महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

राणी लक्ष्मीबाई | Rani Laxmibai

By Discover Maharashtra Views: 3647 2 Min Read

राणी लक्ष्मीबाई | Rani Laxmibai 

हिंदुस्थानाच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरलेलं नावं न्हवे, तर या नावामुळे अखंड हिंदुस्थानाचा दैदिप्यमान इतिहास भरून पावलाय. राणी लक्ष्मीबाईं(Rani Laxmibai) या नावाची ताकद बुंदेलखंडातील पलटणवाले, स्वतःला झाशी चा राजा जाहीर करणारा सदाशिवराव नारायण, ओरच्छाचा दिवाण नथेखां, दतीया चा राजा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे टोपीकर इंग्रज जाणून होते.

राणीसाहेब या तेजस्वी, सुशील, गुणिजनांच्या पारखी, दयाशील, परोपकारी, उदार व शूर होत्या. सुमारें नऊ दहा महिने झांशी त्यांच्या ताब्यांत असतां त्यानीं जो राज्य कारभार केला त्यांत त्यांचें प्रजावात्सल्य, दातृत्व, न्यायचातुर्य व कार्यदक्षता दिसून आली. त्यांची स्मरणशक्ति इतकी होती कीं, दीडशें मुजरेकर्‍यांपैकीं एखादा एखाद्या दिवशीं गैरहजर असल्यास त्याला त्याचें कारण दुसरे दिवशीं विचारण्यांत येई. याचबरोबर ग्रंथसंग्रहाचाहि त्यांनां नाद होता.

खुद्द ह्यु रोज, लो, मार्टिन, अर्नोल्ड, टॉरेन्स, म्याकर्थी वगैरे अनेक इंग्रज लोकांनीं व लेखकांनीं राणी लक्ष्मीबाई यांची सर्वतोपरी स्तुति गायिली आहे, कारण त्यांनी स्वतः, हा पराक्रम अनुभवला होता. राणी लक्ष्मीबाईंचा आयुष्यातील खडतर प्रवास, जिद्द आणि देशप्रेम यावर प्रेरित होऊन Michael White याने आपल्या #The_Joan_of_Arc_of_India या पुस्तकात राणी लक्ष्मीबाईंची तुलना जोन ऑफ आर्क सोबत केली आहे.

राणी लक्ष्मीबाई | Rani Laxmibai

जोन ऑफ आर्क पंधराव्या शतकातील 17 वर्षांची फ्रेंच लष्करी नेता होती. ती एक राष्ट्रीय नायिका होती ज्यांनी फ्रेंच राज्याला योग्य व सक्षम बनविण्यासाठी अगदी लहान वयातच शस्त्रे हाती घेतली.

झांशीची राणी लक्ष्मीबाई यांना “द जोन ऑफ आर्क ऑफ इंडिया” म्हणत पुस्तकाच्या लेखकाने, फ्रान्सच्या राष्ट्रीय नायिका आणि भारतातील तरूण, श्रद्धावान आणि सर्वाधिक लोकप्रिय महिला स्वातंत्र्यसैनिक यांच्यात सुंदर तुलना केली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील त्यांच्या कर्तृत्वाचा विचार करून राणीसाहेब ह्या मायकेल व्हाईटने त्यांना दिलेल्या पदवीच्या पात्र आहेतच यात तिळमात्र शंका नाही. बर्‍याच लोकांनी त्यांच्या विरता आणि त्यांच्या भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण भूमिकेची आठवण केली. त्यातील एकाने असे म्हटले आहे की #त्या_आश्चर्यकारक_होत्या_हे_नाकारू_नका.

या मरहट्टा साम्राज्याच्या मातीत जन्मलेल्या लेकीचं कौतुक ह्या राज्याला नसेल तर कोणाला असेल? योद्धा हा योद्धा असतो त्याची तुलना कोणाशीही करता येत नाही. या आपल्या इतिहासाचा अभिमान आणि त्याविषयी आपली निष्ठा ही महत्वाची, बाकी लोकं काय वाटल ते बोलतील. राणी लक्ष्मीबाई यांचं कार्य कळण्यासाठी पाहिले तुमि त्या लायकीचे असावे अन मग बोलावे.

Abhijeet Sonawane

Leave a comment