महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,34,776

चार्लस वार मँलेट याची सवाई माधवराव पेशव्यांच्या दरबारी नेमणूक

By Discover Maharashtra Views: 1400 1 Min Read

चार्लस वार मँलेट याची सवाई माधवराव पेशव्यांच्या दरबारी नेमणूक व पेशव्यांना शहामृग भेट –

आर. एच. बॉडँम याने १२ फेब्रुवारी १७८६ रोजी सवाई माधवराव पेशव्यांना लिहिलेल्या पत्रात चार्लस वार मँलेट याची पेशव्यांच्या दरबारात इंग्रज वकील म्हणून नेमणूक केल्याचे कळवले आहे. याच पत्रात त्याने मँलेट साहेबाकरवी सवाई माधवरावाला एक अफ्रिकन शहामृग भेट म्हणून पाठवल्याचे देखील कळवले आहे.

फार्सी –
मिस्तर चारलस वार मालट साहब रा आना तर्फ कौम अंग्रेजान वकील मुतलक बिनाबर मानदन दर दरबार सामी फिरिस्तादा शुदा.

मराठी-
मिस्टर चार्लस वार मँलेट साहेब यांना इंग्रजांतर्फे पूर्ण अखत्यार देऊन आपल्या दरबारी राहण्याकरिता पाठवले आहेत.

फार्सी-
मुस्मा रफ्त की मिजाज आन आलीजाह बर आश्या-ए हर किस्म दीगर अतराफ बिसयार तलत्तुफ पसंदीद अस्त. फलिहाजा ब-हमराही मिस्तर मौसुफ यक खूब व जवान शुतरमुर्ग़ की दर इन रोज हा अज सवार-ए हबश बराए इन मुखालस आमदा बूद.

मराठी-
मी असे ऐकले आहे की, आपल्याला परदेशी हर एक वस्तूंची फार आवड आहे, म्हणून मिस्टर मजकुरांसोबत (मँलेट) माझ्याकरिता अफ्रिकेमधून नुकताच आलेला एक सुंदर व लहान शहामृग पक्षी आपल्याकरिता पाठवत आहे.

संदर्भ:-
१) इंग्रजांचे फार्सी पत्रव्यवहार, श्री आबासाहेब मुजुमदार, भा.इ.सं मंडळ पुणे
२) सवाई माधवराव पेशव्यांचं चित्रं श्री उदय कुलकर्णी यांच्या जेम्स वेल्स वरील पुस्तकामधून

फार्सी वाचन
सत्येन सुभाष वेलणकर, पुणे

Leave a comment