Home महाराष्ट्रातील गडकिल्ले गडदुर्गा पाटणादेवी, कन्हेरगड

गडदुर्गा पाटणादेवी, कन्हेरगड

0
गडदुर्गा पाटणादेवी, कन्हेरगड

गडदुर्गा पाटणादेवी, कन्हेरगड…

गडदुर्गा पाटणादेवी एका अतिदुर्गम आणि अपरिचित अश्या किल्ल्याची निवासिनी पुणे, नगर, नाशिक ही भटक्यांची आवडीची ठिकाणे पण ह्या जिल्ह्याच्या थोडे बाहेर बघितले की आपल्याला खुणाऊ लागतात ते अपरिचित किल्ले आणि त्यावरील विशेष स्थाने…

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पासून जवळच असलेल्या गौताळा अभयारण्यात आहे कन्हेरगड किल्ला दाट जंगल, खळखळून वाहनारी नदी, विविध पक्षी आणि प्राणी हे ह्या अभरण्याचे आकर्षण ६६० मीटर उंचावलेल्या कन्हेरगडाच्या पायथ्याशी आहे पाटणादेवीचे सुप्रसिद्ध व भव्य असे हेमाडपंथी मंदिर…

१८ भुजा असलेले पाटणादेवी आपल्या प्रत्येक हातात अस्त्र शस्त्र घेऊन तर आहेच तसेच दानव संहार करत सिंहावर सुद्धा आरूढ़ आहे पाटणादेवी हे दुर्गेचे अश्या प्रकारतील दुर्मिळ रूप दर्शविते मंदिरा शेजारील जंगल पक्ष्यांचे आवाज आणि पाण्याची झुळझुळ मन प्रसन्न करतात…

इ.स. ११२८ मधे यादवांचे असलेले मांडलिक हेमाडीदेव निकुंभ ह्यांची पाटणदेवी ही राजधानी आणि राजधानी असल्याची पुरेपुर साक्ष कन्हेरगड हा येथे असलेल्या अवषेशावरुन देतो इ.स. १३०० मधे येथे फारूकी घराण्याने सत्ता स्थापन केली तर इ.स. १६०० मधे मुघल राजवटित हा किल्ला व प्रदेश गेला इ.स. १७५२ ते १८१८ पर्यन्त मराठी स्वराज येथे होते आणि इतर किल्ल्या प्रमाणे १८१८ मधे इंग्रजांनी हा किल्ला जिंकला…

किल्ला बघताना आपल्यास बघायला मिळतात ते सीता न्हाणी, नागार्जुन गुंफा, जैन गुंफा, यक्ष यक्षिणी, सप्तमातृका शिल्प, श्रृंगारचौरी लेणी, तटबंदी व इतर अवशेष.. वाट वाकडी करून पितळखोरे, कन्हेरगड आणि पाटणादेवीचे मंदिर अवश्य बघावे…

“तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया
तुझ्या दयेचा ओघ अखंडीत, दुरित लयाला नेई….”

माहिती साभार – सचिन पोखरकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here