महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,64,771

खांदेरीचा रणसंग्राम भाग २

By Discover Maharashtra Views: 3814 5 Min Read

खांदेरीचा रणसंग्राम भाग २ –

खांदेरीचा रणसंग्राम भाग २
Mumbai To Surat
6 September 1679

There was transported over 150 men and 4 small guns, under the command of mia naique ( मायनाक भंडारी), a bardareen of the rajah, unto whome the deputy governor written, requiring him to quitt the place as belonging to this land. To which he returned a civill aswer desiring to be excused that he could not leave it without his order who command him thereon, which was sevagy rajah.

खांदेरी वर पोचल्या पोचल्या जोरात कामाची लगबग सुरू झाली. तटबंदी, तात्पुरता निवारा, जहाज उभी करायला छोटासा धक्का तयार करण्यात येत होता. कामाची लगबग सुरू होती इतक्यात एक इशारतीची नौबत वाजवण्यात आली. एक लहानसं जहाज खांदेरी च्या दिशेने येताना दिसलं. लागलीच तोफांच्या जवळ असलेले गोलंदाज सावध झाले. मावळ्यांनी तरवारीच्या म्यानेला हात घातला. ते जहाज इंग्रजांनी बेटावरील शिबंदीला उद्देशून लिहिलेलं पत्र घेऊन येत होतं. इंगज सैनिकांची एक फाईल ( सहा सैनिक ) सोबत एक दुभाषी अशी ती तुकडी किनाऱ्यावर धडकली. इंग्रजानी हे बेट आमचं आहे लगेच हे रिकामी करा अशी मागणी केली होती. पण त्या शिबंदी चा म्होरक्या एक कसलेला शिपाईगडी होता. जोपर्यंत आमचा धनी छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा आदेश येत नाही तोपर्यंत हे ठिकाण मी सोडू शकत नाही असं ठामपणे इंग्रजांना सांगण्यात आलं. हेच उत्तर घेऊन ती तुकडी माघारी फिरली. मायनाक भंडारी गालातल्या गालात हसत होता.

२ सप्टेंबर १६७९ रोजी मुंबईत एक बैठक घेण्यात आली. आल्या प्रकाराला कसे तोंड देता येईल ह्यावर विचार चालू झाला. काही झालं तर हे बेट राजा शिवाजीच्या हातात लागू देयचं नाही. शत्रू पक्का धूर्त व समर्थ आहे. जर त्याच छोटंसं जरी आरमार तिथे असलं तर आपल्या व्यापाराला आणि स्वतः मुंबईला धोकादायक असेल ही त्यांना खात्री होती. आणि जर तिथे किल्ला उभारला गेला तर मात्र शत्रूला हुसकावून लावणे खूप कठीण असेल हेही त्यांना माहीत होते. म्हणून आताच प्रयत्न करून शत्रूच्या पदरी अपयश टाकायचं हे इंग्रजांनी नक्की केलं होतं. याआधीही त्यात इंग्रजांना यश आलं होतं. पण हे साध्य कसं करायचं हा प्रश्न होता. मराठी आरमाराची धास्ती घ्यावी असं इंग्रजांना वाटत नव्हता. पण जमिनी मार्गे आपल्यावर आक्रमण झाले तर त्यापुढे आपला टिकाव लागणे अशक्य हे त्यांना ठाऊक होते. त्यामुळे शत्रूची नाकेबंदी करायची हे धोरण नक्की केलं गेलं. मूळ भूमी असलेल्या थळचा किनारा, आणि नागावच्या खाडीतून बेटावर होणारी रसद तोडायची. जेणेकरून बेटावर असलेले सैनिक स्वतः शरण येतील हा त्याचा होरा होता. त्यामुळं खांदेरी ते थळची मुख्य भूमी ह्या मध्ये त्यांनी आपली शिबाड उभी करायची ठरवली. ह्या सगळ्यात आपल्या कडून प्रथम हल्ला शत्रूवर न करावा असा उपदेश ही देण्यात आला होता.

Consultation in Mumbai
” Ordered that three shibarrs should be with all speed fitted up and that Ensigne Hughes with the six files of souldiers should be drawne out to goe on board said shibarrs and saile down to the said island kundry (खांदेरी)”

कॅप्टन ह्यूझ च्या नेतृत्वाखाली तीन शिबाड ह्या नाकाबंदीच्या कामगिरीवर नेमण्यात आली होती. त्यासोबत त्यांना सैनिकांच्या एकूण ६ फाईल ठेवण्यात आल्या. ४ सप्टेंबरला ही तिन्ही शिबाड कंपनीच्या निशाणासह खांदेरीच्या समुद्रात पोचली.

पण इथे बेटावर बांधकाम कमालीच्या वेगाने सुरू होतं. एव्हाना खांदेरी वर ४०० आणि अधिक माणसं बेटावर होती. ठिकठिकाणी तात्पुरता निवारा उभा केला होता. सहा तोफा मोक्याच्या ठिकाणी उभ्या केल्या. तोफगाडे बनवणे आणि तटबंदी उभारणे ही कामच सुरूच होती. इथे सुरतेहून एक अजून पत्र आलं की शत्रू सामोपचाराने ऐकत नसेल त्याला हुसकावून लावावे. आणि आपल्या रिव्हेंज आणि हंटर ह्या फ़्रीगेटी जहाज ह्या कामगिरीला रवाना कराव्यात हे सुद्धा सुचवलं.

पोर्तुगीज्यांच्या गोटात सुद्धा ह्या खबरीने वातावरण गरम केलं. आपली दोन गलबत आणि एक फ्रिगेट गस्तीला पाठवावी असा ठराव झाला तोच त्यांना कळलं की इंग्रजांनी आपली जहाज नाकेबंदीसाठी पाठवली आहेत. आता त्यांनी त्यांचा सूर बदलला आणि वाट बघण्याचं धोरण स्वीकारलं. पण लपून इंग्रजांना लागेल ती मदत करावी अशी ऑर्डर काढली.

इथे खांदेरीच्या समुद्रात इंग्रजी पथकाने नाकेबंदी सुरू केली. आणि मराठ्यांच्या रसद घेऊन येणाऱ्या दोन जहाजांना परत पाठवले. पुढील दहा दिवस शांतता निर्माण झाली होती. वरवर तरी तसेच चित्र दिसत होतं. त्यात रिव्हेंज ही युद्धनौका इंग्लिश पथकाला येऊन सामील झाली. १६ ते २० तोफांनी आग ओकणारी ही फ्रिग्रेट आणि तिचा डालडोमच न्यारा. आणि तिच्या येण्याने इंग्रज नाविक दल अजून भक्कम झालं होतं. ह्या आधी इथल्या इतद्देशीयांनी जे केलं नव्हतं ते करायचा मराठ्यांनी ठाम निर्धार केला होता. समुद्रावर सत्ता गाजवणारे, आपल्या नाविक सामर्थ्याचा गर्व असणाऱ्या एका परकीय सत्तेला शिंगावर घेणारे मराठे पहिलेच ठरतं होते. ही लढाई मराठी आरमारावर दूरगामी परिणाम करणार होती.

क्रमशः

संदर्भ ग्रंथ : शिव छत्रपतीनेचे आरमार
English records

माहिती साभार – स्वराज्याचे वैभव

खांदेरीचा रणसंग्राम सर्व भाग

Leave a comment