वेरुळ लेणी क्रमांक ३

By Discover Maharashtra Views: 1264 1 Min Read

वेरुळ लेणी क्रमांक ३ –

वेरुळ येथील लेणी समूहात एकूण ३४ लेणी आहेत. पैकी दक्षिणेकडील भागात बुद्धधर्मीय १२ लेणी असून उत्तरेकडील भागात ५ जैन धर्मीय लेणी आहेत. मध्ये राहिलेली १७ लेणी हिंदूधर्मीय आहेत. वेरूळची लेणी साधारणत: इसवी सनाच्या सहाव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरण्यात आली असून प्राचीन भारतातली बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मांमधली परस्परसहिष्णुता प्रकर्षाने दाखवतात. कालानुक्रमे बौद्ध व हिंदूधर्मीय लेणी समूहाची आपण मागील भागात माहिती घेतली आहे. या भागात वेरुळ लेणी क्रमांक ३ जैन धर्मीय लेणी समूहाची माहिती घेऊयात.

जैन लेणी (वेरुळ लेणी : ०३)

जैन धर्मीयांची क्र. ३० ते ३४ अशी एकूण पाच गुहा-मंदिरे येथे आहेत. त्यात इंद्रसभा, छोटा कैलास आणि जगन्नाथ सभा ही लेणी पाहावयास मिळतात. तत्कालीन बौद्ध-हिंदू लेणी शिल्पकलेचा या जैन लेण्यांवर प्रभाव जाणवतो. या लेण्यांतील छोटा कैलास शिल्पाकृती म्हणजे १६ क्रमांकाच्या कैलासाची लेण्यांची छोटी प्रतिकृती असावी असे वाटते. ही लेणी एक मजलीच असून ती आतून एकमेकांना जोडली आहेत. विशाल आकाराचा हत्ती आणि कलापूर्ण स्तंभासह सूक्ष्म कलाकुसर, आकर्षक तोरणे अशी शिल्पकला येथे पहायला मिळते. २३ वे जैन तीर्थंकर पार्श्वनाथ यांची विशाल मूर्ती हे येथील वैशिष्ट्य आहे. याशिवाय भगवान महावीर, गोमटेश्वर यांची शिल्पेही येथे पाहावयास मिळतात.

या पूर्वीच्या माहितीची लिंक

०१) बौद्ध लेणी.

०२) हिंदू लेणी.

Rohan Gadekar 

Leave a comment