महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,29,547

इंदोर संस्थान | बखर संस्थानांची | महाराष्ट्रा बाहेरील महाराष्ट्र

By Discover Maharashtra Views: 1577 3 Min Read

इंदोर संस्थान | बखर संस्थानांची | महाराष्ट्रा बाहेरील महाराष्ट्र –

होळकर घराणे हे भारतातील इंदोर  येथील संस्थानिक होते. संस्थानिक बनण्याअगोदर १८ व्या शतकाच्या सुरुवातीला होळकर घराण्याचा कर्ता मल्हारराव होळकर यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठी सेनेमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवले व मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा उचलला. उत्तर भारतातील माळवा प्रांतातील व्यवस्था चोख रहावी यासाठी पेशव्यांनी होळकरांना खास अधिकार दिले व इंदूर येथे आपले बस्तान बसवण्यास प्रोत्साहित केले. होळकर हे मूळचे महाराष्ट्रातील धनगर समाजातील होते.इंदोर संस्थान.

पहिला राजा: मल्हारराव होळकर | अंतिम राजा: यशवंतराव होळकर

इन्दौर रियासत, ही होळकर  रियासत म्हणून ओळखली जाते., ब्रिटिश सरकारच्या काळात  भारतातील ही एक मराठा रियासत होती. ज्याचे शासक होळकर राजवंश होते.  इन्दौर रियासत ला 19 बंदुकीच्या सलामीचा मान होता. इंदोर च्या होळकरांनी महाराजा ही पदवी धारण केली होती .

इन्दौर रियासत  मध्य प्रदेश मध्ये होती तिची राजधानी इन्दौर शहर होती . इन्दौर व्यतिरिक्त महत्वपूर्ण शहर महेश्वर, रामपुरा, खरगोन, महिदपुर, बड़वाह और भानपुर होते. मल्हाररावांची  पुत्रवधु अहिल्याबाईसाहेब  होळकर ने रियासती ची राजधानी 1767 ला  महेश्वर ला स्थलांतरीत केली.पण इन्दौर एक महत्वपूर्ण व्यापारी व सैन्याच महत्वाच  केंद्र म्हणूनच राहील  .तीसरे इंग्रज -मराठा युद्धा मध्ये होळकरांची हार झाल्यावर , 6 जनवरी 1818  इंग्रजांन बरोबर तह झाला आणि  इंदौर रियासत, ब्रिटिशांच्या आंकित झाली.

3 नवंबर 1818 ला राजधानी महेश्वर वरुन परत   इंदौर ला राजधानी स्थलांतर झाली. महाराजा तुकोजीराव होळकर द्वितीय च्या काळात  इंदौर मध्ये योजनाबद्ध विकास और औद्योगिक विकास झाला.1875 मध्ये रियासत मध्ये  रेल्वे चालू झाली आणि इंदौर मध्ये महाराजा शिवाजीराव होळकर, तुकोजीराव होळकर तृतीय आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्या शासन काळात  व्यापार वाढला.

1947 च्या  भारत  स्वतंत्रता नंतर , इंदौर रियासत चे  अंतिम शासक यशवंतराव होळकर द्वितीय यांनी  1 जनवरी 1950 ला भारतात विलीन केले व  भारताच्या मध्य प्रदेश राज्या चा भाग झाले .

राज्यकर्ते. होळकर घराणे.

मल्हारराव होळकर १७३१–१७६६
मालेराव होळकर १७६६–  १७६७
अहिल्याबाईसाहेब  होळकर,  १७६७ – १७९५
तुकोजीराव होळकर  १७९५ – १७९७
काशीराव होळकर १७९७–  १७९९
खांडेराव होळकर १७९९ -१८०६
यशवंतराव होळकर १८०६ –  १८११
मल्हार राव तृतीय होळकर १८११- १८३३
मार्टंडराव होळकर १८३३  -१८३४
हरिराव होळकर १८३४ -१८४३
खांडेराव द्वितीय होळकर १८४३ – 1844
तुकोजीराव द्वितीय होळकर १८४४- १८८६
शिवाजीराव होळकर १८८६ – १९०३
तुकोजीराव तृतीय होळकर  १९०३ -१९२६
यशवंतराव द्वितीय होळकर १९२६ -१९४७
उषा देवी होळकर, १९६१ …..
विद्यमान वंशज भुषणसिंह राजे होळकर.

(संस्थानचे स्टँप पेपर , कोर्ट फी व पत्र.)

संतोष मु चंदने. चिंचवड ,पुणे

Leave a comment