महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

महाराणी येसूबाईसाहेब जयते

By Discover Maharashtra Views: 3862 2 Min Read

महाराणी येसूबाईसाहेब जयते

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघल सैन्य रायगडावर तुटून पडले, राजधानी रायगड संकटात म्हणजे मराठ्यांचं राष्ट्र संकटात सापडले हे येसूबाईंनी ओळखले होते.ही खबर मिळताच राजाराम महाराजांची जिंजीला जाण्यास तयारी केली होती .आणि येसूबाई राणीसरकार म्हणून एक ज्वलंत देशभक्त स्त्री जिच्या हाताखाली चांगले मराठा सरदार , सेनापती व सैनिक ती बाळगत होती. महाराणी येसूबाईंनी जे कौशल्य त्या अडचणीच्या प्रसंगी दाखवले ते मल्हार रामराव चिटणीस ह्यांनी आपल्या बखरीत वर्णन करताना म्हणतात महाराणी येसूबाईसाहेब जयते –

” मुलाचे वय लहान , रायगडावरचं राज्य जरी गेले , त्याअर्थी सर्व शूर पराक्रमी मनसबदार आणि एक विचारांनी राजाराममहाराज साहेब यास घेऊन बाहेर पडावे. मुलास बाहेर जाऊन राहणे यास जवळ जागा रायगडाहून बांका ऐसी जागा दुसरी नाहीच. त्या अर्थी मुलास व आम्हास येथील बंदोबस्त करून ठेवावे. तुम्ही सर्वांनी राजाराममहाराजांसह वर्तमान बाहेर पडून फौज जमा करून प्रांताचा बंदोबस्त राखिला असता सर्व मसलत ओढ तिकडे आधी पडेल.येथे काही काही गिल्ला(आरडाओरड) पडणार नाही. तथापि थोडी बहुत मसलत पडली असताही हा रायरी किल्ला बेलाग, मजबूत , वर्षसहा महिने टिकून राहील. तो तुमचा सर्वांचा एखादे ठायी जमाव पोक्त(अनुभवी) झाला म्हणजे आम्हास काढून न्यावे.

किंवा शत्रूचे प्राबल्या विशेष त्याअर्थी चंदीचंदावर प्रांती दम खाऊन पुन्हा मसलत वळवून राज्यसाधनही करणे पडेल तरी करावे, परंतु ह्या समयी सर्व निघून एकदाच सर्वांना शत्रूस हस्तगत व्हावं ऐसे होईल. पल्ला पोहोचणार नाही. यास्तव राजाराम महाराज व त्यांचा कबिला ऐसे काढोन निघून जावे. सर्वांनी एकेठायी मोहास पडून राहिल्यास सारी मसलत येथेच पडून सर्वांनी सापडावे ऐसे घडेल. म्हणून सांगितले व ह्या विषयी राज्याभिषेक करणे अथवा काही एक संधी राहिली नाही. राज्याभिषेक पूर्वीच झाला आहे व सिंहासनाचे अधिकारी ईश्वरे निर्माण झाले. ”
( श्री सखी राज्ञी जयति )

ह्या प्रसंगावरून एक कळावे की महाराणी येसूबाईंनी राज्य आणि गादी ही काही लगेच सोप्या पद्धतीने मोगलांच्या ताब्यात दिली नाही , एवढी तयारी करत करत त्यांनी शेवटी रायगड राजधानी हा मजबूत बुलंद किल्ला मजबुरीने दिला.

महाराणी येसूबाईसाहेब जयते
– अमित राणे

Leave a comment