महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,34,775

लालमहाल नक्की कुठे होता कसा होता किती मोठा होता ?

By Discover Maharashtra Views: 4102 8 Min Read
सध्याचा लालमहाल आणि शनिवारवाडा याची satellite image

लालमहाल नक्की कुठे होता कसा होता किती मोठा होता ?

लालमहाल सारख्या महत्वाच्या वास्तुचे काय झाले?
शनिवारवाडा म्हणजेच लालमहाल का? लालमहाल पाडून तिथे शनिवार वाडा बांधण्यात आला असे एक नाहीतर अनेक प्रश्न गेली कित्तेक वर्ष सर्व शिवपाईकांना पडले आहेत .
अत्ता जी लालमहालाची वास्तु आपण बघतो ही नव्याने बांधण्यात आली आहे , मग शिवकालीन लाल महाल नक्की कुठे होता या वर बरेच वाद विवाद होतात. या विषयाचा ब्रिटिश कागदपत्र, Gazette , पुण्याला भेट देऊन गेलेले विदेशी पर्यटक त्यांनी केलेल्या नोंदी आणि ब्रिटिशांनी काढलेले नकाशे याचा अभ्यासपर संशोधन करुन पुढील लेख आपल्या समोर मांडत आहे .

ब्रिटिश कागद पत्र अभ्यासत असताना बरेच पुरावे मिळत गेले त्या वरुन लाल महालाची जागा आणि वास्तुचे काय झाले हे निश्चित करता येते, १८८४ मधील पुण्याचा अभ्यास केला तर पुणे शहर १८ पेठांमधे विभागले गेले होते आणि १८ पेठांमधे छोटी मोठी १२२७१ घरे असल्याचे कागद पत्रात उल्लेख दिसतो . या १८ पेठांमधील कसबा पेठे ही लाल महालाच्या विषया साठी महत्वाची आहे .

१) . १८९५ मधील फोटोग्राफ असलेल Glimpses of India हे J.H furneaur , C.B Burrows यांनी लिहिलेल्या पुस्तकात महत्वाचे पुरावे मिळतात यात लेखकाने नमुद केल्या प्रमाणे अंबरखान्याचे जुने नाव लाल महाल आहे , सध्या येथे हत्तीच्या अंबारी ठेवल्या जातात , त्यातील काही भाग अजुन ही आहे तळमजल्या वरील खोली त्याच्या भिंती कमी अधिक जाडिच्या आहेत .बाकीचे अवशेष विस्कळीत झाले आहेत , पाया अजुन आहे त्या वरुण त्याचे आकारमान ठरवता येते .

२ ). तसेच The Land of the Rupee लेखक Bennett Coleman त्याच्या १९१२ मधे प्रकाशित झालेल्या पुस्तकात ही अंबरखाना हाच लाल महाल आहे असा उल्लेख लेखक करतो .

३) . या नंतर Poona, the peshwa’s city and it’s Neighbourhood लेखक Herbert Andrew Newell याच्या १९१८ मधील प्रकाशित पुस्तकात दिलेल्या माहिती वरुण आपल्याला लाल महालाची जागा लक्षात येते , यात लेखक उल्लेख करतो की पेशवे पैलेस ( शनिवार वाडा) च्या पूर्व बाजुला Elephant Gate ( गणेश दरवाजा ) च्या समोरील बाजुला चालत गेले की रंगीबेरंगी फुले असलेली आणि मोठी झाडे आहेत हीच लाल महालाची जागा आहे , नंतर या जागेला अंबरखाना म्हणुन ओळखले जात तेथे हत्तिची अंबारी ठेवली जात.

४) . १९५१ मधे The poona Municipal Corporation याच्या माध्ममातुन Poona : Look and Outlook नावाचे पुस्तक प्रकाशित झाले , यात अंबरखाना किव्वा लाल महाल शिवाजी महाराज यांचा वाडा हा शनिवार वाड्या जवळील सध्याच्या नगरपालिकेच्या उद्यानाच्या जागी होता असा उल्लेख आहे . हा उल्लेख महत्वाचा आहे कारण भारत स्वतंत्र झाला त्या नंतर याची नोंद केली गेली आहे .

५) . १९८१ मधील इंडियन हिस्टोरिकल रेकॉर्ड कमीशन : प्रोसिडिंग ऑफ़ द फोर्टी सेवंथ सेशल मधे letter about alterations made in the shivaji Raja’s mahal which was built by Dadoji konddeo during the reign of shahji Raja and suggestion to build new house within the premises of the mahal and to allot them to Ranoji shinde and Ramchandraji so that the place would remain clean (28 jun 1735) हा उल्लेख नक्की कोणत्या कागद पत्रा वरुण घेतला याचा शोध मी पुराभिलेखागार मधे घेत आहे .

६). अंबरखाना या वास्तुचे मूळ नाव लाल महाल आहे तसेच अंबरखाण्याच्या पूर्व बाजुला कसबा गणपतीचे मंदिर आहे असा उल्लेख 1885 मधे प्रकाशित झालेल्या Gazette of the Bombay Presidency volume 18 part 3 Poona मधेही आला आहे .
1884 ते 1981 मधील विविध पुस्तकातील , सरकारी कागद , Gazette, विदेशी पर्यटक यांच्या नोंदी मधे आलेल्या उल्लेखा प्रमाणे अंबरखाण्याच्या म्हणजेच लालमहाल हे सध्या तरी आपणास मान्य करावे लागेन .

७) . अंबरखाणा कुठे होता याच्या सबळ पुराव्यासाठी शोध घेतला असता photozinco office. Poona यांनी पुण्याचा १८८३ मधे रेखाटलेला नकाशा शोधला हा एक महत्वाचा पुरावा आहे ,
या नकाशा मधे शनिवार वाडाच्या पूर्व बाजुला एक चौकोन दाखविला गेला आहे त्याला अंबरखाना आणि त्याच्या बाजुला छोटी आयतआकृति जागा तिला कसबा गणपती असा उल्लेख केला आहे, महत्वाचे की तत्कालीन फोटोझिंकोग्राफी चे ऑफिस हे पुण्यातच होते त्या मुळे जागा चुकीची दाखविली आहे या वर शंका घेता येणार नाही .( सदर लेखा बरोबर फोटो क्र. 1831 मधे लाल चौकोना मधे हिरव्या बाण करुण दाखवलेली जागा म्हणजेच लालमहालाची ( तत्कालीन अंबरखाना) आहे .

वरील सर्व मुद्दे लक्षात घेउन लालमहाल नंतर त्या वास्तुला अंबरखाना , अंबरखाना ही वास्तुपडल्या नंतर तिथे उद्यान करण्यात आल हे लक्षात येते . छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्य विस्तारा साठीची घोड़दौड़ त्या नंतर छत्रपती संभाजी महाराज , छ. राजाराम महाराज आणि श्रीमंत ताराराणी साहेब यांचा संघर्षमय कालावधी त्या नंतर छ. शाहू महाराज यांच्या पर्यंत लाल महालाची ड़ागडूजी आणि वास्तु ही माणसांच्या राहण्या साठी वापरात होती असे दिसते त्या नंतरच्या काळात मराठा सत्तेला लागलेले ग्रहण त्यात लालमहाला कड़े दुर्लक्ष होउन बरीच पडझड झाली इंग्रजी हुकुमतिच्या काळात या वास्तु कडे पूर्ण पणे दुर्लक्ष झाले वाताहात झाली हे नक्की .

पण ज्या वेळी लालमहाल म्हणजेच तत्कालीन अंबरखाना या नावाने ओळखली जात असलेली वास्तु तिचे आकारमान बांधनी याचे महत्वाचे डॉक्यूमेंट पुरातत्व विभागा कड़े आहेत तेही आपल्या समोर काही दिवसात मांडण्यात येतील त्यातून लालमहाल या वास्तु विषई जास्तीत जास्त माहिती सर्व शिवपाईक यांच्या साठी प्रकाशित करणार आहे .
सर्वांच्या मनात येणारी अजुन एक शंका की शाहिस्ते खान हजारोचे सैन्य घेउन पुण्यात आला तो जिथे थांबला तो लाल महाल नकाश्या प्रमाणे एवढा छोटा कसा असू शकतो ! या प्रश्नाचे उत्तर मी आपणास पुढील लेखा मधे देणार आहे .
या संशोधनाबरोबर लाल महालाच्या वास्तु नक्की कशी होती या बाबत काही महत्वाचे पुरावे, स्केचेसही हाती लागत आहेत त्यांची सत्यता पडताळुनच तेही लवकरच प्रकाशित होतील .

लालमहाला विषईचे संशोधन अभ्यास हे २०१९ मधेच लिहून पूर्ण झाले होते , सप्टेबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० काळात सदर लेख ४ ते ५ वर्त्तमान पत्रामधे दिला होता , पण लाल महाल हा वादग्रस्त विषय असावा म्हणून छापुन आला नाही .
वरील लेख हा माझ्या आगामी पुस्तकातील आहे तरी लेखाच्या मुद्रनाचे सर्व हक्क हे माझ्या कड़े आहेत याची नोंद घ्यावी . लेखा मधील नकाशा ही सर्वानसमोर प्रथम येत आहे त्याची उत्तम प्रत मी पैसे भरुन घेतलेली आहे .
चित्र क्र.1830 :- १८८३ मधील पुण्याचा नकाशा
चित्र क्र. 1831 :- चित्र क्र. 1830 मधील शनिवार वाडा आणि अंबरखाना स्पष्ट दिसावा या साठी क्रॉप केलेला फोटो
चित्र क्र. 1835 :- सध्याचा लालमहाल आणि शनिवारवाडा याची satellite image
चित्र क्र. 1836 :- नव्याने बांधण्यात आलेला लालमहाल

 

क़ाही शंका असतील तर 8007464599 या नंबर वर संपर्क करणे
प्रसाद दांगट पाटील

Leave a comment