महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

बाजीराव पेशवा यांची पत्नी काशीबाईसाहेब यांचा वाडा…

By Discover Maharashtra Views: 3645 3 Min Read

चास  येथील बाजीराव पेशवा यांची पत्नी काशीबाईसाहेब यांचा वाडा…

 

काशीबाईसाहेब यांचा वाडा – पेशवे म्हटलं कि डोळ्यासमोर उभं राहतं ते ऐश्वर्य संपन्नता सुवर्ण अलंकारीत पेहराव मोती जडीत मुकुट आणि विविध आभुषनांनी नटलेले श्रीमंत पेशवे आणि त्यांचे विविध सरदार हा समज पुस्तक वाचन आणि चित्रपट तथा मालिकेतुन झाला असल्याने आणि नावाच्या पुढे ऐश्वर्याचे प्रतिक म्हणुन श्रीमंत लावण्याची प्रथा त्यास पुष्ठी देते पंरतु यापेक्षाही वेगळा इतिहास काशिबाईचां असुन काशिबाई ह्या थोरले बाजीराव यांच्या अर्धागिंनी असुन महादजी कृष्ण जोशी चासकर यांच्या त्या कन्या होय महादजी कृष्ण जोशी चासकर यांचे कुटुंबातील रामचंद्र महादेव हे लढावु होते त्यांचा मोठा पराक्रम असुन पराक्रमाचा वारसा चासकर जोशीना होता.

महादजी हे दिवाणं होते आणि बाळाजी विश्वनाथापेक्षा आर्थिक संपन्न होते

बाजीराव आणि काशिबाईच्या विवाहासाठी महादजी जोशी यांनी 25000 पचंवीस हजार रुपये खर्च केले होते तर बाळाजी विश्वनाथांनी केवळ 5000 पाच हजार रुपये खर्च केले होते

बाजीराव पेशवेपदी विराजमान झाल्यानंतर ही कर्जबाजारी होते त्यावेळेस महादजी जोशीनी बाजीरावांना दोन लाख रुपयाची मदत केली होती

(संदर्भ-चासकर जोशी कुलवृतांत पेज क्र 527,528) बाजीराव पेशवे कर्तबगार पराक्रमी साहसी योध्दे होते त्यांच्या पराक्रमामुळे छत्रपतीचां वारसा जपला गेला काशिबाई ह्या एका मोठ्या घराण्यातुन आलेल्या होत्या त्यांनी बाजीरावांस सदैव साथ दिली काशिबाईचे माहेर असलेल्या चास येथे मोठा चार बुरुजांचा दगडी वाडा असुन तिथे आता सुरेशकाका जोशी व परिवार वास्तव्यास असतो लेखिका निलाबंरी गाणु यांच्या समवेत या वाड्याला भेट देण्याचा योग आला भेटी दरम्यान जोशी काकांनी तीन दुर्मीळ गोष्टी दाखवल्या एक त्यांच्याकडे असलेल्या तलवारी व सात तोफा तसेच (1100 यश वा श्रा 68) अकराव्या शतकातील अंबारी असलेल्या हत्तीची मुर्ती अत्यंत सुदंर असुन त्यावर कंसात दिलेला मजकुर कोरलेला आहे तर तिसरी दुर्मिळ गोष्ट म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर यांचे सहाफुटी लांबीचे मोडी पत्र या पत्रातील मजकुर अजुन वाचला गेला नसला तरी ते पत्र इनाम संदर्भात असावे असे मला वाटते या सहाफुटी पत्रावर महाराजांचा शिक्का असुन 1802 मधील हे पत्र महत्वाच्या विषयाचे असावे

जोशीवाडा तसा मातीचा पण बुरुज दगडाची चिरेबंदी भितं आत दगडी चौक भला मोठा लाकडी दरवाजा त्याला लोखंडाची सुळे बसवलेली असुन सुस्थितीत आहे

देशभरातील इतिहास प्रेमी लेखकांनी साहीत्यिकांनी या वाड्याला भेटी दिलेल्या  आहेत सुरेश काका जोशी यांनी वाड्यासंबधी वर्तमान पत्रात प्रसिध्द झालेल्या बातम्या दाखवल्या तसेच शंभर वर्षापुर्वीचे वडाच्या झाडाचे पान आणि काही मोडीलिपीतील पत्र दाखवली

उन्हाचा पारा 38 अशं डिग्री असतांना देखील निलाबंरी गाणु यांनी चास चा वाडा दाखवण्यासाठी वेळ काढला त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच

आजकाल क्षतीग्रस्त झालेले वाडे ढासळलेले बुरुज पाहुन वाईट वाटणारे जास्त आहेत मात्र याच वाड्यांनी आपले सरंक्षण केले आहे दुस-याचे रक्षण करता करता स्वतःचे अस्तित्व जपले नाही अशा या वाड्यांच्या कर्म कहाण्या इतिहासाला जागे करण्याचे काम आज ही करतात

ही दगडी वाडे आपले ऐतिहासिक वारशे असुन ती जपण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे

पोस्ट साभार :-रामभाऊ लांडे

Leave a comment