आपल्या डोळ्यासमोर येणारी प्रत्येक मंदिरे जमीनदोस्त करणारा औरंगजेब..!!

महापूराने औरंगजेबाची उडवली होती दैना

आपल्या डोळ्यासमोर येणारी प्रत्येक मंदिरे जमीनदोस्त करणारा औरंगजेब..!!

१६८१ साली औरंगजेबपुत्र शहजादा अकबर आपल्या बापाशी बंड करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या आश्रयाला स्वराज्यात आला, त्यावेळी आलमगीर औरंगजेब हा अकबराचे बंड मोडून काढण्यासाठी तसेच दक्षिणेतील शाह्या जिंकण्यासाठी सप्टेंबर १६८१ मध्ये अजमेरहुन निघाला आणि नोव्हेंबर १६८१ मध्ये बुऱ्हाणपूर येथे पोहचला..

अखबारत-ए-दरबारच्या एका नोंदी नुसार बुऱ्हाणपूर येथे पोहचल्यानंतर औरंगजेब याने एक आदेश काढला होता

“माझ्या मार्गावर येणारी प्रत्येक मंदिरे जमीनदोस्त करण्यात यावी ” हा आदेश बेलदारांचा प्रमुख जवाहरचंद याच्या नावाने काढण्यात आला होता. बेलदार म्हणजे दगड फोडणारे, बांधकाम करणारे तसेच रस्त्याचे कामे करणारे लोक…

आपण एक लक्षात घेतले पाहिजे की हा आदेश जुन्या आणि अलीकडे तयार केलेल्या मंदिरासाठी होता असे नाही तर बादशहाच्या डोळ्यांना दिसणारी सर्व मंदिरे जमीनदोस्त करावी असा सर्वसमावेशक आदेश आहे. दक्षिणेकडील मंदिरे आणि घरे दगड आणि लोखंडाने बांधली गेलेली आहेत याची औरंगजेबाला खंत होती. या कारणास्तव त्याने रुहउल्ला खानला लिहिले की ” माझ्या मोर्चाच्या वेळी मला आणि माझ्या कुटूंबातील माणसांना वाटेवर डोळ्यांनी दिसणाऱ्या मंदिराचा नाश करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे सामर्थ्य, शक्ती म्हणजे वेळ मिळत नाही. त्यासाठी स्वतंत्र दरोग्याची नेमणूक करावी म्हणजे नंतर ते वेळ मिळेल तसे मंदिरे जमीनदोस्त करुन त्याचा पाया खोदू शकतील ”

अलीकडच्या काळात औरंगजेब किती महान  धर्मनिरपेक्ष शासक होता वैगरे मांडणी करताना दिसून येते, वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. औरंगजेब हा शूर, बुद्धिमान, राजकीय मुस्तद्दी जरूर असेल पण तो अतिशय संशयखोर, धर्मांध आणि क्रूर होता हा इतिहास आहे त्यामुळे औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे अनैतिहासिक आहे…

पोस्ट साभार – राज जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here