महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,34,475

काळ्या पाण्यावर गेलेली भिल्ल क्रांतीकारक

By Discover Maharashtra Views: 1361 5 Min Read

काळ्या पाण्यावर गेलेली भिल्ल क्रांतीकारक –

अंदमान म्हटले की सावरकर आणि ने मजसी ने हे गीत आपल्याला आठवते पण खानदेशातील अंदमानच्या काळ्या पाण्यावर गेलेली भिल्ल हुताम्यांची नावे जवळजवळ ३७ आहेत. त्यातील  २२ जण हे नाशिक जिल्ह्यातील आहे तर बारा जण हे यावल येथील आहेत. ऑगस्ट क्रांती निमित्ताने मी त्यांची यादी देत आहे. निदान नावाने का होईना आपण आठवण केली हे ही नसे थोडके.

अर्जुन मोसिया, एका गुंगा, कावजी धर्मा, गोविंद विधु, धर्म यशवंत, धुंडाळ माओजी, धोडी काला, नाभू बोवाजी, फकिर बाल पटेल, बीरबल धोडीया, भाऊ देवजी नाईक, भाऊ बोवाजी नाईक, भीमा लखमा, महादू ककोडीया, यश नाथिया, रामजी देवजी, रामजी रावजी, शांतु चंदु, शिया चंदु, सोम नाभिया, हरी चंदु, हरीया रावजी हे सर्व जण नाशिक येथील काही जण तिन्ही भाऊ आहेत तर मुलगा आणि वडील पण आहेत. जयराम राम, जयराम शिवराम, तुलपिया ही खानदेशातील आहेत.यावलची अधुरीया, अर्जुन, भाईखान, भिकारी, भिमाजी, मोहन, नरसिंह, नासिर, रोहीम, सुका, सुप्र्या, वझीर ही होय. ही नावे आदीवासींचे उठाव डॉ.सर्जेराव भामरे, अपरांत प्रकाशन पुणे २०१५ या पुस्तकातून घेतली आहे.

संदर्भ –
स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोश- महाराष्ट्र राज्य खंड १.
आदीवासींचे उठाव डॉ.सर्जेराव भामरे, अपरांत प्रकाशन पुणे २०१५.

भारत १८५७ मध्ये सगळीकडे पेटला असतांना खानदेशात काय घडत होते? खानदेश गॅझेटियर बाम्बे प्रेसिडेन्सी १८८० मधील वृत्तांत काय म्हणतो ते आधी बघु या.

अठराशे सत्तावन्न मध्ये सातमाळा परिसरातील भागोजी नाईक व सातपुडा भागातील करजसिंग ( लहानपणापासून कजऱ्या, काजीसिंग, खाज्या, खर्जासिंग ही नावे खाज्याचीच आहे.) यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी परत उठाव केला. भागोजी नाईक याचा उठाव अहमदनगर येथे सुरू होऊन चाळीसगाव पर्यंत पोहोचला. त्याचा मुकाबला सर साऊटरने केला.

सातपुड्याच्या आतमध्ये काजिसिंग याने पायथ्याला असलेल्या गावे लुटली आणि सैदवा घाट बंद करून अरब सैनिकांच्या मदतीने सैदवा येथील घाट बरेच दिवस कायम ठेवला. धारचे सैनिक येऊन मिळाले व आंबापाणी येथील लढाईत इंग्रजांचे नुकसान केले. आपली लढाई दोन वर्षे काजिसिंगने सुरू ठेवली बरेच सैनिक नंतरच्या काळात सोडुन गेले काही मृत्युमुखी पडले. पण तो शरण आला नाही.इंग्रजांनी  त्यावर बक्षीस ठेवले आणि द्रव्यलोभापायी त्याच्याच साथीदाराने तो झोपलेला असतांना ठार मारले.

खानदेशात अशी स्फोटक  परिस्थिती असतांनाच तात्या टोपेची बंडखोर सेना नर्मदा पार करून खानदेशावर चाल करून येत आहे अशी बातमी आल्यावर घबराट निर्माण झाली.

तात्या टोपे खानदेश वर चाल करून येत आहे अशी खरी बातमी ३ नोव्हेंबर १८५८ मध्ये आली आणि सरकारने देशी पायदळ, रॉयल आयरिश सेनादल व तोफखाना तसेच पुणे घोडदळ यांना आशिरगड आणि बऱ्हाणपुरवर संरक्षणासाठी तैनात केले. दुसरी सेना व युरोपियन तोफखाना अजिंठा येथे तैनात करण्यात आले. बोदवडला देखील भिल्ल पथक व बरेच मोठे पुणे घोडदळ तैनात करण्यात आले. आधीची वार्ता खरी करून गुप्तचरांनी कळवले की तात्या टोपे आणि त्यांची सेना पश्चिमेकडे चाल करून बऱ्हाणपूरच्या पासून ४८ किलोमीटर अंतरावर येऊन ठेपली आहे. इंग्रजांच्या दृष्टीने खानदेशाची सुरक्षा भयंकर धोक्यात आली होती. तात्या टोपे धवलीबारी घाट उतरून चोपडा येथे येण्याची दाट शक्यता होती म्हणून चोपड्यास सेनादल पाठवले.

२३ नोव्हेंबर रोजी तात्या टोपे यांनी सिंदव्यापासून ४८ किलोमीटर अंतरावर असलेल्या करकुंद गावावर चढाई केली. आग्रा महामार्गावर असलेल्या पोस्टाचे तारायंत्र तोडले. याच दिवशी सर ह्यू रोज यांनी इंग्रजी सेनेचा शिरपुरला तळ ठोकला. तात्या टोपे नर्मदा पार करून उत्तरेकडे जात आहे अशी बातमी आल्यावर मग  ह्यू पाठलाग करण्यासाठी निघाला होता पण खानदेशातील जिल्हाधिकारी मॅन्सफिल्ड याने खानदेशातील सुरक्षा  धोक्यात येईल म्हणून मना केले.

तरी देखील तात्या टोपे माळवा आणि उज्जैनकडे अथवा गुजरात मध्ये जाण्याची दाट शक्यता असल्याने सर ह्यू सिंदवा घाटाकडे जायला निघाले. परंतु बंडखोर दल पश्चिमेकडे वळल्यावर व उत्तरेकडून दुसरी इंग्रज सेना टोपेवर चाल करून आल्याचे कळताच सर ह्यू शहाद्याला आला. व धुळ्याच्या सेना दलाच्या मदतीला अहमदनगर येथील  सेना दल आणण्यात आले. त्यानंतर बंडखोरांची सेना छोटा उदेपूर येथे पोहोचली. १८ डिसेंबर रोजी १८५८ रोजी तिच्यावर इंग्रज ब्रिगेडियर पार्कने मात केली. त्यामुळे बंडखोर पुन्हा नर्मदा पार करून अक्राणीमार्गे खानदेशात प्रवेश करण्याची शक्यता निर्माण झाली.म्हणून इंग्रज सेना सुलतानपूर आणि तळोदा येथे आली. तथापि ते नर्मदा पार करतांना बंडखोरांची गफलत झाली आणि ते पुर्वेस खांडव्याकडे चाल करून गेले. अशा प्रकारे या प्रदेशात तात्या टोपे यास अपयश आले.

माहिती संकलन  –

Leave a comment