बिर्ला गणपती मंदिर

बिर्ला गणपती मंदिर

बिर्ला गणपती मंदिर

पुण्यावरून मुंबईला जाताना सोमाटणे फाटय़ाजवळ डावीकडे आपल्याला एका टेकडीवर असलेल्या गणपतीच्या भव्य मूर्तीचे दर्शन घडते. हे आहे बिर्ला गणपती मंदिर.

पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटयावरून सुमारे ४ किलोमीटरवर शिरगाव येथे साईबाबांचे मंदिर आहे. मंदिराच्या रस्त्याला जाताना प्रथमच डाव्या हाताला एका छोटय़ाश्या डोंगरावर गणपतीची भव्य मूर्ती लक्ष वेधून घेते. बिर्ला उद्योग समूहाच्या वतीने ७२ फूट उंचीची श्री गणोशाची मूर्ती उभारण्यात आली आहे.

ही मूर्ती राजस्थानचे कारागीर मातुराम वर्मा व नरेश वर्मा यांनी घडवली आहे. जानेवारी २००९ मध्ये चिन्मय मिशनचे जागतिक प्रमुख स्वामी तेजोमयानंदजी यांच्या हस्ते मूर्तीचे अनावरण झाले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सिमेंट काँक्रिटमध्ये ही मूर्ती उभारली आहे. मूर्तीवर तांब्याचा मुलामा आहे. या मूर्तीची निर्मिती १६ एकर जागेत झाली आहे. एकूण १७९ पाय:या येथे जाण्यास लागतात. मूर्तीचे वजन १००० टन आहे. मूर्ती शेजारी मूषकराज हातात मोठा लाडूचा प्रसाद घेऊन उभे आहेत.

संध्याकाळी या ठिकाणी लाईट्स सोडल्याने मूर्ती आणखीच सुंदर दिसते. या ठिकाणावरून जुना पुणे-मुंबई रस्ता, देहूरोडचा काही भाग व आजुबाजूचा परिसर छान दिसतो. हा विशेषत: पावसाळय़ात हा परिसर सभोवतातील हिरव्यागार शेतीमुळे पाहण्यासारखा असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here