीवर ताबा मिळवणे शक्य झाले नव्हते. बेट हाती येईल असे वाटतंच असताना मराठे आश्चर्यकारकरित्या बेटावर जम बसवून बसले होते. मायनाक भंडारी यांनी कर्तृत्वात जराही कसूर केली नव्हती. हे वीर दोन्ही शत्रूंना बेटाच्या जळवळपास फिरकू देत नव्हते. सिद्दीच्या खांदेरीवर ताबा घेण्याच्या बाता हवेत विरल्या होत्या. आणि खांदेरी बेट शिवाजी महाराजांच्याच ताब्यात राहणार ह्यावर शत्रूच शिक्कामोर्तब करू लागलेले. एव्हाना खांदेरीचा शिखरावर 6 ते 8 फूट चुन्याचे बांधकाम झाले होते. पण आता अचानक ह्या घडामोडीत वेगळाच रंग भरला गेला. मागेच म्हंटल्याप्रमाणे २ तारखेला उत्तरेकडील वारा सुरू झालेला. व नाकेबंदी पथक उंदेरीच्या आश्रयाला गेली होती. त्याचवेळी उंदेरीचा अंदाज सिद्दीकडून घेतला गेला असावा. पण ही गोष्टी मराठ्यांसाठी सुद्धा धक्कादायक होती.

९ जानेवारी १६७९ ची संध्याकाळ. सिद्दीच्या गोटातल्या तीन ते चार बोटी उंदेरीवर लागल्या. लगबगीनं काळे हशबी बांधकामाच सगळं साहित्य बेटावर उतरवू लागले. मोठी तोफ देखील सोबत आणण्यात आली. आणलेल्या तोफा मोर्च्या च्या जागी लावण्यात आल्या. 11 जानेवारीला उंदेरीवरून थळच्या किनाऱ्यावर तोफा डागायला सिद्दीने सुरुवात केली. पण परिणाम शून्यच होता.

12 जानेवारी सुद्धा तोफेच्या मारेगिरीत गेला. आता थळ ते उंदेरी मध्ये द्वंद्व सूरु होऊ लागले. नागावच्या खाडीत ही बातमी पोचली. ह्याला तिथून हटवणे गरजेचे आहे हे मराठ्यांच्या लक्षात न येते तर नवलच. सिद्दीला फटका देऊन तिथून हाकलावूं असा निश्चय मराठ्यांच्या गोटात केला गेला. व त्याच रात्री मराठी गलबत नागावच्या खाडीतून बाहेर पडली. चंद्राच्या प्रकाशात उंदेरीचा दिशने मार्गक्रमण सुरू झालं. वारा जोराचा पडला होता. जोरात वल्हे मारले जात होते. उंदेरी आता दृष्टीसमोर आला. डोलकाठी वर चढलेल्या कोळ्याने इशाऱ्यासाठी कसलीतरी आवाज काढले. उंदेरीवर तसा प्रकाश होता. जहाज जवळ नेलं असतं तर ते तिथल्या प्रकाशात आली असती. उंदेरी टप्यात आल्यावर मराठ्यांनी तोफेच्या तोंडी गोळे ठेवले. सर्व इशाऱ्यावर लक्ष ठेवून होते. इशरत होताच तोफांना बत्ती देण्यात आली. एकाच वेळी बार काढण्यात आले. इथे सिद्दी सुद्धा निवांत बसुन नव्हता. मराठ्यांच्या हल्ल्याची पूर्वकल्पना तो करून असावा. त्यांनीही लगोलग मराठी जहाजांच्या दिशने तोफा डागल्या. आता दोन्ही बाजूने तोफेचे बार काढण्यात येऊ लागले.

हे धुमाकूळ ऐकून इंग्लिश जहाज तिथे जाण्यास निघाली. मोठी फ्रिग्रेट 12 फुटाच्या पाण्यात राहून बाकी लहान जहाज पुढे पाठवण्यात आली. पण त्यातच त्यांना एक सिद्दीच गलबत दिसले. व त्यानेच मराठी जहाज माघारी गेल्याचे सांगितले. इंग्रजानी मराठी आरमार नागावच्या खाडीत शिरताना पाहिले. पण बरंच लांब व उथळ पाण्यात पोचल्याने ते पाठलाग करण्याच्या भानगडीत पडले नाही.

मराठे पुन्हा येऊन हल्ला करणार. आणि तो असा अचानकच असेल. त्यामुळे तुमच्या लहान बोटी आमच्या मदतीला पाठवण्यास तयार ठेवा असे सिद्दीने इंग्रजांना कळवले. तेव्हा तो स्वतः उंदेरीवर होता. बांधकामाच्या कामात लक्ष देऊन ते करून घेत होता. उंदेरी तस खांदेरी च्या तुलनेत बराच लहान बेट. पण सिद्दीच उपद्रवमूल्य लक्षात घेता तेही त्याचा ताब्यात असणे मराठ्यांना डोकेदुखी होते. त्यामुळे आता सिद्दीला उंदेरीवरून हकालण्याची कसरत मराठी आरमाराला करावी लागणार होती.

क्रमशः – खांदेरीचा रणसंग्राम भाग २२

✍️ स्वराज्याचे वैभव
संदर्भ ग्रंथ : शिवछत्रपतींचे आरमार
English record

खांदेरीचा रणसंग्राम, पूर्वार्ध

खांदेरीचा रणसंग्राम भाग १

बाजींद कांदबरी

Leave a comment