मिर्झाराजा जयसिंगाच्या मृत्युचे कारण

मिर्झाराजा जयसिंगाच्या मृत्युचे कारण

मिर्झाराजा जयसिंगाच्या मृत्युचे कारण : मुघल अखबारामधून –

इटालियन प्रवासी निकोलाओ मानुची याने आपल्या स्टोरिया दो मोगोर या पुस्तकात  औरंगजेबाने मिर्झाराजा जयसिंहाला विष घालून मारले असे दिले आहे. (Storia Do Mogor, Vol 2, pg.152) Annals of Rajasthan चा लेखक कर्नल टॉडने देखील मिर्झाराजा जयसिंगाचा धाकटा मुलगा किरतसिंग याने औरंगजेबाच्या सांगण्यावरून त्याला विष देऊन मारले असे लिहिले आहे. (Annals of Rajasthan, vol 2, pg.328) अर्थात हे दोघे जण (मानुची आणि कर्नल टॉड) आपल्या या विधानाला कोणताही आधार देत नाहीत, त्यामुळे त्यांना मिळालेली ही माहिती बाजारगप्पांवर आधारित असावी असे वाटते. परंतु मुघल अखबारातून वेगळीच माहिती समोर येते.(मिर्झाराजा जयसिंगाच्या मृत्युचे कारण)

औरंगजेबाच्या १० जुलुस जमादी अल अव्वल २२ म्हणजेच ३० ऑक्टोबर १६६७ च्या अखबारात पुढील माहिती मिळते

*फार्सी*

बंदगान-इ हजरत ब किरतसिंग xxx फर्जंद मिर्झाराजा जयसिंग मुतवफ्फा रा ची-तौर दर पाए जर्ब रसीदा बूद ? अर्ज नमूद की, रोज़ी बर फील सवार मी शूद जीना बे जाए शूद दर इन ज़िम्न पाए रा मशार इलैही जर्ब ख्वुरदा दर हमुन रोज़ आज़ार शुरु गश्ता. बाद अज़ चंद रोज ब-कझाए इलाहा फौत शूद xxx हजरत शुनीदे खामोश मानदंद

*मराठी*

बादशहांचा नोकर आणि मयत मिर्झाराजा जयसिंगाचा मुलगा किरतसिंग याला बादशाहाने विचारले की मिर्झा राजाच्या पायाला जखम कशी झाली? त्यावर किरतसिंगने सांगितले की एके दिवशी मिर्झाराजा हत्तीवरुन जात होता तेव्हा पायऱ्यांवरून त्याचा पाय घसरला आणि यामुळे त्याच्या पायाला जखम झाली. त्या दिवसापासून त्याचा आजार सुरु झाला आणि त्यानंतर काही दिवसांनी देवाच्या इच्छेने तो मरण पावला. हे ऐकून बादशाह गप्प बसला.

टीप. अंबारीतुन उतरताना , मिर्झाराजा जयसिंगाचा पाय, पाय ठेवायच्या उंचवट्यावरुन किंवा पायऱ्यांवरून घसरून त्याला जखम झाली असावी.

फार्सी वाचन
पराग पिंपळखरे
सत्येन वेलणकर
रोहीत सहस्त्रबुद्धे
गुरुप्रसाद कानिटकर
मनोज दाणी
प्रशांत सोमण
अभिजित मोहिरे

Satyen Velankar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here