खंडागळे हत्तीप्रकरण !!!
कविँद्राने शिवभारतातील अकस्मीक स्कंद नामक तृतिय अध्यायातील श्लोक क्रमांक ८ ते ५७ यात देवगीरीवर २३ फेब्रुवारी इ स १६२३ मध्ये आकस्मीक घडलेल्या खंडागळे हत्तीप्रकरणाची माहिती दिलेली आहे यात जाधवराव घराण्याचे राजेलखुजीराव यांचे ज्येष्ठ पुत्र दत्ताजीराजे व राजेभोसले घराण्याचे विठोजीराजे यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे याना प्राण गमवावा लागला. ती पुढिलप्रमाणे =
1] देवगीरीवर आपल्या विश्वासु नोकरासह व अमात्यासह निजामशहा सभास्थानी येऊन सिँहासनावर बसला असता जाधवराव इत्यादी सर्व सरदार त्यास यथानुक्रम भेटुन आपापल्या घरी जलदीने जाऊ लागले.एकमेकांची स्पर्धा करणारे राजे जाण्यास निघाले असता सभागृहाच्या दारासमोर एकच गर्दी झाली.त्यावेळेस खंडागळे नावाच्या राजाचा आघाडीचा बलवान हत्ती दुसर्यांची सैन्ये तुडवीत वेगाने निघाला.माहुताने अंकुशाने टोचुन पदोपदी प्रतिबंध केला असताही त्या हत्तीने सैनिकांचे खुप कंदन केले.सैन्याचा चुराडा करणार्या ,निर्भयपणे गर्जणार्या व प्रलयकाळच्या मेघाप्रमाणे भासणार्या त्या हत्तीस कोणीही अडवु शकले नाहीत.
2] एखाद्या हत्तीने गर्जना केली असता दुसर्या कळपातील हत्तीस ज्याप्रमाणे ती सहन होत नाही,त्याप्रमाणे त्या हत्तीची गर्जना लखुजीराजे जाधवरावांच्या दत्ताजीराजे या ज्येष्ठपुत्रास सहन झाली नाही.नंतर दत्ताजीराजेच्या आज्ञेने शुर योद्धे त्या मदोन्मत्त हत्तीस बाण,तलवारी,भाले,तोमर व शक्ती यानी प्रहार करु लागले.त्या मदोन्मत्त आणी घोर कर्मे करणार्या हत्तीला पुष्कळानी भोसकले परंतु त्याने कित्येकाना पायाखाली तुडवले.अशारितीने आपल्या सैन्याची वाताहत पाहुन दत्ताजीराजा त्या हत्तीवर सिँहाप्रमाणे नजर रोखुन चालुन गेला.त्याने जोराच्या शस्त्रप्रहारानी जेरीस आणलेला तो हत्ती आपले डोके हलवीत रणांगणाच्या आघाडीस ची ची करु लागला.
3] तेव्हा विठोजीराजे यांचे संभाजीराजे व खेळोजीराजे हे दोघे पुञ खंडागळ्याच्या हत्तीच्या मदतिस गेले.ते दत्ताजीराजेच्या तावडीत सापडलेल्या,रक्तबंबाळ झालेल्या आणी गेरुच्या डोंगराप्रमाणे दिसणार्या त्या हत्तीचे रक्षण करु लागले.दत्ताजीराजेनी त्या हत्तीची सोँड कापुन टाकली आणी मदोन्मत्त हत्तीस सोडुन देऊन संभाजीराजे वर हल्ला केला. क्रोधायमान झालेल्या त्या दोघामध्ये द्वंद्व चालले असता जाधवरावांच्या संबंधाकडे उघड उघड डोळेझाक करुन शहाजीराजा भाऊ संभाजीराजे याच्या मदतीस आले.तेव्हा हातात ढाल घेतलेल्या प्रतापी दत्ताजीराजेनी तलवार फिरवुन आपल्याभोवती जणु काय तेजोवलयच बनविले.तेव्हा तो वीर दत्ताजीराजा पट्टा फिरवीत अफाट रणभुमीवर नाचु लागला.श्रेष्ठ वीरांची त्याच्या तडाख्यात येऊन डोके जमिनीवर लोळु लागली.त्या धैर्यवान व शञुचा नाश करणार्या यादव वीराची परत संभाजीराजेशी गाठ पडली असता तो ठार झाला.
4] अद्वितीय कर्मे करणारा असा आपला पुञ दत्ताजीराजे युद्धात संभाजीराजे भोसले कडुन मारला गेला ही बातमी पुढे निघुन गेलेल्या लखुजीराजे जाधवरावास समजली तेव्हा त्यांचे डोळे क्रोधाने लाल झाले आणी संभाजीराजेस मारण्याच्या हेतुने परत फिरले.अशारीतीने क्रोधाविष्ट झालेले आणी देवाप्रमाणे पराक्रमी असे आपले सासरे राजेलखुजीराव यांच्याशी शहाजीराजे स्वपक्षाचे रक्षण करण्याच्या हेतुने युद्ध करु लागले.आपला जावई लढत आहे असे पाहुन शञुंचा निःपात करणार्या त्या धाडसी जाधवरावानी शहाजीराजेँच्या दंडावर प्रहार केला आणी त्या प्रहाराने शहाजीराजे मुर्च्छित पडले. त्यावेळेस खेळोजीराजे व इतर राजे आणी निजामाच्या सिद्दी लोक यांच्या फौजेचा पराभव करुन क्रुद्ध झालेल्या गाढमुष्टी जाधवरावानी खड़ग उगारुन समरात अजिँक्य अशा संभाजीराजेवर वेगाने चाल केली.तेव्हा प्रसन्नचित्त संभाजीराजेने आपल्या तलवारीस हात घातला.शञुजेत्या जाधवरावानी संभाजीराजेच्या तलवारीचे पुष्कळ आघात सहन केले आणी नंतर संभाजीराजेस ठार केले.
5] जाधवराव व राजेभोसले यांच्या आकस्मिक व प्रासंगिक युद्धात निजामाने मध्यस्थी करुन युद्ध मिटवले.नंतर जाधवरावानी आपल्या मुलाचे दत्ताजीराजे यांचे उत्तरकार्य केले व खेळोजीराजेने देखिल आपल्या वडीलभावाचे उत्तरकार्य केले.
6] निकट सोयरसंबंधाच्या अगदी विरुद्ध असे,स्पर्धा {मत्सर} करणार्या विठोजीपुञांशी जे युद्ध झाले ,त्याचा आपल्या गर्विष्ठ अंतःकरणात काहिसा विचार केला,त्यावेळेस जाधवरावाना पश्चाताप झाला अषे कविँद्र सांगतो,म्हणजे हे युद्ध दोन घराण्यातील आकस्मिक प्रसंग घडुन झाले त्यास पुर्ववैराची कुठेही झालर नव्हती म्हणुनच कविँद्राने शिवभारतातील या अध्यायास आकस्मीक स्कंद अध्याय असे नाव दिलेले आहे.
7] या दोन घराण्यानी खंडागळे हत्तीप्रकरणानंतर शाह्या बदलल्या ,एकमेकाविरुद्ध शाह्यातर्फे लढले परंतु एकमेकाचा कधिच रक्तपात केला नाही.परंतु उत्तरकालीन बखरकारानी या प्रकरणाची दोन घराण्याची वैराची पार्श्वभुमी दिलेली आढळते ती पुर्णपणे चुकिचीच आहे.
8] कविँद्राने शिवभारतातील ४ थ्या अध्यायातील श्लोक क्र १ ते ३ मध्ये जाधवरावानी निजामशाही सोडुन मोगल दरबारी जाण्याचे कारण देताना म्हटले,”निजामाने विठ्ठलराजेंचा कैवार घेऊन जाधवरावासोबत कारस्थान करण्याचे कपट रचले आहे,याचे कारण म्हणजे जाधवरावाचे वाढलेले प्रस्थ हे होय. ” हि घटना खंडागळे हत्तीप्रकरणानंतरची म्हणजे इ स १६२४ मधील आहे आणी याच वर्षात प्रसिद्ध भातवडीचे युद्ध झाले.यावरुन असे लक्षात येते कि या खंडागळे हत्तीप्रकरणात देखिल या दोन शक्तीशाली घराण्याना एकमेकाविरुद्ध रक्तपात करण्यास निजामाचेच कपट कारस्थान होते.याच बोध घेऊनच या दोन घराण्यानी एकमेकाविरुद्ध लढले परंतु एकमेकाचा रक्तपात कधिच केला नाही.
राजे दत्ताजीराव जाधवराव यांचे वंशज शाखा – जवळखेड , उमरद देशमुख (रुसुमचे) , करवंड , भुईंज , करणखेड , वडाळी , सारवडी व तेल्हारा.
