अपरिचित इतिहासइतिहास

एक इतिहास असाही!

एक इतिहास असाही!

२० व्या शतकाच्या आरंभी इंग्रजांचे अंकित असलेल्या विविध संस्थानिकांनी आपापल्या परीने बऱ्याच प्रजाहितगोष्टी केल्या परंतु स्वातंत्र्य चळवळीत देश गुरफटला असल्याने बऱ्याच गोष्टी या काळाच्या पडद्याआड राहिल्या आणि संस्थानिक हे स्वस्थपणे विलासी जीवन जगताना आपल्याला दाखविले गेले, शोक म्हणून वाघाची शिकार करून त्यांच्यासोबत फोटो काढलेले दाखविले गेले परिणामी संस्थानिक आणि त्यांच्या इतिहासाविषयी विशेष उत्कंठा सामान्य जनतेस राहिली नाही,

त्यांचे ऐश्वर्य आणि ऐशोआराम या पलीकडे त्यांनी आपल्या जनतेसाठी केलेले कार्य कुणालाच समजले नाही, शेवटी शिरपेचात रोवलेले तुरे दिसतात लोकांना त्यासाठी काळजाचे केलेले पाणी नाही कळून येत युरोप जेव्हा औद्योगिक क्रांतीच्या जोरावर बलशाली झाला होता, तेव्हा त्यांच्याकडे असलेल्या तंत्रज्ञानाशी हातमिळवणी करून आपापल्या भागाचा मोठ्याप्रमाणावर विकास करून घेतला पण इतिहासकार्त्यांनाच बदनामीच्या शाईत बुडविले गेले

आवर्जून नमूद करण्यासारखी माहीती म्हणजे अजवा धरणं.

पराक्रम करत उत्तरेत सरकलेल्या मराठ्यांपैकी काही घराण्यांनी आपले बस्तान उत्तरेतच बसविले पुन्हा ते महाराष्ट्रात आले नाहीत त्यातीलच एक म्हणजे गुजरातचे गायकवाड घराणे दमाजी गायकवाड यांच्यानंतर घराण्याचे अतिशय महत्त्वाकांक्षी नाव म्हणजे सयाजीराव गायकवाड आधुनिकीकरणाचे खरे प्रणेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते सयाजीराव तिसरे यांनी बडोदा शहराचा वाढता पसारा लक्षात घेता या शहराच्या पाण्याची सोय करावी आणि ती देखील येणाऱ्या पुढीलकाळात कारगार ठरावी या महत्वकांक्षी हेतूने.

शहराजवळ धरण बांधायचा निर्णय घेतला जेव्हा बडोद्याची लोकसंख्या १ लाख एवढी होती तेव्हा भविष्यकाळाचा वेध घेणाऱ्या या राजाने ३ लाख लोकांची पूर्तता व्हावी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणीसाठी करणारे धरण बांधायचे ठरविले आणि बांधले देखील ५ किलोमीटरचा विस्तार असणाऱ्या या धरणाची उंची जवळपास २२१ फुट एवढी असून विश्वामित्री नदीशी हे जोडले गेले आहे. हीच ती विश्वामित्री नदी जी बडोदा शहरातून वाहते. धरणाला एकूण ६२ दरवाजे असून हे धारण १९५ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले असून आजही एकविसाव्या शतकात बडोदाच काय आजुबाजीची इतर शहरं देखील याच धरणावर अवलंबून आहेत.
कर्तुत्वाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा…… _/’_

माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close