महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,29,510

वीर बाजीप्रभू देशपांडे आणि ३०० मराठ्यांनी १० हजार आदिलशाही फौजेला हरवले

By Discover Maharashtra Views: 7007 9 Min Read

वीर बाजीप्रभू देशपांडे आणि ३०० मराठ्यांनी १० हजार आदिलशाही फौजेला हरवले

पावनखिंडचा महासंग्राम – १३ जुलै १६६० पावन खिंडीची लढाई म्हणजे स्वराज्याच्या अस्तित्वाची लढाई होती. ही लढाई कोल्हापूर शहराजवळील विशाळगडाच्या डोंगराळ प्रदेशात स्वराज्याचे सरदार बाजी प्रभू देशपांडे आणि आदिलशाही सल्तनतचा सिद्धी मसूद यांच्यात झाली होती.
ह्या युद्धात सरदार बाजीप्रभू देशपांडे आणि मराठा सैन्याचे एकच लक्ष होते. कुठल्याही परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज  विशाळगडावर पोहोचले पाहिजे. आणि आदिलशाही फौज कोणत्याही परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांना
विशाळगडावर जाण्यापूर्वी पकडून आदिलशाह पुढे हजर करायचे.

पावन खिंड संक्षिप्त –
दिनांक – १३ जुलै १६६०,
वार – मंगळवार,
स्थळ – विशाळगडाच्या जवळील पावन खिंड,
विरोधक – मराठा साम्राज्य विरुद्ध आदिलशाही,
सरदार – बाजीप्रभू देशपांडे विरुद्ध सिद्दी जोहर,
सैन्य संख्या – मराठा ३०० विरुद्ध  / आदिलशाही १०,०००,
युध्द कामी आलेले सैन्य – मराठा 300+  / आदिलशाही 1500+

युद्धाची पार्श्वभूमी
छत्रपती शिवाजी महाराज यांनी पावनखिंड युद्धाच्या जवळजवळ  ७ महिने अगोदर २८ डिसेंबर १६६० ला कोल्हापूर परिसरात झालेल्या युद्धात आदिलशाहीच्या सैन्याला हरवले होते. त्यामुळे  कोल्हापूर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अधिकाराने अंमल चालू झाला होता. त्यामुळे विजापूरचा आदिलशाह दुसरा याने रागारागाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा बंदोबस्त करण्यासाठी १०,००० सैन्यााची फौज पाठवली  होता. प्रतापगडाच्या युद्धात फाजल खानाचे वडील अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला होता. त्यामुळे बदल्याची आग मनात ठेवून फाजल सैन्याबरोबर आला होता.
फाजल खान आणि सिद्धी जोहर हे पन्हाळगडाला वेढा देण्यासाठी प्रयत्नशील होते. आणि अखेर त्यांनी वेढा दिला. २ मार्च १६६९ साली एकूण १५००० सैनिकांनी पन्हाळगडाला वेढा दिला. पण किल्याचा परिसर खूप मोठा होता त्यामुळे ते किल्ल्यावर ताबा मिळवू शकले नाही.  त्यांनी अनेकवेळा हल्ले केले पण ते कुचकामी ठरले.

पन्हाळा किल्ला

पन्हाळगडाचा वेढा हा सतत चार महिने चालू होता. जुलै १६६० उजाडले पावसाळा जोर धरत होता. पण तरीही वेढा कायम होता. मराठ्यांचे सैन्य पन्हाळ्यावरुन तोफेचा मारा करत होते. तोफांच्या माऱ्याने आदिलशाही सैन्याचे खूप  मोठं नुकसान झाले होते. म्हणून त्यांनी वेढा मागे सरकून घेतला. पन्हाळगडावरून होणाऱ्या तोफांच्या माऱ्याने खूप नुकसान झाले होते. म्हणून सिद्धी जोहर याने जवळच असणारा पवनगड ताब्यात घेण्याचा मनसुबा केला होता. पवनगडाच्या जवळील टेकडी ताब्यात घेण्यासाठी त्यांनी पवनगडावर तोफांचा मारा चालू केला. ह्या कामासाठी पन्हाळगडावर दिलेल्या वेढा कमी करून त्यातील काही सैनिक पवनगड कडे रवाना केले. पवनगड अगदी ३ ते ४ किलोमीटर अंतर जवळ होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांना पुरेपुर कल्पना होती. जर पवनगड आदिलशाहीच्या ताब्यात गेला तर पन्हाळा सहज ते ताब्यात घेतील. पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सरदार शिवाय त्यांच्याबरोबर असणारे सैन्य पन्हाळगडावर होते. आदिलशाहाच्या सैन्याने पन्हाळगडाला संपूर्ण वेढा दिला होता. आदिलशहाच्या सैन्याचे नेतृत्व हे सिद्धी मसूद नावाचा सरदार करत होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदिलशाहीला अनेकवेळा मानहानीकारक पराभूत केले होते. त्यामुळेच ही सल आदिलशाहच्या डोळ्यात नेहमी सलत असे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी पन्हाळगड जिंकला, तेव्हा हे प्रमाण जास्त झाले होते. आदिलशाही विजापूरवर अनेक दशकांपासून शासक होते. त्यावेळी अली आदिल शाह दुसरा शासक म्हणून राज्य करत होता.

सोळासाव्या शतकातील हा प्रसंग अंगावर काटा उभा राहिल असाच आहे. दिनांक इ.स. २ मार्च १६६९ ह्या दिवशी आदिलशाही सरदार सिद्धी जोहर याने वेढा दिला होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांना गडावरुन बाहेर जाणे अवघड झाले होते. ऐन पावसाळ्यात सिद्धी जोहरने पवनगडावर हल्ला करण्याचा मनसुबा केला होता. आणि त्याने त्यादृष्टीने तशी हालचाल सुरु केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा विशाळगडावर जाण्याचा बेत होता. पण विशाळगडाच्या मार्गावर पवनगड आहे, हे महाराज जाणून होते. त्यामुळे पवनगड आदिलशाहीच्या ताब्यात जाणे म्हणजे आणखीन अवघड परिस्थिती निर्माण करण्यासारखे होते.
पावसाळ्याचे दिवस होते जोरदार पाऊस चालू होता. तरीही वेढा हटवण्यात आला नाही. परंतु आदिलशाही फौज सततच्या दगदगीने कंटाळली होती. अशा अवघड परिस्थितीत शिवाजी महाराजांनी सिद्धी जोहरला तह करण्यासाठी वकीला मार्फत निरोप धाडला. दिनांक १३ जुलै १६६० रोजी शिवा काशीद ह्या मावळयाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशात तहाची बोलणी करण्यासाठी पाठवून दिले.
तहाची बोलणी करण्यात वेळ गेला होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना भर पावसातुन वेढा भेदण्यासाठी पुरेसा कालावधी मिळाला. तिकडे शिवा काशीद शिवाजी महाराजांच्या वेशात तहाची बोलणी करण्यात जोहरला गुंतवून ठेवले होते. परंतु शिवा काशीद याचं खरं रूप कळल्यावर जोहरने तात्काळ त्यांना जागीच ठार मारले. इकडे छत्रपती शिवाजी महाराज तोपर्यंत विशाळगडाच्या वाटेवर मार्गस्थ झाले. त्यांच्याबरोबर ६०० ते ७०० मराठा मावळे सैनिक होते.

छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून विशाळगडाकडे गेले आहे.      हे जेंव्हा सिद्दी जोहरला समजले, तेंव्हा त्याने सिद्धी मसूदला छत्रपतीच्या मागावर पाठवून दिले. मसुदच्या सैन्याने मराठयांचा पाठलाग चालू केला होता. पन्हाळगड ते विशाळगड मधील अंतर हे ५० ते ६० किलोमीटरवर होते. दिनांक १३ जुलै १६६० ची ती रात्र पौर्णिमेची होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना धावपळीत मार्गक्रमण करताना अडचण आली नाही. तशीच शत्रू सैनिकांना पण आली नाही.
महाराज हे मसाई देवीच्या पठारावरून जात होते. ती भयाण रात्र होती आणि पावसाने जोर धरला होता. एका बाजूला मसाई च घनदाट जंगल तर एका बाजूला मोठी खोल दरी होती. मागून शत्रू सैन्य पाठलाग करत होते. तर समोरून  जबरदस्त पावसाचे टपोरे थेंब मारा करत होते.  त्या अंधाऱ्या रात्री थोडीशी  चूक सुद्धा महागात पडू शकली असती. पण हुशार चाणाक्ष छत्रपती यांनी मसाई पठारावर  नेहमी गुरे चरायला जाणाऱ्या एका मराठ्याशी अगोदरच  खलबत केले होते. अशा अवघड आणि कठीण मार्ग होता.  तेंव्हा  मार्गक्रमण करताना मार्ग पूर्वेकडून पाश्चिमेला जायचं होतं. जर डाच्या कानाला पाऊस लागला तर समजावे तुम्ही मसाई जंगलाकडे जात आहात. जर पाऊस हा उजव्या कानाला लागला तर समजावे तुम्ही मासाईच्या खोल दरीकडे जात आहे.  आणि जर पाऊस तुमच्या चेहऱ्यावर , कपाळावर पडत असेल तर तुम्ही विशाळगडाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. अशा उत्तम प्रकारे महाराजांनी अचूक मार्गक्रमण कसे करायचं हे माहीत करून घेतले  होते.  

ती रात्र संपायला काही अवधी होता.  म्हणजे तांबडं फुटायला अवकाश होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे हे पांढर पाणी ओढ्याजवळ पोहोचले होते. पांढर पाणी ओढ्यापासून विशाळगडाचे अंतर १५ ते २० किलोमीटर इतके होतेे. इकडे आदिलशाही सैन्य पाठलाग करत अगदी जवळच आले होते. त्यामुळे जास्त धोका नको म्हणून बाजीप्रभूंनी महाराजांना आग्रह केला.  आपण पुढे जावे  आणि मी इथं घोड खिंडीत त्यांना रोखून धरतो. छत्रपती शिवाजी महाराजाना दुःख झाले.  अशा बिकट प्रसंगी सहकारी यांना सोडून जायचे. महाराज तयार होत नव्हते.
लाख मेले तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा मारता कामा नये. 
म्हणून बाजीने छत्रपती शिवाजी महाराज यांना १०० मावळ्यानीशी विशाळगडाकडे मार्गस्थ केले. छत्रपती शिवाजी महाराज हे गडावर पोहोचले की तीन तोफांचा आवाजाचा इशारा देण्यात येत नाही. तोपर्यंत खिंड लढवली जाईल हे सांगितले.

पावनखिंड चे युद्ध –
छत्रपती शिवाजी महाराज यांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्या बरोबर ३०० घोडेस्वार आणि पायदळ ठेवले होते. आदिलशाही सैनिकांनी तीन चार वेळा हल्ले केले होते. मराठयांनी ते जोरदार परतवून लावले. अतिशय विंचोळी जागा दोन्हीही बाजूने बेलाग डोंगरकडे होते. आदिलशाही सैन्यावर वरून दगडांचा मारा चालू होता. आणि त्या चिंचोळ्या जागेत मसूदचे सैन्य आल्यावर मराठयांनी मसूदच्या सैन्याची कत्तल आरंभली होती. मराठ्यांना अनेक जखमा झाल्या, कोणी जायबंदी झाले तर कोणी गतप्राण झाले. हे सर्व चालू असतानाही बाजीप्रभू देशपांडे, फुलजीप्रभु देशपांडे, संभाजी जाधव, बांदल यांनी जीवाची पर्वा न करता मोठा पराक्रम गाजविला. छत्रपती शिवाजी महाराज हे विशाळगडावर पोहोचले तेंव्हा तीन तोफांचा गजर झाला आणि तो आवाज ऐकून इकडे समाधानाने बाजीप्रभू देशपांडे यांनी आपला जीव सोडला.

घोडखिंड युद्धात मराठ्यांचे जवळपास सर्वच ३०० मावळे युद्धात कामी आले. तर आदिलशाही चे ३००० सैनिक कामी आले. बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभु देशपांडे आणि इतर मावळ्यांच्या पराक्रमाने घोडखिंड ही पावनखिंड म्हणून इतिहासात अजरामर झाली. पावनखिंडच्या लढाईत हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी प्राणार्पण केले.
इतर मराठयांनी गतप्राण झालेल्या सरदार आणि सैनिकांचे पार्थिव घेऊन विशाळगडाकडे रवाना झाले. विशाळगड हा खूप अवघड आणि कठिण होता.  म्हणून मसूद माघारी निघून गेला आणि त्यांनतर काही दिवसांनी त्यांनी पन्हाळगड काबीज केला.

विशाळगड
पावनखिंड रणसंग्रामात धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांची खबर जेंव्हा राजमाता जिजाऊ यांना कळली तेव्हा त्यांना खूप दुःख झाले. वीर फुलाजीप्रभु देशपांडे आणि वीर बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी विशाळगडावर दुरास्थेत आहे.

Leave a comment