महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,75,290

छत्रपती राजाराम महाराज भोसले द्वितीय

By Discover Maharashtra Views: 4083 2 Min Read

छत्रपती राजाराम महाराज भोसले द्वितीय

१८व्या शतकाच्या उत्तरार्धात देशात, महाराष्ट्रात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडून गेल्या परंतु इंग्रज अधिपत्याखाली असणाऱ्या जनतेमध्ये असणारा असंतोष आणि स्वातंत्र्यासाठी चाललेली धडपड यामध्ये काही गोष्टी, काही व्यक्ती, काही इतिहास हा समाजापुढे आलाच नाही. आणि त्यामुळे आज एकविसाव्या शतकात जगताना पुराव्याअभावी अशा घटना, वास्तू वा व्यक्ती यांविषयी जास्त काही माहिती मिळतचं नाही. त्यातीलच एक आघाडीचे नाव म्हणायला गेले तर छत्रपती राजाराम महाराज द्वितीय.

लोकराजा ही पदवी मिळालेल्या कर्तुत्ववान पित्याचे हे पुत्र. म्हणजेचं राजर्षी शाहू महाराज यांचे ज्येष्ठ चिरंजीव छत्रपती राजाराम आज्याचेच, पंज्याचे नाव नातू पणतू यांना देण्याच्या परंपरेमुळे छत्रपती घराण्यातील या दुसऱ्या राजाराम महाराजांची दखल तशी जास्त कुणी घेतलीच नाही, कोल्हापूर मधली अत्ता शेवटच्या अवस्थेत असलेल्या पिढीचा जर अपवाद सोडला तर यांच्याविषयी जर समाजात माहिती असली तरच नवल समजाव.

३१ जुलै १८९७ च्या हा द्वितीय छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्मदिवस, वडिलांच्याच पावलावर पाउल टाकत समाज हिताची कामे करणारया या राजांनी अनेक मोठमोठी कार्य पार पाडली. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी जे राधानगरी धरणाचे बांधकाम सुरु केले होते, ते बांधकाम शाहूराजांच्या पश्चात पूर्णत्वास नेण्याचे मोठे काम राजाराम महाराजांनी केले. आजही सुजलाम सुफलाम असलेल्या कोल्हापूरची बीजे जणू शाहू राजांनी रोवली आणि त्यास वाढविण्याचे, राखण्याचे कार्य राजाराम महाराजांनी केले.

१८व्या शतकात हे राजे होऊन गेले परंतु त्यांनी जे कोल्हापूर वसविले उभारले ते आपण आजही पाहू शकतो. दसऱ्याच्या सणाला सोने लुटायचा कार्यक्रम होतो म्हणून दसरा चौक अशी ओळख मिळालेल्या चौकात असणारा राजर्षी शाहूंचा पुतळा हा राजाराम महाराज यांनीच बसविला, सध्या जिल्हास्तरीय खटले जिथे चालतात त्या सध्याची जिल्हा न्यायालयाची इमारत ही देखील राजाराम महाराजांचीच देण, जग जवळ यावे म्हणून कोल्हापूरात विमानतळ निर्माण करणारे देखील राजाराम महाराजचं होय……….

माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

बाजींद कांदबरी

Leave a comment