महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

चंद्रचुडवाडा, कन्हेरसर, पुणे

By Discover Maharashtra Views: 1238 1 Min Read

चंद्रचुडवाडा, कन्हेरसर, ता.राजगुरुनगर, पुणे –

गंगाधर यशवंत चंद्रचुड मल्हारराव होळकरांचे फडणिशि करणारे अतिशय मुत्सुदी व्यक्तीमत्व. नानासाहेब लहान असताना त्यांच्या जवळ वावरणा-या आनेक मात्तबर मंडळींपैकी एक. ते जरी होळकरांचे फडणिस असले तरी नानासाहेब पेशव्यांच्या काळात एक महत्वाची व्यक्ती होती ,त्यांनी आनेक मनसुबे निष्ठेने तडीस नेले होते., रणांगणावरील युध्द चातुर्य होते.

होळकरांचे प्रतिनिधी म्हणून पेशव्यांच्या भेटीला येत. पानिपत नंतर दिल्ली वर मराठ्यांचा जम बसवण्यासाठी त्यांना पाठवले होते. फेब्रुवारी १७७४ रोजी निधन. असे हे गंगाधर पंत यांचा चंद्रचुड वाडा म्हणुन प्रसिध्द असलेला पण लोकांना फारसा माहित नसलेला वाडा पुण्या पासुन ४५ कि. मी वर असलेला वाडा आपल्या गतकालीन वैभवाची साक्ष देत कन्हेरसर मध्ये ऊभा आहे.

भव्य प्रवेशद्वार,तटबंदीयुक्त वाडा,आत मध्ये तिन खोल विहीरी आहेत. आत मध्ये चंद्रचुड घराण्यातिल हरी लक्ष्मण चंद्रचुड यांची समाधी आहे. हे समाधी मंदिर खुप चांगल पाहण्या सारख आहे. कलाकुसर केलेला मंडप. कोरीव महिरप, तक्तपोशीवरील कलाकुसर,लाकडी खांब पाहण्या सारखे. महिरपी वरीप पोपटाने चोचीत धरलेले तोरण तर अप्रतिम. काळाच्या ओघात बरचस बांधकाम पडल आहे,पावसाने गवत वाढल आहे. पण चंद्रचुड यांचा वाडा इतिहासाची साक्ष देत आज ही ऊभा आहे.

समाधी स्थान मात्र पाहण्या सारख आहे. काय ते लाकडा वरील काम , कारागिरांच्या कलाकृती ला तर तोडच नाही.

संतोष चंदने, चिंचवड,पुणे.

Leave a comment