महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

हिरडस मावळच्या सरनौबतांचे बलिदान

By Discover Maharashtra Views: 1323 4 Min Read

हिरडस मावळच्या सरनौबतांचे बलिदान –

विजापूरच्या अफजलखानाचा मारून विजय साजरा न करता  राजे थेट करवीर पर्यंत धडकले, बापाचा सूड घेण्यायासाठी फाजलखान सोबत सिद्दी जोहर ला घेऊन आला, स्वराज्यावर पुन्हा संकट नको म्हणून महाराज मिरज चा वेढा सोडून पन्हाळ्यावर त्यांना अडवायला थांबले.(हिरडस मावळच्या सरनौबतांचे बलिदान)

चार महिने मुसळधार पावसात कडा पहारा पन्हाळ्यावर लागला होता, वेढा फोडण्याचे नेतोजीरावांचे प्रयत्न यश देत नव्हते, महाराज वेढ्यात पुरते अडकले. आता जास्त काळ वाट पाहून शक्य नव्हतं म्हणून एक धाडसी योजनेतून “शके १५८२ शार्वरीनाम संवत्सर आषाढ शुद्ध चतुर्थी” ला रात्री महाराज पन्हाळ्यातून ऐन रात्री हिरडस मावळतल्या बांदलांच्या निवडक 600 (काही साधनात हा आकडा १००० ते २००० आहे) मावळ्यांसह बाहेर पडले.

मुसळधार पाऊस, चिखल, पाठीवर शत्रू आणि स्वराज्याच्या धनी घेऊन सारे उर फुटस्तोवर पळत होते.  १२-१५ तास पळून कसेबसे “आषाढ  कृष्ण एकादशीला” खेळणा म्हणजे विशाळगडावर पोहोचले. पण मागे सिद्दी जवळ आला, आता परत वेढा नको म्हणून महाराजांनी रायाजी बांदल देशमुखांना जोहरशी  झुंजायाची आज्ञा केली पण बाजीप्रभू सरनोबत यांनी मध्यस्ती करुन ही ती जबाबाबदरी स्वतःवर घेतली, कारण रायाजी तेव्हा कोवळ्या वयात होते, लग्न- संसार झाला नव्हता. हिरडस मावळचे भविष्य असं रणांगणात खर्ची पडू नये म्हणून ते स्वतः पुढे निघाले, जातानाराजांना  म्हंटले, आम्ही गेलो तरी मागे कुटुंब  आणि रायाजी यांना पहावे, रायाजींना महाराजांच्या हाती देऊन, दर्शन घेऊन बाजी गडउतार झाले.

इथे बाजींचा त्याग दिसून येतो.गडापासून  चार मैलावर असलेल्या गजापूरचा खिंडीत जोराची  झुंज झाली, बाजीप्रभू सरनोबत व इतर ५३ गावचे मावळेलोक मृत्यू पावले. पुढे रायजींनी महाराजांच्या परवानगीने त्या सर्वांवर अंत्यविधी केले. तसेच महाराजांनी पिसावरे येथे येऊन दिपाआवा बांदल  देशमुख व रायाजी नाईक बांदल देशमुख यांचे सांत्वन केले, कारण कडवी फौज, आणि पराक्रमी सरनोबत त्यांनी गमावला होता. महाराज लगोलग शिंद येथे बाजींच्या घरी जाऊन त्यांच्या बायकामुले व भाऊबंदाचेही सांत्वन केले व कुटुंबियांची जबाबदारी घेतली. आणि महाराज राजगडावर दाखल झाले. बावाजी बाजीप्रभू या मुलास सेनापती जमेनिशी वतन व बापूजी बाजी प्रभू याना किले विशाळगड येथील करखानिशी दिली.

राजगडावर भरलेल्या दरबारात जेधेंकडील मानाचे पहिले  तलवारीचे पान बांदलांकडे आले ते रायाजींनी स्वीकारले.

१.या लढाईत कुठेही बाजी बांदल यांचा उल्लेख येत नाही कारण ते हयात नव्हते. बाजीप्रभूंचा उल्लेख जेधे शकावलीत येतो तसा बाजी बांदल यांचा येत नाही.

२. अस्सल साधनात शिवा काशीद यांचाही उल्लेख येत नाही.

३. तसेच जे लोक म्हणतात की या युद्धातकान्होजी जेधेंचे जेष्ठ पुत्र बाजी सर्जेराव जेधे सामील होते तर तसा उल्लेख खुद्द जेधेंकडील ” जेधे शकवली” मध्ये  आढळत नाही.

एक प्रसिद्ध कादंबरीमुळे गजापूर खिंडीतील हा संग्राम व एकूणच बांदल सेनेचा, बांदल देशमुखांचा इतिहास चुकीच्या लिखाणामुळे उपेक्षित  राहिला. तसेच  सध्या उगाच बाजीप्रभूंच्या अस्तित्वावर प्रश्न उभे केले  जातात व बाजी बांदल यांचे नाव पुढे केले जाते, हे चुकीचे आहे.

यासाठी समस्त बांदल व हिरडस मावळातील लोकांनी जागृत राहणे  तसेच यावर शक्य तितके संशोधन व अभ्यास करणे गरजेचे आहे.

– संकेत प्रकाश मोरे, भोर.

संदर्भ:-
१. बांदल तकरीर
२. जेधे शकावली
३. गजापूरचा रणसंग्राम
४. शिळीमकर देशमुखांचा २१ मार्च १६५७ चा महजर
५. कै. आबाजी परशुराम कर्णिक यर्फ महाडकर यांच्या संग्रहातील बखरीतील रेखाचित्रावरून काढलेले हे चित्र.
यामूळ रेखाचित्रावर “Baji Prabha , the Indian Leonidas” असा उल्लेख आहे .

★ बांदलांच्या इतिहासावर आधारित pdf ची link सोबत देत आहे.
https://drive.google.com/file/d/1vbf14Qr07s6in1M9SqN59MP37XK0iUY2/view?usp=drivesdk

इतिहास अभ्यासक मंडळ

Leave a comment