महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,74,223

राज्य संरक्षणाचे मुख्य कारण किल्ले

By Discover Maharashtra Views: 3565 2 Min Read

दुर्ग किल्लेति विज्ञेयं गिरिदुर्ग गड स्मृतः

राज्य संरक्षणाचे मुख्य कारण किल्ले, ते देशोदेशी स्थळे पाहून बांधावे. महाराष्ट्रातील हे गिरिदुर्ग “स्थळविशेष” ची माहिती घेऊन बांधले हे दिसून येत. त्यांच्या बळावर गडदुर्गांच्या आसमंतात असलेल्या विस्तृत भूमंडळावर टेहळणी करून सत्ता चालवलेली कळते. लांबवरून होणाऱ्या शत्रूच्या लष्करी हालचाली या गिरीदुर्गांवरून स्पष्ट दिसत आणि त्यानुसार गडावरील अधिकारी राजनीती ठरवीत. गिरीदुर्गांचे भौगोलिक स्थान या दृष्टीने फार महत्वाचे मानले गेले आणि आजही मानले जातात.एखादा गिरिदुर्ग बांधायचा झाला , तर उंच व विलग डोंगरमाथा पाहून तिथे गड बांधला जाई आणि जर त्याच्याजवळ एखादा तितक्याच उंचीचा किंवा त्यापेक्षा जास्त उंचीचा दुसरा डोंगर असेल, तर काय करावे ?? याबद्दल कोणती दक्षता घ्यायला पाहिजे ?? त्यासाठी कोणकोणते नियम असावेत ?

हे सांगताना रामचंद्रपंत लिहितात की , “किल्ल्यासमीप दुसरा पर्वत किल्ल्यात जवळ असू नये. कदाचित असला तरी सुरुंग लावून पाडून गडाचे आहारी ( माऱ्यात ) आणावा.” पण जर शेजारचा डोंगर आकाराने मोठा असला आणि तो सुरुंगाने उडवून देणे शक्य नसले , तर काय करावे हे सांगताना रामचंद्रपंत नमूद करतात की, “सुरुंग असाध्य असा असला तरी तोही जागा मोकळा न सोडता बांधून मजबूत करावा. गडाची इमारत गरजेची करू नये. तट, बुरुज ,चिलखते ,पहारे , पडकोट जेथे जेथे असावे ते बरे मजबूत बांधावे , नाजूक जागे जे असतील ते सुरुंगादी प्रयत्ने करून अवघड करून पक्की इमारत गडाचा आयब (गडाशी असलेली जवळीक) टाळावा.”

दुर्गपति शिवाजी राजे

राजा शिवछत्रपति जयते

श्री शिव राज्याभिषेक सोहळा , ६ जून, १६७४, राजधानी – रायगड

पोस्ट आणि माहीती – अमित राणे

Leave a comment